उल्हासनगरः गेली चार निवडणुका कलानी विरुद्ध आयलानी अशा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारी उल्हासनगर विधानसभा निवडणूक यंदाही याच वळणावर जात असल्याचे चित्र आहे. विद्यमान भाजप आमदार कुमार आयलानी यांना पुन्हा एकदा कलानींच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या चार खेपेला आलटून पालटून दोनदा दोन्ही गटांना आमदारकी मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कुणाचे वर्चस्व दिसते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

देशातील लोकसंख्येची घनता अधिक असलेले एक व्यापारी शहर म्हणून उल्हासनगर शहराची ओळख आहे. सोबत स्वातंत्र्यावेळी झालेल्या फाळणीत विस्थापित झालेल्या सिंधी बांधवांचे शहर म्हणूनही शहराची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षात उल्हासनगर शहरातील लोकसंख्या कमी पण समस्या अधिक वाढल्या आहेत. विद्यमान भाजप आमदार कुमार आयलानी दुसऱ्यांदा आमदार झाले खरे मात्र ते आपला प्रभाव पाडू शकले नाही. त्यात सध्या त्यांना भाजपातील अंतर्गत विरोधालाही सामोरे जावे लागते आहे. भाजपातीलच काही पदाधिकारी अंतर्गत कुरघोड्या करत असून त्यांना पक्षांतर्गत आव्हानांचाही सामना करावा लागणार आहे. त्याचवेळी उल्हासनगरच्या राजकारणात परतलेले माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलानी यांच्या प्रभावाखाली कुमार आयलानी यांना पुन्हा नव्याने निवडणूक लढावी लागणार आहे. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत कुमार आयलानी यांनी पहिल्यांदा पप्पू कलानी यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. मात्र २००९ च्या निवडणुकीत कुमार आयलानी यांनी पप्पू कलानी यांचा पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा चित्र बदलले. तुरुंगात असलेल्या पप्पू कलानी यांच्या पत्नी ज्योती कलानी यांनी कुमार आयलानी यांचा अवघ्या काही मतांनी पराभव केला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत कुमार आयलानी यांनी ज्योती कलानी यांचा पराभव करत पुन्हा आमदारकी मिळवली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – भाजप प्रदेश कार्यालयातून प्रसिद्धीमाध्यमे तडीपार ?

गेल्या २० वर्षात आयलानी विरुद्ध कलानी अशा संघर्षात कुमार आयलानी कायम असून त्यांच्याविरुद्ध कलानी कुटुंबातील पप्पू कलानी आणि त्यांच्या पत्नी ज्योती कलानी यांनी निवडणूक लढवली आहे. काही वर्षांपूर्वी ज्योती कलानी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा पुत्र ओमी कलानी निवडणुकीच्या रिंगणात तयारी करतो आहे. ओमी कलानी राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) पक्षाच्या वतीने इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली आहे. मात्र अद्याप ओमी कलानी यांची उमेदवारी जाहीर होऊ शकलेली नाही. कलानी यांनी आपला जाहिरनामा, कार्यकारिणी यापूर्वीच तयार केली आहे. यंदाच्या निवडणुकीतही कुमार आयलानी यांना कलानी कुटुंबातीलच सदस्याचे आव्हान असणार हे जवळपास निश्चित मानले जाते आहे.

राजकीय खिडची आणि उल्हासनगर

अशक्य अशा युती आणि आघाड्यांची राजकीय समिकरणे उल्हासनगरात अनेकदा पाहायला मिळाली आहेत. २०१७ च्या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांनी एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवली. त्यावेळी ओमी कलानी गटाने भाजपला साथ दिली. नंतर भाजपने त्यांना महापौरपद देत परतफेड केली. मात्र कालांतराने कलानी आणि भाजपात वाद झाले. परिणामी भाजपने कलानींना बाजूला सारले. २०१९ विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटाची कलानी यांना अपेक्षा होती. मात्र तिकीट कलानींना गेले. या काळात कलानी कुटुंबातील ज्योती कलानी या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदार होत्या. त्यांची सून पंचम कलानी या भाजपच्या महापौर होत्या. तर ओमी कलानी यांचा टीम ओमी कलानी (टीओके) यांचा स्वतंत्र गट होता.

यंदाची निवडणूक महत्वाची

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत टीम ओमी कलानीने महायुतीच्या शिवसेनेच्या पक्षाच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला. मात्र त्यांनी भाजपला विरोध कायम ठेवला. त्यांनी या पाठिंब्याला दोस्ती का गठबंधन असे नाव दिले. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा मिळाला. मात्र आता विधानसभेत शिवसेना आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठिंबा उल्हासनगरात कुणाला मिळतो हा प्रश्न आहे. शिंदे लोकसभेची परतफेड करतात की महायुतीचा धर्म पाळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – Uttar Pradesh Politics : उत्तर प्रदेशमध्ये १० पैकी नऊ जागांवरच पोटनिवडणूक का जाहीर झाली? अयोध्येतील मिल्कीपूरची पोटनिवडणूक का जाहीर झाली नाही?

पप्पू कलानी हे निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी त्यांचे पुत्र ओमी कलानी रिंगणात असणार आहेत. पप्पू कलानी यांनी शहरात विविध सामाजिक उपक्रम, कार्यक्रमात उपस्थिती दाखवून पुन्हा जुन्या पाठिराख्यांची जुळवाजुळव केली आहे. तर ओमी कलानी यांचा युवा वर्गात चांगला दबदबा आहे. कलानी यांची पार्श्वभूमी आणि त्यांचा जनसंपर्क याचा ओमी कलानी यांना कसा फायदा होत हे पाहणे महत्वाचे आहे.

Story img Loader