महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये अजूनही ताळमेळ नसताना आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीकरिता मतदारसंघनिहाय प्रमुख नेमून भाजपने पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशपाठोपाठ लोकसभेच्या जागा असलेल्या राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजपने वर्षभर आधीच मतदारसंघनिहाय व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.

लोकसभेच्या सर्व ४८, तर विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी भाजपने निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त्या करताना शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार व आमदार असलेल्या मतदारसंघांमध्येही निवडणूक प्रमुख नेमल्याने भाजपच्या नेत्यांच्या मनात नक्की काय घोळत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला. पण शिंदे गटाच्या खासदार व आमदारांच्या मतदारसंघात नेमलेले निवडणूक प्रमुख हे शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

BSP, Nagpur, Ramtek, BSP Nagpur,
नागपूर, रामटेकमध्ये बसपाच्या मतांना ओहोटी, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत…
loksatta editorial Supreme court descion regarding candidate affidavit on asstets
अग्रलेख: अपवादांचा अपराध!
During the Lok Sabha elections under all the six major parties in the Maharashtra state
सर्वपक्षीय खदखद! प्रमुख सहा पक्षांमध्ये उमेदवारीवरून नाराजीनाट्य, अनेक मतदारसंघांत बंडखोरी
अकोला पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेस आणि ठाकरे गट लढण्यावर ठाम

हेही वाचा – मराठवाड्यात उद्धव ठाकरे गटास सहानुभूती असूनही आवाज मात्र क्षीण

लोकसभेत भाजपची मदार उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान अशा राज्यांवर आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये राज्यातून भाजपचे (शिवसेनेसह) ४० पेक्षा अधिक खासदार निवडून आले आहेत. यंदाही भाजपने ४५ खासदार जिंकण्याचा निर्धार केला आहे. मोदी लाट आणि शिवसेनेची साथ यामुळे भाजपला दोन्ही वेळा जागा जिंकणे शक्य झाले होते. यंदा राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीशी लढत द्यावी लागणार आहे. तीन पक्ष एकत्र लढल्यावर निकाल बदलतो हे विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निकालांतून तसेच विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये अनुभवास आले. यामुळे यंदा भाजपसमोर कडवे आव्हान असेल. शिंदे गटाच्या ताकदीचा अद्याप अनुभव आलेला नाही. काही मतदारसंघांत शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची ताकद किंवा मते आहेत. पण राज्यभर शिंदे गटाचा कितपत प्रभाव पडेल याबाबत भाजपमध्ये साशंकता व्यक्त केली जाते.

हेही वाचा – अखेर मुहूर्त ठरला! २३ जूनला विरोधकांची बैठक; राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह बडे नेते उपस्थित राहणार!

मतदारसंघनिहाय आतापासून निवडणुकांची तयारी करण्यात येणार आहे. मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नेमताना खासदार व आमदारांना विश्वासात घेण्यात आले. पक्षांतर्गत मतभेद वाढू नयेत अशी खबरदारी पक्षाने घेतली. विधानसभेसाठी गेल्या वेळी पराभूत झालेल्या उमेदवारांनाच बहुसंख्य मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. निवडणूक प्रमुख नेमल्याने पक्षांतर्गत वाद वाढणार नाहीत याची मात्र भाजपच्या नेत्यांना खबरदारी घ्यावी लागेल. कारण नेमणुका होताच काही ठिकाणी निवडणूक प्रमुखांचे अभिनंदन करणारे फलक झळकू लागले आहेत. उमेदवारीवरून निवडणूक प्रमुख व अन्य नेत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.