कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला लागले आहे. वर्तमान सत्ताधारी भाजपाकडून पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री बोम्मई आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष नलीन कतील यांनी भावनिक मुद्द्यांना हात घालण्याचा सपाटा लावला आहे. तरिही कर्नाटक भाजपामधील काही ज्येष्ठ नेत्यांना या रणनीती बाबत साशंकता वाटते. खासकरुन प्रदेशाध्यक्ष नलीन कतील यांनी कार्यकर्त्यांना ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करुन इतर विकासाच्या मुद्द्यांना कमी महत्त्व द्यायला सांगितले आहे. ही बाब पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांना रुचलेली नाही.

अमित शाह यांनी केली मंदिर विरुद्ध टिपू अशी मांडणी

काही दिवसांपुर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचा दौरा करुन काही सभा घेतल्या. यावेळी ते म्हणाले की, “२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमधील जनतेला मंदिर निर्माण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्यांनी टिपू सुलतानला महत्त्व दिले अशा दोन लोकांमधून एकाला निवडायचे आहे.” त्यानंतर नलीन कतील यांनी लव्ह जिहादवरुन केलेल्या वक्तव्यावरुन भाजपातील नेते असा अंदाज काढत आहेत की, भाजपाला यावेळी सरकारच्या कामगिरीवर मतं मिळतील याबाबत विश्वास वाटत नाही.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
Kerala CM Pinarayi Vijayan
‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ हे नारे रचणारे मुस्लीम होते; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दावा
arvind kejriwal
लालकिल्ला: सहानुभूतीच्या लाटेवर केजरीवाल?

रस्ते, गटर यापेक्षा लव्ह जिहादचा मुद्दा घ्या

यावर्षी मे महिन्यात कर्नाटकात निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र भाजपाने लव्ह जिहादसारख्या मर्यादित असलेल्या मुद्द्याला अधिक महत्त्व दिलं आहे. त्यावरुन लोकांमध्ये जाण्यासाठी भाजपाकडे विकासाचे मुद्दे नसल्याचा कयास बांधला जात आहे. मंगळुरु येथे बुथ विजय अभियानात कार्यकर्त्यांना संबोधित करताना दक्षिण कन्नडचे खासदार नलीन कतील म्हणाले, “मी तुम्हाला सांगतो की, रस्ते, सीवेज यासारखे मुद्दे खूप छोटे आहेत. यापेक्षा अजून मोठे विषय आहेत. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी चिंता करत असाल तर तुम्हाला लव्ह जिहादला थांबवावं लागेल आणि त्यासाठी भाजपाची सत्ता असणं आवश्यक आहे. भाजपाच लव्ह जिहादला हद्दपार करु शकते.”

काही महिन्यांआधी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नवी दिल्लीचा दौरा केला होता. यावेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांना पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करायला सांगितले होते. मात्र त्यांनी वेगळे मुद्दे मांडले. शाळा – महाविद्यालयांमध्ये हिजाबला बंदी घालण्याचे निर्देश आणि हलाल मांस यावरुन सुरु असलेल्या वादांचा भाजपाला फायदा होईल. यामुळे काही मतदारसंघात कट्टर हिंदू मतं आपल्याला मिळतील, असे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले.

याआधी देखील बहुमत मिळवण्यात भाजपा अपयशी

२०१८ साली जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या, तेव्हा भाजपाला बहुमत मिळू शकलेले नव्हते. काँग्रेस – जेडी (एस) यांच्या आघाडीचे सरकार पाडून भाजपाला सत्ता मिळाली होती. भाजपातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “कतील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला पक्षातूनच आव्हान दिले जात होते. त्यामुले मागच्या काही महिन्यांपासून ते भावनिक मुद्द्यांच्या आधारे मतदारांना प्रभावित करण्याता प्रयत्न करत आहेत.” मात्र ज्यापद्धतीने ते वक्तव्य करत आहेत. ते चुकीचे असल्याचे इतर नेत्यांचे म्हणणे आहे.

कतील यांच्या सततच्या वादग्रस्त विधानांमुळे ते पूर्ण कर्नाटकाचे नेते होऊ शकत नाहीत. ते फक्त दक्षिण कन्नडचे खासदार म्हणून राहू शकतात, अशी टीप्पणी एका वरिष्ठ भाजपा नेत्याने केली आहे. कतील हे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांचे निकटवर्तीय मानले जातात. दोघांच्याही अवतीभवती वाद आहेत. एका खासदाराने सांगितले की, कतील यांचे वक्तव्य हे पंतप्रधान मोदींच्या विकासात्मक ध्येयाच्या विरोधात आहेत.