वर्धा : भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानात काही आमदारांची कामगिरी अव्वल तर काही तळाशी गेल्याची आकडेवारी आहे. हे अभियान जोरात सूरू आहे. १ ते १५ जानेवारी दरम्यान हे अभियान चालणार आहे. ५ जानेवारीस विशेष अभियान राबविण्यात आले. त्यात मंत्री, खासदार, आमदार यांनाही स्वतः सहभागी होत नोंदणीत पुढाकार घेणे अपेक्षित होते. गतवेळी  सदस्य नोंदणीच्या आधारे भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करण्यात आला होता. आताही त्याच दिशेने वाटचाल सूरू असल्याचा सूर आहे. प्रत्येक बूथ निहाय २०० सदस्य करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. राज्यात सध्या भाजपचे एक कोटी सदस्य आहेत. यावेळी दीड कोटी सदस्य करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.

हेही वाचा >>> भाजपा-संघाचे संबंध ते प्रियांका गांधींचा प्रभाव; २०२५ मध्ये या ‘५’ राजकीय विषयांकडे असेल देशाचे लक्ष

Anjali Damanias allegations against Minister Dhananjay Munde are part of BJPs conspiracy says anil deshmukh
दमानियांचे मुंडेवरील आरोप, अनिल देशमुखांना वेगळीच शंका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप
youths Ambernath questions republic day hoardings future corporators
प्रजासत्ताकदिनी तरूणांनी वेधले लक्ष ; प्रजासत्ताक दिनाचे बॅनर का नाहीत, भावी नगरसेवकांना सवाल
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  एका सदस्य नोंदणी कार्यक्रमात बोलतांना स्पष्ट केले होते की ठरलेले लक्ष्य सर्वांना मिळून पूर्ण करायचे आहे. इतर सर्व पक्ष परिवारवादी असून  भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. लोकशाही पद्धतीने ईथे नेत्यांची निवड केल्या जाते. या नोंदणीत आमदारांनी लक्ष घालावे, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. सदस्य नोंदणीचा आढावा पण विधानसभा मतदारसंघ निहाय घेतल्या जातो. वर्धा जिल्ह्यात चारही आमदार भाजपचे आहेत. त्यात ६ हजार ६६६ सदस्य नोंदणी करीत आर्वीचे सुमित वानखेडे आघाडीवर आहेत. त्यांच्या जवळपास वर्ध्याचे आमदार व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे आहेत. वर्धा मतदारसंघात ६ हजार ५१४ व  आमदार राजेश बकाने यांच्या देवळीत ६ हजार १८२ सदस्य झालेत. सर्वात मागे हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार आहेत. येथे केवळ ४ हजार ३० सदस्यांची नोंदणी झाली. ५ जानेवारी या एकाच दिवशी देवळीने आघाडी घेतली होती. जिल्ह्यात एकूण २३ हजार ३९२ सदस्यांची नोंदणी झालेली आहे.

हेही वाचा >>> Farmer leader Dallewal : शेतकरी नेते डल्लेवाल यांच्या उपोषणाचे ४० दिवस; म्हणाले, “आता आरपारची लढाई”

सदस्य नोंदणीच्या प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात ५ मतदारसंघ अव्वल आहेत. त्यात मीरा भाईंदर  ३२ हजार १२४, डोंबिवली ३१ हजार १६५, नाला सोपारा ३० हजार १९४, ठाणे २७ हजार ९८३ व पनवेल २४ हजार ३२१ अशी विक्रमी नोंदणी झाली. तर राज्यात सर्वात तळाशी म्हणजेच सदस्य नोंदणीत सुमार कामगिरी करणारे हे पाच मतदारसंघ आहेत. मेहकर ८२४, मालेगाव सेंट्रल ९३८, सिंदखेड राजा ९४२, अक्कलकुवा १०१६ व आरमोरी १०३४ असा निचांक  आहे.  विदर्भातील सर्वाधिक मतदारसंघ यात आहेत. तसेच विदर्भातील बहुतांश विधानसभा मतदारसंघात सदस्य नोंदणीचे आकडे समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विदर्भातील असल्याने यावर बोट ठेवल्या जात आहे. राज्याचे प्रभारी रवींद्र चव्हाण हे नोंदणीचा दैनंदिन आढावा घेत आहे. आजवर एकूण २८८ मतदारसंघात १६ लाख ६४ हजार ९४१ सदस्यांची नोंदणी झालेली आहे.

Story img Loader