scorecardresearch

Premium

Gujarat Election: “आम आदमी पार्टी शर्यतीत नाही, मुख्य लढत भाजपा-काँग्रेसमध्ये होणार” अमित शाहांचं मोठं विधान

गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी मोठं विधान केलं आहे.

amit shah on gujarat election
संग्रहित फोटो

गुजरात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रचार करत आहेत. यंदाची निवडणूक काहीशी वेगळी ठरणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आम आदमी पार्टी आपल्या पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरली आहे. त्यामुळे गुजरात विधानसभेच्या अनेक जागांवर चुरस पाहायला मिळणार आहे.

अशी एकंदरीत स्थिती असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं आहे. “गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी शर्यतीत नाही, येथे भाजपा आणि काँग्रेस पक्षात लढत होईल” असं विधान अमित शाह यांनी केलं आहे. ते ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. गुजरातमधील लोकांच्या आशीर्वादामुळे भारतीय जनता पार्टी १९९० पासून प्रत्येक निवडणूक जिंकत आहे, असंही शाह म्हणाले.

Yavatmal-Washim Lok Sabha constituency
शिंदे गटासाठी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघ अडचणीचा ठरणार! भाजपसंबंधित खासगी संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
HD Deve Gowda Interview Sharad Pawar Nitish Kumar
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू एनडीएत जाणार? माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा दावा
PRIYANKA GANDHI AND RAHUL GANDHI (2)
Womens Reservation Bill : २०२२ साली काँग्रेसने केला होता अनोखा प्रयोग, तब्बल ४० टक्के महिलांना दिले होते तिकीट, निकाल मात्र निराशाजनक!
Samajwadi-Party-in-Chhattisgarh-Assembly-Election
समाजवादी पक्षाचा ‘इंडिया’ आघाडीत खोडा? छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारच्या विरोधात ४० जागा लढविणार

हेही वाचा- Gujarat Assembly Election : काँग्रेसची साथ सोडलेल्या हार्दिक पटेलला वीरमगावमधून उमेदवारी; भाजपा नेते म्हणतात ‘लढवय्या नेता’

गुजरात विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळेल, असं अनेकांना वाटू शकतं. पण निकाल लागल्यावर आपल्याला कळेल की ही तिरंगी लढत होती की नाही. तथापि, गुजरातमध्ये अलीकडच्या बऱ्याच वेळा तिरंगी लढत पाहायला मिळाली आहे. अलीकडेच शंकरसिंह वाघेला यांनी यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. त्याआधी केशुभाई पटेल यांनीही त्यांच्या नवीन पक्षाची स्थापना केली होती. त्याआधी चिमणभाई पटेल यांनीही त्यांचा पक्ष स्थापन केला होता. रतुभाई अदानी यांनीही स्वतःचा पक्ष काढला. या सर्व घटनांमध्ये गुजरातच्या लोकांनी फक्त दोनच पक्षांवर शिक्का मारला” असं शाह म्हणाले.

हेही वाचा- Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये ‘या’ मतदारसंघात होणार पिता-पुत्रामध्ये लढत, आप पक्षामुळे गणित बिघडले

विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत भाजपा आणि आम आदमी पार्टीत मुख्य चुरस पाहायला मिळेल, असं विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष शर्यतीत नसेल, असं त्यांनी म्हटलं होतं. यावरही अमित शाहांनी टिप्पणी केली. काँग्रेसला या निवडणुकीत पाचपेक्षा कमी जागा मिळतील, असं शाह म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader amit shaha on gujarat election bjp aap congress rmm

First published on: 16-11-2022 at 23:57 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×