उमाकांत देशपांडे

मुंबई : शिवसेना २५ वर्षे युतीत सडली, असे वक्तव्य करण्याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची व माझीही लायकी नसल्याचे नमूद करत भाजप खासदार पूनम महाजन यांनी ठाकरेंवर हल्ला चढवला. ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन हे रात्री दहा-साडेदहाला झोपत होते व तरीही त्यांनी पक्ष वाढविला. त्यासाठी मध्यरात्री दोन व चार वाजेपर्यंत बैठका घेण्याची त्यांना गरज नव्हती, असे सांगून पूनम महाजन यांनी ज्येष्ठ भाजप नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावल्याची चर्चा सुरू झाली आहे.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
sanjay raut slams raj thackeray
Raj Thackeray : नवनिर्माणचं ‘नमोनिर्माण’ होण्यामागे कारण काय? संजय राऊत यांची राज ठाकरेंवर खोचक टीका
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
https://fb.watch/gvbnnwmCqA/

प्रमोद महाजन यांच्या ७३ व्या जन्म दिवसा निमित्त ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांच्या गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. प्रमोद महाजन हे कधी कोणाचे ‘ साहेब ‘ नव्हते, प्रमोदजी होते. ते असामान्य व्यक्तिमत्व होते. केवळ रालोआतील नव्हे, तर मुलायमसिंह यादव, शरद पवार, ममता बनर्जी यांच्यासह देशातील अनेक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी प्रमोद महाजन यांचे मैत्रीचे संबंध होते, असे सांगून पूनम महाजन म्हणाल्या, भाजप-शिवसेना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांची युती होती. त्यांनी विचार केला व दोन्ही पक्षांनी पुढे वाटचाल केली. त्यामुळे शिवसेना २५ वर्षे युतीत सडली, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने मला वाईट वाटले. त्यांनी युती केली नव्हती. हा त्यांच्या व माझ्या वडिलांचा आणि त्यापेक्षा उत्तुंग नेत्यांचा अपमान आहे. असे वक्तव्य करण्याची उद्धव ठाकरे व माझीही लायकी नाही. त्यांनी दोन्ही नेत्यांच्या निर्णयावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे, असे महाजन यांनी सुनावले.

हेही वाचा… ‘माऊली आपलाच आहे’….पिंपरीतील राजकारण बदलणाऱ्या आठवणींना पुन्हा उजाळा

प्रमोद महाजन जेव्हा अंतिम घटका मोजत होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात भेटायला आले होते. ‘ प्रमोद तू उठ, तुझी गरज आहे, ‘ असे ते वडीलकीच्या नात्याने म्हणाले होते. ते युतीसाठी होते की वैयक्तिक संबंधांसाठी होते, असा सवालही पूनम महाजन यांनी केला.

पूनम महाजन पुढे म्हणाल्या, प्रमोद महाजन यांनी कायम संघटनावाढीचा विचार करून पक्ष वटवृक्षासारखा केला. त्यामुळे त्याला धक्का लावण्याची कोणाची ताकद नाही. अनेक चांगले पायंडे त्यांनी पाडले. खासदारांच्या वेतनातून पक्षनिधीसाठी दरमहा वेतन देणे, खासदार बैठकीची वेळ न पाळल्यास दरवाजे लावून घेणे, पक्ष कार्यालये उभारणे, एक बूथ १० कार्यकर्ते अभियान, मंत्र्यांनी आठवड्यात एक दिवस पक्ष कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविणे, आदी अनेक बाबींचा पाया प्रमोद महाजन यांनी घातला होता.

हेही वाचा… मुख्यमंत्र्यांच्या नंदुरबार दौऱ्यात शिंदे गट आणि भाजप यांच्यातील विसंवादाचे दर्शन

फडणवीसांसह ज्येष्ठ भाजप नेत्यांना टोले ?

प्रमोद महाजन हे रात्री दहा-साडेदहाला झोपून सकाळी साडेपाचला उठत. सर्वभाषिक वृत्तपत्रे वाचन, व्यायाम, दूरध्वनी, पत्रलेखन आदी वक्तशीरपणे होते. त्यांना पक्षवाढीसाठी मध्यरात्री दोन व चारपर्यंत बैठका घेण्याची गरज भासली नाही, असे पूनम महाजन यांनी सांगितले. रामभाऊ म्हाळगी संस्थेला गेल्या आठवड्यात ४० वर्षे झाली. प्रमोद महाजन यांनी केशवसृष्टी येथे जागा घेऊन आणि विचाराधिष्ठित स्वरूप देऊन ही संस्था नावारूपाला आणली. या संस्थेत प्रमोद महाजन यांचे छोटे छायाचित्र आहे. मात्र ४० वर्षांच्या वाटचालीनिमित्ताने प्रमोद महाजन यांच्या योगदानाबद्दल संस्थेने किमान समाजमाध्यमांवर एखादा संदेश जरी प्रसारित केला असता, तर मला मुलगी म्हणून बरे वाटले असते, अशी टिप्पणी पूनम महाजन यांनी केली. फडणवीस यांची म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी गेल्या वर्षी निवड झाली आहे हे विशेष.

हेही वाचा… Maharashtra News Live : बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटणार की चिघळणार; जाणून घ्या प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर!

आता नेत्यांचे कपडे व जाकिटांचा उल्लेख करून प्रमोद महाजन हे केवळ पांढरा कुडता व पायजमा घालत आणि त्यांची केवळ दोन जाकीटे होती, असे त्यांनी नमूद केले. प्रमोद महाजन राजकारणात असूनही दिलेला शब्द पाळायचे, असे नमूद करून त्यांनी राज्यातील एक मंत्री व चार वेळा खासदार झालेल्या एका नेत्याचा किस्सा सांगितला. मी कार्यकर्ता म्हणून नाही, तर मुलगी म्हणून प्रमोद महाजन या हिऱ्याचे विविध पैलू सांगत आहे. असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या प्रमोद महाजन यांच्या विचारांच्या प्रकाशातून देशभरातील भाजप कार्यकर्ते वाटचाल करीत असल्याचे पूनम महाजन यांनी स्पष्ट केले.