Shehzad Poonawalla Statement: दिल्ली विधानसभेची निवडणूक जशी जवळ येत आहे, तसे राजधानीतील राजकीय वातावरण ऐन हिवाळ्यात तापू लागले आहे. चौकापासून ते टिव्हीच्या जाहीर चर्चांमध्ये भाजपा आणि आम आदमी पक्ष एकमेकांना भिडताना दिसत आहेत. एका टिव्हीवरील चर्चेत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ‘आप’चे नेते ऋतुराज झा यांच्या आडनावावरून टीका करताना अपशब्द उच्चारले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एनडीएतील घटक पक्ष असलेल्या जनता दलाचे (संयुक्त) राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी हा एका समुदायाचा अवमान असल्याचा मुद्दा उपस्थित करत पूनावाला यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. दिल्लीमध्ये पुर्वांचल समाजाची मोठी संख्या आहे. पूनावाला यांच्या विधानामुळे ही मतपेटी दूर होऊ नये, यामुळे भाजपानेही तात्काळ डॅमेज कंट्रोल करत पुनावाला यांना माफी मागण्यासाठी भाग पाडले.

‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शहजाद पूनावाला यांच्या विधानामुळे पूर्वांचल समाजाचा अवमान झाल्याचे म्हटले. त्यानंतर जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की, एनडीएमधील एका नेत्याने केलेल्या विधानामुळे पूर्वांचल समुदायाचा अवमान झाला आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना काळजी घ्यायला हवी. तसेच संवेदनशीलता बाळगायला हवी. संबंधित नेत्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही भाजपाकडे केली आहे.

Chhagan Bhujbal On Pankaja Munde
Chhagan Bhujbal : “…तर वेगळा पक्ष उभा राहील”, पंकजा मुंडेंच्या विधानावर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “एका समाजावर पक्ष…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Veteran singer Asha Bhosle statement on Narendra Modi and Yogi Adityanath
म्हणून मला मोदी अन् योगी आवडतात….ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वक्तव्य
लाडक्या बहिणींची महायुतीकडून फसवणूक; दिलेली मते परत घेणार का, उद्धव ठाकरे यांचा सवाल
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
PM Narendra Modi Speech
JKF’S Forgotten Crisis हे पुस्तक विरोधकांनी वाचावं, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का दिला? नेहरुंबाबत काय दावे आहेत?
AnJali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania : “दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “खरंतर मला…”
Dhananjay Munde On Anjali Damania:
Dhananjay Munde : “धादांत खोटे आरोप, पण ज्याने कोणी आरोप करण्याचं काम दिलं असेल…”, अंजली दमानियांच्या आरोपाला धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

एनडीएमधूनच विरोध झाल्यानंतर शहजाद पूनावाला यांनीही एक्सवर याबद्दल पोस्ट केली. “माझ्या विधानामुळे पूर्वांचलमधील माझ्या बंधू-भगिनींना दुःख झाले, याबद्दल मी मनापासून माफी मागतो. याबद्दल मला कोणतेही कारण द्यायचे नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील सर्वच नागरिकांचा मी आदर करतो, पुन्हा एकदा माफी मागतो”, अशी पोस्ट पूनावाला यांनी केली.

आम आदमी पक्षाने पूनावाला यांचे विधान उचलून धरल्यानंतर पूनावाला यांना तात्काळ माफी मागावी लागली. कारण ५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार आहे. दिल्लीत पूर्वांचल समुदायाची मोठी मतपेढी असून जवळपास एक तृतीयांश मतदार पूर्वांचलमधून येतात. भाजपाला उच्च मध्यम वर्ग, व्यापारी आणि पंजाबी समाजाचा पाठिंबा आहे, त्यातच जर पूर्वांचल मतदारांनी भाजपाला पाठिंबा दिल्यास त्यांचा विजय सुकर होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. अशावेळी पूनावाला यांच्या विधानामुळे पुर्वांचलची मतपेटी दुरावण्याची शक्यता होती.

मंगळवारी शहजाद पूनावाला यांनी टीव्हीवर सदर विधान केल्यानंतर भाजपाचे ईशान्य दिल्लीचे खासदार आणि पूर्वांचलमधून येणारे मनोज तिवारी यांनीही पूनावाला यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. ते म्हणाले, “पूनावाला यांच्या विधानाचा मी निषेध करतो. तुम्हाला टीव्हीवर समोरच्याने कितीही उसकवू द्या, पण भाजपाचे प्रवक्ते या नात्याने तुम्हाला शांत, संयमितपणे उत्तर द्यायला हवे. पक्ष यावर नक्कीच भूमिका मांडेल, पण मला व्यक्तीशः वाटते की, पूनावाला यांनी बिनशर्त माफी मागायला हवी.”

पूनावाला आणि झा कोण आहेत?

‘आप’चे नेते ऋतुराज झा हे किरारी विधानभेचे आमदार आहेत. पूर्वांचलबहुल असलेल्या या मतदारसंघात त्यांनी २०१५ साली पहिल्यांदा ६१.७ टक्के मते घेत विजय मिळविला. त्यानंतर २०२० साली ४९.८ टक्के मते घेऊन ते पुन्हा विजयी झाले. तर पसमंदा मुस्लीम समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे पूनावाला यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. भाजपाच्या वरिष्ठ प्रवक्त्यांमध्ये त्यांचा क्रमांक लागतो ते गांधी कुटुंबावर आक्रमक टीका करतात.

पूनावाला यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर ऋतुराज झा यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, “मी पूर्वांचलच्या मैथिली ब्राह्मण समुदायातून येतो. भाजपाच्या प्रवक्त्याने फक्त माझाच नाही तर पूर्वांचलमधील लोकांचा अवमान केला आहे. आगामी निवडणुकीत पूर्वांचलचे लोक याला कडक उत्तर देतील.”

झा यांच्या पोस्टनंतर पूनावाला यांनी म्हटले की, आम आदमी पक्ष हा खोटारडा पक्ष आहे. टीव्ही चॅनेलवरील चर्चेत त्यांनी माझ्या आडनावाचा आक्षेपार्ह पद्धतीने उल्लेख केला. ‘आप’च्या खोटारड्या प्रचाराविरोधात मी आमरण उपोषण सुरू करत आहे.

भाजपा दिल्लीतील किती जागा लढवत आहे?

भाजपाने दिल्लीतील ७० जागांपैकी ६८ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच एनडीएतील मित्रपक्ष जेडी(यू) आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांना दोन जागा सोडल्या आहेत. बिहारमधील या दोन पक्षांची मदार पुर्वांचलमधून येणाऱ्या मतदारांवर असणार आहे. यासाठीच त्यांनी माफी मागण्याची मागणी केली असता भाजपाने त्यावर तातडीने कारवाई केली.

Story img Loader