Ajit Pawar statement : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत फारशी चमक दाखवता आली नाही. पक्षाला चारपैकी एकच खासदार निवडून आणता आला. अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामती मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यातही बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना अधिक मताधिक्य मिळाले. आगामी विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवताना स्वतः अजित पवारांसाठी ही धोक्याची घंटा मानली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटाकडून पक्षात धोरणात्मक बदल केले गेल्याचे दिसून येते. ऑक्टोबर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने नवीन पवित्रा स्वीकारल्याचे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत आहे.

सोमवारी (१२ ऑगस्ट) अजित पवार यांनी जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, बारामतीध्ये आपली बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीला उभे करून आपली चूक झाली. ते म्हणाले, “मी माझ्या सर्व बहि‍णींवर प्रेम करतो. घरात राजकारण आणण्याची काहीच आवश्यकता नव्हती. सुनेत्रा पवार यांना बहिणीच्या विरोधात उभे करून मी चूक केली. हे व्हायला नको होते; पण पक्षाच्या संसदीय मंडळाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) निर्णय घेतला होता. आता मला तो निर्णय चुकीचा असल्याचे वाटते.”

There is a possibility of a split in the MIM party print politics
‘एमआयएम’ फुटीच्या उंबरठ्यावर
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Supporters urge Ajit Pawar to contest from Baramati Assembly Constituency pune print news
अजित पवारांनी बारामतीमधूनच लढण्याचा सर्मथकांचा आग्रह
Discussion of Nitin Gadkari absence from BJP victory rally in Delhi
भाजपच्या दिल्लीतील विजयी सभेतील गडकरींच्या अनुपस्थितीची चर्चा
Raj Thackeray appeal, Raj Thackeray,
जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आव्हान
BJP to change candidates in Gadchiroli and Armori Assembly election
गडचिरोलीत भाजप भाकरी फिरविणार?
ajit pawar silence on udgir
उदगीर जिल्हा निर्मितीसाठी मंत्र्याच्या मागणीनंतरही अजित पवारांचे मौन
chinchwad vidhan sabha marathi news
चिंचवड विधानसभा: अजित पवारांचा आणखी एक खंदा समर्थक साथ सोडणार? बंडखोरी करण्याचा इशारा…म्हणाले, “झुंडशाहीला…”

अजित पवारांनी एका पद्धतीने आपली चूक मान्य केल्यानंतर साहजिकच माध्यमांनी याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, अजित पवारांचे विधान मी ऐकलेले नाही. त्यामुळे यावर मी भाष्य करू इच्छित नाही.

जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार, खासदारांचा एक गट घेऊन महायुतीशी हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले. मात्र, सुप्रिया सुळे यांनी तब्बल १.५८ लाखांचे मताधिक्य घेत मोठा विजय संपादन केला. त्यानंतर आता अजित पवार म्हणत आहेत की, हा माझा नाही; तर पक्षाच्या संसदीय मंडळाचा निर्णय होता.

लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान अजित पवार यांनी ८३ वर्षे वय असलेल्या शरद पवारांवर टीका केली. वय खूप वाढूनही शरद पवार बाजूला होत नसून, नव्या लोकांना संधी देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. तसेच शरद पवारांच्या जुन्या निर्णयांचा हवाला देत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी महायुतीबरोबर आल्याचा दावाही अजित पवार यांनी केला.

अजित पवार यांच्याप्रमाणेच त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनीही हीच री ओढली. शरद पवारांप्रमाणे आपणही आत्मचरित्र लिहून, त्यात सर्व काही गुपिते उघड करू, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची संधी शरद पवारांनी डावलली, असा आरोप केला.

शरद पवारांवरील टीका व्यर्थ असल्याची जाणीव

लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांवर केली गेलेली टीका उपयुक्त नसल्याची जाणीव अजित पवार यांना झाली. शरद पवारांवर टीका केल्यामुळे जनतेची सहानुभूती त्यांच्याकडे जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आता धोरणात बदल केला गेला आहे. लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील अनेक सदस्य शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बाजूने उभेच राहिले नाहीत, तर त्यांनी प्रचारातही सक्रिय सहभाग घेतला. तसेच यामुळे अजित पवार यांची नकारात्मक प्रतिमा राज्यात तयार झाली; ज्याचा फटका त्यांना बसला.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला झटका

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल असे लागले. राज्यातील ४८ पैकी केवळ १७ जागा महायुतीला जिंकता आल्या. महाविकास आघाडीने ३० जागांवर विजय मिळविला. त्यापैकी अजित पवार गटाला केवळ एकच जागा जिंकता आली. शिंदे आणि भाजपाच्या तुलनेत अजित पवार गटाची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतमध्ये शरद पवार गटाने १० पैकी आठ जागा जिंकून आणल्या. तर शिवसेना उबाठा गटाने १३ जागांवर विजय मिळविला.

चूक मान्य करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न?

आगामी विधानसभा निवडणूक या सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे. तशा अजित पवार गटासाठी त्या अधिक महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच जुन्या चुकांमधून धडा घेत अजित पवार यांनी आपल्या रणनीतीमध्ये बदल केल्याचे दिसते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून स्वतःचा मार्ग निवडला, हे सर्वांनाच माहीत आहे. लोकांना त्यांचा निर्णय आवडला नाही, हे आता लोकसभेच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. अजित पवारांनाही हे समजले असल्यामुळेच त्यांनी आपली चूक मान्य केली आहे; जेणेकरून ते लोकांना संभ्रमित करून, त्यांची सहानुभूती मिळवू शकतील.

अजित पवार यांनी २०१३ साली धरणाच्या पाण्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांनी त्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचा आत्मक्लेश केला होता. त्याप्रमाणेच आता पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीला उभे करून चूक झाली, असे मान्य करून बारामतीमधील मतदारांवर प्रभाव टाकण्याचे काम अजित पवारांकडून होत असल्याचे बोलले जात आहे.

युगेंद्र पवार यांच्याशी थेट लढत?

शरद पवार गटातील नेत्यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांना आपल्या पुतण्या युगेंद्र पवारचा सामना करावा लागू शकतो. १९९१ पासून अजित पवार यांनी लागोपाठ सात वेळा या मतदारसंघातून विजय मिळविला आहे. पण, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभेतून मताधिक्य मिळवून दिले होते. त्यामुळेच युगेंद्र पवार यांनाच विधानसभेला उमेदवारी द्यावी, अशी मागणी शरद पवार गटातील नेत्यांकडून होत आहे.