scorecardresearch

“डाव्या पक्षातील हिंदू मतदारांमुळे नंदीग्राममधून विजय झाला”, भाजपाचे नेते सुवेंधू अधिकारांची दावा

“तृणमूल पेक्षा बंगालमध्ये कम्युनिस्ट पार्टी इंडिया…”

“डाव्या पक्षातील हिंदू मतदारांमुळे नंदीग्राममधून विजय झाला”, भाजपाचे नेते सुवेंधू अधिकारांची दावा
सुवेंदू अधिकारी

२०१९ साली पश्चिम बंगलामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजपात अटीतटीची लढाई झाली होती. या निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यात सामना झाला होता. यामध्ये सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. अशात सुवेंदू अधिकारी यांनी मोठा खुलासा केला आहे. डाव्या पक्षातील हिंदू मतदारांनी मतदान केल्यामुळे आपला विजय झाला, असं सुवेंदू अधिकारी यांनी सांगितलं. यानंतर बंगालमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिदनापूर येथे एका रॅलीला संबोधित करताना अधिकारी यांनी सांगितलं की, “डाव्या पक्षातील हिंदू असलेल्या एका मोठ्या वर्गाने आपल्याला मतदान केलं. त्यामुळेच नंदीग्रामध्ये आपला विजय झाला आहे. तृणमूल पेक्षा बंगालमध्ये कम्युनिस्ट पार्टी इंडिया ( मार्क्सवादी ) मजबूत होती. २३५ जागांसह सीपीआय ३४ वर्षे सत्तेत होती. सर्व डावे वाईट नाही आहेत. तसेच, भाजपात अनेक डावे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे,” असं सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं. मात्र, सीपीआयने अधिकारी यांचा दावा फेटाळला आहे.

हेही वाचा : ‘भाजपाचं काम द्वेष पसरवणं, भारताला मात्र बंधुता प्रिय’, पंजाबमध्ये येताच राहुल गांधीचा हल्लाबोल

२०२१ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या निवडणुकीत अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा १९५६ मतांनी पराभव केला होता. निवडणुकीत अधिकारी यांना ४८.४८ टक्के ममता बॅनर्जी यांना ४७.६४ टक्के आणि सीपीआयच्या उमेदवार मिनाक्षी मुखर्जी यांना २.७४ टक्के मते मिळाली होती. थोडक्या मतांनी ममता बॅनर्जींचा पराभव झाला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 19:30 IST

संबंधित बातम्या