वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेबरोबर युती करण्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार ही युती आता आकारला येत आहे. परंतु या युतीचा मुंबईत शिवसेनेला किती फायदा होईल याबाबत वेगवेगळे मतप्र‌वाह आहेत. मुंबईत रामदास आठवले यांचा रिपल्बिकन पक्ष की प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ताकद अधिक, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात अधिक लक्ष केंद्रित केले. अकोला जिल्हा परिषदेत या पक्षाला सत्ता मिळाली. याशिवाय दोन आमदार मागे निवडून आले होते. अकोल्याचा अपवाद वगळता वंचित बहुजन आघाडीला राज्याच्या अन्य भागात राजकीय प्रभाव पाडता आलेला नाही किंवा राजकीय यशही प्राप्त झालेले नाही. यालउट रामदास आठवले यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईवर अधिक लक्ष केंद्रीत केले होते. आठवले यांच्या पक्षाला निवडणुकीत मर्यादित यश मिळाले असले तरी मुंबईच्या दलित वस्त्यांमध्ये आठवले यांच्या पक्षाचा प्रभाव जाणवतो. ही मते निर्णायक असतात आणि आठवले यांच्या आदेशानुसार मतदान होत असते.

हेही वाचा… सत्तांतरानंतरही भुसे-हिरे संघर्ष सुरूच

lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
PRAKASH AMBEDKAR
मविआला धक्का; प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर, मनोज जरांगे पाटील यांच्याशी संधान बांधत उमेदवारांची घोषणा

मुंबई महानगरपालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करण्यात आला होता. तेव्हा रामदास आठवले यांनी शिवसेनेबरोबर हातमिळवणी केली होती. आठवले गटाची मते तेव्हा शिवसेनेकडे काही प्रमाणात वळली होती. शिवशक्ती आणि भिमशक्तीतील जुन्या संघर्षामुळे दोन्हीकडे काही प्रमाणात आक्षेप होतेच.

हेही वाचा… वंचितसोबतच्या आघाडीबाबत शरद पवार यांचे मोठं वक्तव्य; म्हणाले, “आम्ही त्याची चर्चा…”

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीबरोबर हातमिळवणी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा वर्ग मोठा आहे. पण मतांमध्ये किती फरक पडतो याबाबत आताच अंदाज वर्तविणे कठीण आहे. भाजप की शिवसेना हा पर्याय समोर असल्यास दलित समाज हा शिवसेनेला कौल देईल, असे शिवसेना नेत्यांचे गणित आहे.