विरोधी पक्षनेत्यांच्या निवडणूक भाषणांमधून केंद्र सरकारविरोधात केलेल्या टिप्पण्या आणि काही शब्द काढून टाकण्यात आले आहेत. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर दिलेल्या भाषणादरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि फॉरवर्ड ब्लॉकचे नेते जी देवराजन यांच्या भाषणानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही विरोधी नेत्यांना त्यांच्या ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवरील भाषणांमधून सांप्रदायिक हुकूमशाही आणि कठोर कायदे आणि मुस्लिम शब्द काढून टाकण्यास सांगण्यात आले. सीताराम येचुरी यांच्या भाषणातून दोन शब्द काढावे लागले आणि काही शब्द बदलावे लागले. त्याचवेळी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे नेते जी देवराजन यांना कोलकाता येथे रेकॉर्ड केलेल्या भाषणात मुस्लिम हा शब्द टाळण्यास सांगितले होते.

निवडणूक आयोगाच्या नियमांचे केले पालन

याबाबत प्रसार भारतीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दूरदर्शन आणि आकाशवाणी या दोन्ही कंपन्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन केले आहे. मात्र, बहुतांश नेत्यांबाबत असेच घडते. त्यांच्या भाषणातून काही शब्द काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही काही मुख्यमंत्र्यांची भाषणे दुरुस्त करण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban on using the words muslim dictator and bankruptcy words omitted from sitaram yechury and devarajan speech vrd
First published on: 17-05-2024 at 16:00 IST