पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकेकाळी बालेकिल्ला मानला जात असलेल्या पिंपरी-चिंचवडवर भाजपने लक्ष घातले आहे. गुजरातचे माजी गृहमंत्री प्रदीपसिंग जडेजा यांच्याकडे शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघाची प्रवासी प्रभारी नेता म्हणून भाजपने जबाबदारी सोपविली आहे. शिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेडची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.

पिंपरी-चिंचवड शहर एकेकाळी अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी त्यांची साथ सोडली. भाजपने जगताप, लांडगे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. महापालिकेवर ‘कमळ’ फुलविले मात्र, शहरात झालेल्या विकास कामांमुळे पवार यांना मानणारा मोठा वर्ग आजही कायम आहे. त्यामुळे भाजपने शहरातील पक्षाच्या जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांना विविध पदे देत ताकद दिली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्याकडे महापालिकेतील निर्णयांचे सर्वाधिकार दिले. अमर साबळे यांना राज्यसभेची खासदारकी तर महिला मोर्चाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, अमित गोरखे यांना विधानपरिषदेवर आमदार केले. माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांना तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, सचिन पटवर्धन यांना लेखा समितीचे अध्यक्षपद देत राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. आता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपदही शहरातच दिले आहे.

Shivsena Pune, Shivsena presence in Pune,
आव्वाज कुणाचा?
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
tore down the banner of former BJP MLA Narendra Pawar
कल्याणमध्ये भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांचे फलक अज्ञातांनी फाडले
ncp names yogesh behl as pimpri chinchwad city president
पिंपरी : अखेर तीन महिन्यांनी अजितदादांच्या पक्षाला बालेकिल्ल्यात मिळाला शहराध्यक्ष; ‘या’ नावावर शिक्कामोर्तब
sushma andhare devendra bhuyar
“तीन नंबरची गाळ मुलगी शेतकऱ्यांच्या पोरांना…”; आमदार देवेंद्र भुयार महिलांविषयी जे बोलले त्यामुळे…
Malvan, Badlapur, statue of Shivraji Maharaj,
शिवरायांच्या पुतळ्याबाबत बदलापुरात मालवणची पुनरावृत्ती ?
CM Eknath Shinde his party leaders turning their backs on Mathadi Mela become topic of discussion
नवी मुंबई : माथाडी राजकारणाला शिंदे गटाची बगल? मराठाबहुल मेळाव्यावर भाजपचा प्रभाव
Chhatrapati Sambhajinagar, Amravati,
अमरावती, छत्रपती संभाजीनगरच्या ज्वारी खरेदी उद्दिष्टाला कात्री; अकोल्यासह पाच जिल्ह्यांच्या…

हेही वाचा : TMC : कोलकाता बलात्कार प्रकरणावरून ममता बॅनर्जी गटाचे खासदार अभिषेक बॅनर्जींशी मतभेद? पक्षात दोन गटांची वेगळी मतं!

परिणामी, शहरातील भाजपची ताकद वाढली असून चार आमदार आहेत. सर्वात ताकदवान भाजप आहे. भाजपचा शहरातील प्रमुख विरोधक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच भाजपसोबत आला. अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा शहरावर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे आगामी काळात शहरातील वर्चस्ववारुन भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पिंपरीचे अण्णा बनसोडे हे एकमेव राष्ट्रवादीचे आमदार आहेत. महायुती एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार असून ज्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे, त्या पक्षाला मतदारसंघ असे प्राथमिक सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे चिंचवड आणि भोसरी भाजपकडे कायम राहण्याची चिन्हे आहेत. भाजपने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. तिन्ही विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असलेले गुजरातचे माजी गृहमंत्री प्रदीपसिंग जडेजा यांनी शहरात येत आढावा घेतला. बूथ रचना, मतदार नोंदणीबाबत माहिती घेतली. निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले. विरोधकांच्या खोट्या कथानकाला (नरेटिव्ह) जशास तसे उत्तर देण्याच्या सूचना जडेजा यांनी दिल्या.

हेही वाचा : J&K Assembly Election 2024 : “पीडीपी आणि एनसीने आधी दहशतवादी असलेल्या लोकांचा प्रचारासाठी..”, भाजपाच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीत तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य होते. तिन्ही मतदारसंघात भाजपाची पकड मजबूत आहे. विधानसभेला मोठ्या मताधिक्याने भाजपसह महायुतीचे उमेदवार निवडून येतील.

शंकर जगताप (शहराध्यक्ष, भाजप)