जालना : जिल्ह्यातील भोकरदन मतदारसंघात राष्ट्रवादीचे (शरद पवार) चंद्रकांत दानवे आणि भाजपचे विद्यामान विधानसभा सदस्य संतोष दानवे यांच्यातील लढत या वेळेस लक्षवेधी ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉ. कल्याण काळे (काँग्रेस) यांनी भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा अधिक मते घेतली. रावसाहेब दानवे यांचे मूळ गाव असणाऱ्या या विधानसभा क्षेत्रात लोकसभेच्या वेळी झालेली पीछेहाट विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याचे आव्हान आहे.

भोकरदन मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे निवडून आलेले असून आता तिसऱ्यांदा ते पुन्हा भाजपकडून उभे आहेत. मागील दोन्ही निवडणुकांत पराभूत झालेले चंद्रकांत दानवे पुन्हा नशीब अजमावीत आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी पक्षाकडून तीन वेळेस आमदार राहिलेले आहेत. रावसाहेब दानवे यांच्यासारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने उभे केलेले आव्हान चंद्रकांत दानवे यांच्यासमोर असले, तरी या वेळेस त्यांना काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांची साथ लाभणार आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी तीन-चार दिवसांतच घराबाहेर पडून जनसंपर्कास सुरुवात केली. त्यामध्ये प्रामुख्याने भोकरदन विधानसभा मतदारसंघातील भागांचा समावेश होता.

Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी

हेही वाचा >>>Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य

भोकरदन विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे हे भाजपचे सर्वोच्च नेते आहेत. परंतु विरोधातील महाविकास आघाडीत मात्र उमेदवारीसाठी मतभेद होते. राष्ट्रवादीच्या (शरद पवार) जाफराबाद नगरपंचायतीच्या अध्यक्षा सुरेखा लहाने यावेळी उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनीही महाविकास आघाडीत काँग्रेसने हा मतदारसंघ सोडवून घ्यावा, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न केले. परंतु हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच (शरद पवार) राहिला. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन निवडणूक लढविण्याची जबाबदारी आता महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्यावर आहे.

निर्णायक मुद्दे

● मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत जालना जिल्ह्यामध्ये निर्णायक ठरला होता. त्याचा फटका रावसाहेब दानवे यांना बसला. विशेषत: त्यांच्या मुलाच्या मतदारसंघातही ते पिछाडीवर राहिले. मराठा आंदोलनाची धग भाजपला बसली होती.

● विधानसभा निवडणुकीत ‘जरांगे फॅक्टर’ कितपत प्रभावी ठरतो यावरही निकालाची समीकरणे अवलंबून असतील. रावसाहेब दानवे यांच्यासाठी भोकरदनची निवडणूक कधी नव्हे एवढी प्रतिष्ठेची झालेली आहे.

Story img Loader