आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वादंग उठला असून पुण्यात भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली… लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेसमधील नेते विविध मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करत असल्याचा संताप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला… मंत्रालयात ३५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आलेल्या लिपिकाला पुन्हा त्याच्या मूळ विभागात पाठविण्यासाठी मंत्री झिरवाळ यांनी सामान्य प्रशासन विभागाला लिहिले… आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही मतदारसंघातून उभे राहा तुमची खुमखुमी पूर्ण करतो, असे आव्हान खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपाचे नेते गणेश नाईक यांना दिले… माझ्या वक्तव्याची मोडतोड करून भाजपाला राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
भाजपा-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेस भवन समोर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली. यावेळी दगड भिरकावण्यात आल्याने काही कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांच्याशी तुलना केली. त्याबाबतची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. याप्रकरणी पुण्यातील भाजपाचे शहराध्यक्ष धीरज धाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पर्वती पोलीस ठाण्यात सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या शहरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
अमित शाह यांचा राहुल गांधींवर संताप
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल यांनी अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. अमेरिकेशी व्यापार करार करून मोदींनी शेतकऱ्यांसह देश विकून टाकला, अशी टीका त्यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातून केली. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींच्या विधानावर संताप व्यक्त केला. काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करीत आहेत. मोदी सरकारने व्यापार करारांमध्येही शेतकरी आणि डेअरी क्षेत्राचे हित सुरक्षित ठेवले आहे, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे, ते गुजरात येथील एका कार्यक्रमात बोलत होते. मनमोहन सिंग सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांकडून किती धान्य खरेदी करण्यात आले आणि नरेंद्र मोदी सरकारच्या १० वर्षांत किती धान्य खरेदी झाले हे राहुल यांना दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित करताना शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी कोणत्याही मंचावर चर्चेला तयार आहे, असे आव्हान शाह यांनी राहुल गांधी यांना दिले.
आणखी वाचा : वंदे मातरम विरुद्ध जन गण मन; बंगालमध्ये राजकीय वादंग का उठला? कारण काय?
मंत्री झिरवाळ यांचे सामान्य प्रशासन विभागाला पत्र
मंत्रालयात ३५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आलेल्या लिपिकाला पुन्हा त्याच्या मूळ विभागात पाठविण्यासाठी मंत्री झिरवाळ यांनी सामान्य प्रशासन विभागाला लिहिले. या पत्रात त्यांनी १२ फेब्रुवारी रोजी आपल्या कार्यालयात राजू ढेरिंगे यांच्याविरोधात झालेल्या कारवाई संदर्भात सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, अशा सूचनाही दिल्या. मंत्रालयातील झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजू ढेरिंगे याला लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. यासाठी लाचलूचपत प्रतिबंध विभागाला गृह विभागाकडून परवानगी मिळाली होती. अशा वृतीच्या लोकांना कोणीही पाठिशी घालणार नाही. मंत्रालयातील संबंधित लाचखोरी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही, असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले. इतकेच नाही तर प्रकरणाची लिंक जर माझ्यापर्यंत आली, तर मी नक्कीच राजीनामा देईन, असे म्हटले होते. या कारवाईमुळे विरोधकांकडून मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. यावर आता स्वत: झिरवाळ यांनी कार्यवाही सुरू केली असून त्यांनी यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहिले आहे.
श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईक यांना खुले आव्हान
आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही मतदारसंघातून उभे राहा तुमची खुमखुमी पूर्ण करतो, असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपाचे नेते गणेश नाईक यांना दिले. अंबरनाथ शहरातील शिलाहारकालीन शिव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिंदे आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी नाईक यांच्यावर तोंडसुख घेतले. गेल्या काही महिन्यांपासून गणेश नाईक सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. नगर विकास विभाग, कल्याण लोकसभा मतदारसंघ यावरही अनेकदा गणेश नाईक बोट ठेवले आहे. ठाणे महापालिकेत शतप्रतिशत भाजपाची घोषणा निवडणुकीपूर्वी नाईक यांनी करत शिंदे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नाईकांना स्मृतिभंश हा मानसिक आजार झाला आहे. त्यामुळे ते किती वेळा माजी झाले आहेत ते विसरत आहेत. त्यांनी शिंदेंच्या आणि विशेषतः श्रीकांत शिंदे यांच्या नादी लागू नये, अशा इशाराच शिवसेना खासदाराने दिला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपावर गंभीर आरोप
माझ्या वक्तव्याची मोडतोड करून भाजपाला राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून संविधानाची निर्मिती झाली आहे, असेही ते म्हणाले. सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केल्याने भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून आंदोलने सुरू केली आहे. महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरू आहे, समाजात द्वेष पसरवला जात आहे, या पार्श्वभूमीवर सर्व महामानवांचे फोटो कार्यालयात सोबत लावावेत का? आणि विशेष छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांचे फोटो आजूबाजूला असावेत का या मागणीकडे आपण कसे बघता? असा प्रश्न पत्रकारांनी मला विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मी वक्तव्य केले होते. मात्र, भाजपाने माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले. त्याद्वारे भाजपाचा राज्यात दंगली घडवण्याचा डाव आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला…. या बातमीसाठी मराठी व इंग्रजी कीवर्ड आणि यूआरएल तयार करून द्या….

