२०२२ नंतर अशी एकही निवडणूक झाली नसेल की ज्या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपने अहमद पटेल यांना वादात ओढले नसेल. आणि आता अहमद पटेल यांच्या निधनानंतरही त्यांच्यावर आरोप केले जात आहेत असं गुजरातमधील एका काँग्रेस नेत्याचे म्हणणे आहे. २००२ च्या दंगली संदर्भात एसआयटीने कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड, निवृत्त डीजीपी आर बी श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी अहमद पटेल यांच्या “इशाऱ्यावर” काम केल्याचा आरोप करणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

अहमद पटेल आणि इतर काँग्रेसचे नेते हे राज्य सरकार बरखास्त करण्याच्या कटाचा एक भाग असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या मुद्यावरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आता वाकयुद्ध रंगले आहे. गुजरातमधील काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की ” भाजपाचे हे आरोप म्हणजे एक पूर्वनियोजित स्क्रिप्ट आहे. मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी केला जाणारा हा प्रयत्न आहे.  गुजरातमध्ये पक्षाच्या सर्व शक्तिशाली नेत्यांना आणि त्यांच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लक्ष करण्याचा हा प्रयत्न आहे. कोविडमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अहमद पटेल यांचे निधन झाले. शेवटपर्यंत पटेल सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव आणि जवळचे सहकारी राहिले आहेत. 

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. लोकसभा निवडणुकीला जेमतेम एक महिना उरला होता. त्यावेळी  मोदींनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत पटेल यांना ‘मित्र’ म्हटले होते. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले मोदी म्हणाले होते की त्यांनी पटेल यांच्या घरी जेवण. मोदी यांनी पटेल यांना ते बाबूभाई अशी हाक मारत असल्याचे संगितले होते. अहमद पटेल त्यांच्या जवळच्या लोकांमध्ये बाबूभाई या नावाने ओळखले जायचे. 

पटेल यांनी मोदींचे सर्व दावे हास्यास्पद, संभ्रम निर्माण करण्यासाठी केलेला राजकीय स्टंट असल्याचे सांगत सर्व दावे फेटाळून लावले. माझे म्हणणे चुकीचे आहे असे सिद्ध झाल्यास सार्वजनिक जीवनातून पायउतार होईल, असे ते म्हणाले. अहमदभाईंच्या प्रतिमेला आणि काँग्रेसला धक्का देण्यासाठी भाजपाचे नेते असे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे आमच्या पक्षातील अनेकांचा असा विश्वास बसला की अहमदभाईच काँग्रेसला जिंकू देत नव्हते,” असे काँग्रेसचे माजी आमदार म्हणतात.