Bhokar Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, या निवडणुकीत काही मतदारसंघात अतिशय महत्वाच्या लढती होत आहेत. यामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघात अटीतटीचा सामना रंगण्याची चिन्ह आहेत.

या मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा वारसा जोपासण्यासाठी त्यांची नात आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या नांदेड जिल्ह्यातील भोकरमधून निवडणूक लढवत आहेत. तर या मतदारसंघातून काँग्रेसकडून तिरुपती उर्फ पप्पू कोंढेकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. खरं तर कोंढेकर यांनी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहा वर्षे काम केलेलं आहे. त्यांना अशोक चव्हाणांचे खंदे समर्थक म्हणून बोललं जायचं. मात्र, अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर कोंढेकर हे काँग्रेसमध्येच राहिले. आता श्रीजया चव्हाण आणि तिरुपती कोंढेकर यांच्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : रायगडमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कोण याचा गोंधळ सूरूच; शेकाप उमेदवारावर कारवाईची शिवसेनेची मागणी

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना तिरुपती कोंडेकर यांनी म्हटलं की, ‘मी या घराणेशाहीच्या विरुद्ध लढणारा एक सामान्य माणूस आहे. भोकरची भूमी काँग्रेस विचारसरणीची आहे आणि मी शंकरराव चव्हाण यांचा वारसा पुढे नेत असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच श्रीजया चव्हाण यांचा दावा आहे की, त्यांचे आजोबा शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील कामामुळे या भागातील शेतीमध्ये क्रांती झाली. त्यांनी अनेक दशके जिल्ह्याचे नेतृत्व केलं. सर्वांना पाणी मिळावे म्हणून त्यांनी अनेक कामे केली आहेत. मग लोक हे विसरतील असं तुम्हाला वाटतं का? आमच्या कुटुंबाने अनेक दशकांपासून लोकांची सेवा केली. तसेच माझी उमेदवारी ही भोकरमध्ये माझ्या आजोबा आणि वडिलांनी केलेल्या कामाचं फळ आहे, असं श्रीजया यांनी म्हटलं.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून श्रीजया चव्हाण या गणल्या जात होत्या. कारण त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत ‘भारत जोडो यात्रे’च्या सहभाग घेतला होता. मात्र, अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतरह त्यांनी देखील काँग्रेस सोडत वडिलांची साथ दिली. त्यानंतर आता भाजपाकडून त्यांना भोकरमधून विधानसभेची उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी आपलं मत मांडताना म्हटलं की, अशोक चव्हाण हे मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करतील आणि आपण मतदारसंघातील शिक्षणाच्या प्रश्नांसंदर्भात लक्ष केंद्रीत करू, असं श्रीजया चव्हाण यांचं मत आहे. खरं तर चव्हाण कुटुंब या जागेवर २००८ पासून विजयी होत आहे. तसेच यापूर्वी शंकरराव चव्हाण भोकरमधून १९६७, १९७२ आणि १९७८ मध्ये तीनदा विजयी झाले होते. मात्र, यावेळी चव्हाण कुटुंबाच्या आव्हानात भर पडली आहे. कारण तिरुपती कोंढेकरांनी असा दावा केला की, हा मतदारसंघ काँग्रेसच्या विचारसरणीचा असून येथील लोक काँग्रेसला पाठिंबा देतील. हा मतदारसंघ कोणत्याही एका नेत्याचा नाही. दरम्यान,कोंडेकर यांची तरुणांमधील लोकप्रियता आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमधील त्यांच्या पदामुळे संपूर्ण मतदारसंघाशी त्यांचा संपर्क असल्यामुळे श्रीजया चव्हाण यांच्या समोर आव्हान निर्माण झालं आहे.

हेही वाचा : भंडारा विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा बोलबाला? युती-आघाडीतील असंतुष्ट अपक्षांच्या पाठिशी!

भोकरमधील अनेक गावांत कोंडेकर यांच्या मोहिमेचं काम काँग्रेसचे मुख्यतः तरुण कार्यकर्ते करतात. मात्र, असं असलं तरी त्यांना त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. अशोक चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात लढण्यासाठी लोकांचा पाठिंबा आहे. पण कोंडेकर हे व्यवस्थापन करण्यात अयशस्वी ठरत असल्याचं काही काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते सांगतात. तसेच असं असलं तरी मतदार त्यांच्या बोलण्यात सावध दिसत आहेत. कारण उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास नांदेडमधून चव्हाण कुटुंबाचा वारसा पुसला जाऊ शकत नाही, असा दावाही काहीजण करतात. मात्र, दुसरीकडे आम्ही नेहमीच काँग्रेसशी संबंधित कुटुंब पाहिले आहे. आपल्यापैकी अनेकांना वेगळ्या पक्षाचा प्रचार करताना पाहणं अजूनही अवघड असल्याचंही काही स्थानिक सांगतात.

दरम्यान, या भागात काँग्रेसच्या सर्व निवडणुकीच्या प्रचारात शंकरराव चव्हाण यांचं नाव घेतलं जातं. यासंदर्भात बोलताना काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी म्हटलं की, “शंकरराव चव्हाण यांनी दिलेल्या विचारावर आपण चालत आहोत. त्यांच्या पुढच्या पिढीने काही चुकीची पावले उचलली असतील, पण आम्ही त्यांचे खरे वैचारिक वारस आहोत”, असं नांदेड आणि लातूरमध्ये पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करणारे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

Story img Loader