२०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने रणनिती आखण्यास सुरवात केली आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपाची ताकद कमी आहे अशा राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न पक्षाने सुरू केला आहे. हैदराबादमध्ये होणार्‍या राष्ट्रीय कार्यकारिणीचा हेतूसुद्धा हाच असल्यामुळे हे अधिवेशन हैदराबाद येथे घेण्यात येत आहे. दक्षिण भारतात हे अधिवेशन घेऊन तेथील राज्यांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. येणाऱ्या निवडणूका लक्षात घेऊन या अधिवेशनात ‘ घराणेशाही मुक्त भारत’ ही देण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये शुक्रवारी संध्याकाळी सरचिटणीसांची आणि शनिवारी सकाळी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याशिवाय पक्षाच्या राजकीय आणि आर्थिक अजेंड्यावर या अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे. शेवटच्या दिवशी  सिकंदराबाद येथील परेड ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेने या अधिवेशनाचा समारोप होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाच्या एका जेष्ठ नेत्याने सांगितले की “२०२४ च्या प्रचाराची दिशा ही ‘घराणेशही मुक्त भारत’ असणार आहे. या मोहिमेत दक्षिणेकडील राज्यांसह देशातील सर्व प्रादेशिक पक्षांचा समावेश असणार आहे. घराणेशाहीचे राजकारण हे लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका असून यामुळेच भ्रष्टाचार आणि इतर गैरकृत्य वाढत असल्याचा संदेश या अधिवेशनातून देण्यात येईल. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-मुक्त भारत आणि भ्रष्टाचारमुक्त भारत ह्या भाजपच्या प्रमुख घोषणा होत्या. यावेळी ‘घराणेशाही मुक्त भारत’ घोषणा असणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतील भाजपाच्या जेष्ठ नेत्यांच्या भाषणांमधून नव्या घोषणेचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल.

भाजपाच्या एका नेत्याने पुढे सांगितले की, “ही बैठक हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली आहे. यावरून स्पष्ट संदेश मिळतो की पुढील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपचे लक्ष दक्षिणेकडील राज्यांवर असणार आहे. दक्षिणेत अजूनही भाजपाची ताकत कमी आहे. त्यामुळे या भागात पक्ष विस्ताराच्या दृष्टीने भाजपाने काम सुरु केले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणांमध्ये वारंवार घराणेशाहीच्या राजकारणावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले होते की” भाजपा हा पक्ष देशासाठी समर्पित आहे. मात्र असे असूनही सध्या पक्ष नेत्यांच्याकुटुंबांना समर्पित होताना दिसत आहे”.

या भाषणात पुढे  मोदी म्हणाले होते की ‘या देशात अजूनही दोन प्रकारचे राजकारण सुरू आहे. “एक म्हणजे कौटुंबिक भक्तीचे राजकारण आणि दुसरे देशभक्तीचे राजकारण’. घराणेशाहीचे राजकारण करणारी लोक ही वेगवेगळ्या राज्यातील असूनही ते घराणेशाहीच्या धाग्याने बांधलेले आहेत. हेच नेते एकमेकांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालत असतात. राष्ट्रीय स्तरावर आणि काही राज्यांमध्ये असे काही राजकीय पक्ष आहेत जे केवळ आपल्या कुटुंबाच्या हितासाठी काम करतात. घराणेशाहीच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्था ते संसदेपर्यंत फक्त एकाच कुटुंबातील सदस्यांचे नियंत्रण असते. अशा कौटुंबिक पक्षांनी या देशातील तरुणांची प्रगती कधीच होऊ दिली नाही”.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp is now concentrating on the south region of india pkd
First published on: 01-07-2022 at 15:38 IST