because of lack of election symbol with Shinde group by-election of Andheri East assembly seat going to contest by BJP | Loksatta

शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नसल्याने अंधेरी पोटनिवडणूक भाजपच लढणार

शिवसेनेतील फुटीनंतर प्रथमच होत असलेल्या पोटनिवडणकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पराभव करण्यासाठी भाजपने आधीच तयारीही सुरू केली आहे.

शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नसल्याने अंधेरी पोटनिवडणूक भाजपच लढणार
शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नसल्याने अंधेरी पोटनिवडणूक भाजपच लढणार

उमाकांत देशपांडे

मुंबई : मुख्य मंत्री एकनाथ शिंदे गटाकडे राखीव निवडणूक चिन्हच नसल्याने अंधेरी (पूर्व) मतदारसंघातील तीन नोव्हेंबरला होणारी पोटनिवडणूक भाजपच लढविणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर प्रथमच होत असलेल्या पोटनिवडणकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पराभव करण्यासाठी भाजपने आधीच तयारीही सुरू केली आहे. मात्र याबाबत विचारता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ‘ लोकसत्ता ‘ शी बोलताना म्हणाले, ही जागा भाजपने लढवायची की शिंदे गटाने आणि भाजप लढल्यास उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय केंद्रीय संसदीय मंडळाकडून घेतला जाईल.

हेही वाचा… अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या राजकीय शक्तीची पहिली चाचणी

शिवसेना आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. ही जागा शिवसेनेकडे असल्याने शिंदे गट त्यासाठी दावा करीत आहे. लटके यांचे मुख्य मंत्री शिंदे यांच्याशी मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या पत्नी ऋतुजा यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्याने त्यांच्या विरोधात निवडणूक लढू नये, असा मतप्रवाह शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये आहे. त्याचबरोबर शिंदे गटाकडे सध्या निवडणूक चिन्ह नाही. खरी शिवसेना कोणाची, या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी निर्णय होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही जागा भाजपनेच लढवावी, असे ज्येष्ठ भाजप नेत्यांचे मत आहे. शिवसेना फुटीनंतर प्रथमच होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराचा पराभव केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचे मनोबल आणखी उंचावेल. त्यामुळे ही जागा भाजपनेच लढण्याचा वरिष्ठ भाजप नेत्यांचा आग्रह आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यापासून भाजप दूर; राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

शिवसेना-भाजप युती २०१९ मध्ये असताना ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. लटके यांनी त्यांचा १६९६५ मतांनी पराभव केला, तरी ४५८०८ मते मिळवून ते दुसऱ्या स्थानी होते. मुरजी पटेल यांनी निवडणूक लढविण्याची तयारीही सुरू केली आहे. मात्र भाजपच्या कार्यपद्धतीनुसार प्रदेश सुकाणू समितीत ही जागा कोणी लढवायची व उमेदवार कोण असेल, याबाबत प्रस्ताव तयार करून तो केंद्रीय संसदीय मंडळाकडे पाठविला जाईल व अधिकृत घोषणा केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
झाकोळलेल्या ‘भारत जोडो’ला राहुल गांधी यांच्या पावसातील सभेने उभारी

संबंधित बातम्या

गुजरातमधील मराठी बहुल मतदारसंघांमध्ये अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभा
हरीश बैजल : राजकीय बदल्यांच्या सावटातील लढाई अन् कर्तृत्वाची मोहोर!
धुळे मनपात सत्ताधारी भाजपवर स्वपक्षीयांकडूनच आगपाखड
तेलंगणात बहिण शर्मिलाच्या अटकेबाबत पंतप्रधानांनी केली जगन मोहन रेड्डींकडे विचारणा; मुख्यमंत्र्यांनी स्मितहस्य केलं अन्…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नोटाबंदीबाबत मूकदर्शक बनणार नाही!; सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला सुनावले
गोवर लसीकरण मोहीम दोन टप्प्यांत
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा तूर्तास बंद; ६६० बस फेऱ्यांवर परिणाम
मुंबईतील हवा ‘अत्यंत वाईट’; धुरक्याच्या प्रमाणात वाढ
चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम नव्या शैक्षणिक वर्षांपासून; उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे निर्देश