आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन सध्या तिहारमधील तुरुंगात आहेत. काही दिवसांपूर्वी तुरुंगात मसाज घेताना तसेच फलाहार करतानाचे त्यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. याच व्हिडीओचा आधार घेत भाजापने गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या आरोपीला व्हीआयपी व्यक्तीसारखी वागणूक दिली जात आहे, असा आरोप केला होता. हा वाद मागे पडत असताना आता भाजपाने सत्येंद्र जैन यांची रवानगी दिल्ली बाहेरील तुरुंगात करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा >>> नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, ठाकरे गट शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता

Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
Arvind Kejriwal ED custody
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का, न्यायालयाने ‘या’ तारखेपर्यंत वाढवली ईडी कोठडी
PM Narendra Modi ED Arrest
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही झाली होती ईडी चौकशी’; भाजपाचे नेते म्हणाले, “ते नऊ तास…”

तरुंगातील कोठडी दुसरे दिल्लीचे सचिवालय

सत्येंद्र जैन यांची तिहार तरुंगातील कोठडी दिल्लीच्या सचिवालय कार्यालयाचे विस्तारीत रुप झाले आहे. केजरीवाल यांनी अद्याप जैन यांचा राजीनामा घेतलेला नाही, अशी टीका दिल्ली भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केला आहे. “मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांचा राजीनामा घ्यायला हवा. तसेच उपराज्यपालांनी जैन यांना लवकरात लवकर दिल्लीबाहेरील तुरुंगात पाठवावे,” अशी मागणी सचदेवा यांनी केली आहे.

हेही वाचा >>> ‘मला जेलमध्ये योग्य अन्न मिळत नाही’, सत्येंद्र जैन यांची कोर्टात याचिका, भाजपाने व्हिडीओ शेअर करत केला भांडाफोड, सीसीटीव्ही व्हायरल

अगोदर व्हायरल झाला होता व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ ट्वीट केला होता. या व्हिडीओमध्ये अटकेत असलेले सत्येंद्र जैन एका व्यक्तीकडून मसाज घेताना दिसत होते. “शिक्षे देण्याऐवजी सत्येंद्र जैन यांना व्हीव्ही आयपी मजास मिळत आहे. तिहार जेलमध्ये मसाज दिला जातोय. गेल्या पाच महिन्यांत जामीनही न मिळालेल्या हवालाबाज व्यक्तीला मसाज मिळतोय. आपच्या कार्यकाळात तिहार जेलमध्ये नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे”, अशी टीका पूनावाला यांनी ट्वीटमधून केली आहे. पूनावाला यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे आप पक्षावर चांगलीच टीका केली जात होती.

हेही वाचा >>> धक्कादायक : नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; दाऊदच्या नावाने फोन करून मागितली खंडणी!

मालीश घेतानाच्या व्हिडीओमुळे वाद

त्यानंतर मालीश घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सत्येंद्र जैन कारागृहात जेवणाचा आस्वाद घेताना दिसत होते. याच व्हिडीओचा आधार घेत “एखाद्या रिसॉर्ट किंवा सुट्टीवर असल्याप्रमाणे त्यांना जेवण पुरवलं जात आहे. केजरीवालजी यांनी या हवालाबाजला शिक्षा नव्हेत तर व्हीव्हीआयपी मजा मिळेल याची खात्री केली आहे,” असे ट्वीट शेहजाद पूनावाला यांनी केले होते.