Republic Day 2023 : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाला इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल-सीसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यात इजिप्तला दिलेल्या भेटीदरम्यान अब्देल फतेह अल -सीसी यांना भारताकडून औपचारिक आमंत्रण दिले होते. दरम्यान यंदा अल-सीसी हे प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत आले असून, पंतप्रधान मोदींसोबत त्यांची आज(बुधवार) द्विपक्षीय बैठक झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बैठकीत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीस नव्याने पुढे नेण्यावर सहमती झाली. बैठकीनंतरच्या पत्रकारपरिषदेत परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले की, दोन्ही नेत्यांमधील आजच्या चर्चेचा मुख्य मुद्दा द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या रुपात पुढे नेणे आहे. ज्यामध्ये चार प्रमुख स्तंभ आहेत, राजकीय आणि सुरक्षा सहकार्य, आर्थिक सहभाग, वैज्ञानिक आणि शैक्षणिक सहकार्य, व्यापक सांस्कृतिक आणि लोकांमधील संपर्क यांचा समावेश आहे.

Republic Day 2023 : राज्यपालांचं जनतेला उद्देशून भाषण; म्हणाले, “महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची…!”

प्रजासत्ताक दिवशीच्या परेडमध्ये इजिप्तची सशस्त्र दलाची तुकडी –

परराष्ट्र सचिवांनी माहिती दिली की, इजिप्तची सशस्त्र दलाची तुकडीही प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभाग घेणार आहे. आज सकाळी अल -सीसी यांचे राष्ट्रपती भवनातील फोरकोर्टमध्ये औपचारिक स्वागत करण्यात आले, यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांची भेट घेतली.

सामाजिक-आर्थिक लोकशाहीचा अमृतकाळ

उपराष्ट्रपती धनखड यांना भेटणार इजिप्तचे शिष्टमंडळ –

इजिप्तचे शिष्टमंडळ उद्या(गुरुवार) सायंकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेणार आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सीसी यांची भेट ही दोन्ही देशांमधील अनोखे द्विपक्षीय संबंध दर्शवते, असे क्वात्रो यांनी सांगितले.

करोना संसर्गामुळे २०२१ आणि २०२२ या दोन वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ासाठी भारताकडून कोणत्याही देशाच्या नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले नव्हते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bilateral talks between pm modi and egyptian president el sisi msr
First published on: 25-01-2023 at 18:20 IST