सांगली : अपेक्षेप्रमाणे सांगली, मिरज या दोन मतदारसंघात भाजपने विद्यमान सदस्य पालकमंत्री सुरेश खाडे आणि सुधीर गाडगीळ यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजपमधून तिसर्‍यांदा निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक नसल्याचे सांगणाऱ्या आमदार गाडगीळ यांना पुन्हा उतरविण्यात भाजपने अन्य इच्छुकांवर अविश्‍वास दाखवला असला तरी मंत्री खाडे यांना चौथ्यांदा संधी देत आपणाकडे अन्य पर्यायच उपलब्ध नसल्याचे अधोरेखित केले आहे.

आमदार गाडगीळ यांनी निवडणुकीपूर्वी एक महिना आपण विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले होते. यामुळे भाजपमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्याही वाढली होती. निष्ठावंत गटातून शेखर इनामदार, नीता केळकर हे तर पहिल्या पंगतीला बसण्यासाठी एका पायावर तयार होतेच, पण जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, पृथ्वीराज पवार, नितीन शिंदे, स्वाती शिंदे, दिनकर पाटील, धीरज सुर्यवंशी आदीसह अर्धा डझनहून अधिक कार्यकर्त्यांना गेली दोन महिने आमदारकीची स्वप्ने पडत होती. मात्र, या इच्छुकांना तोंडावर कसे पाडता येईल याचा डाव गाडगीळ यांनी साधला. अचानकपणे प्रसिद्धी माध्यमांना पत्र देऊन आपण सक्रिय राजकारणातून अलिप्त होत असून पक्ष देईल त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कार्यरत राहू असे सांगून इच्छुकांच्या आकांक्षांना खतपाणी घालण्याचे काम केले. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे घटलेले मतदान, जरांगे आंदोलनाचा मराठा फॅक्टर यामुळे काँग्रेसची ताकद वाढली होती. काँग्रेसबद्दल मतदारामध्ये निर्माण झालेली सहानभुतीची लाट आणि एकसंध झालेली काँग्रेसची मते याला प्रत्युत्तर देण्यासाठीच गाडगीळ यांनी आपणाभोवती स्वच्छ राजकारणींचा चेहरा निर्माण करून निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होण्याचे नाटक करत माघारीची खेळी करून विरोधकाबरोबरच स्वपक्षियांना अंधारात ठेवले. आणि आता पुन्हा एकदा बाशिंंग बांधून निवडणुकीच्या मांडवात उतरण्याची तयारी केली तीही पक्षादेश शिरसांवद्य मानत. यालाच निवडणूक रणनीती म्हणावे लागेल.

Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Best bus accident Kurla, BJP demands inquiry Best bus,
बेस्ट बस अपघात : राजकारण तापले, चौकशीची भाजपची मागणी, भाडेतत्वावरील बस गाड्यांवरून आदित्य ठाकरे लक्ष्य
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
pune PMP is likely to increase ticket rates this year
पीएमपीचे तिकीट वाढणार, सर्वसामान्यांचा प्रवास होणार महाग ?
Political equations in Amravati district will change conflicts between leaders will increase
अमरावती जिल्‍ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार, नेत्‍यांमधील संघर्ष वाढणार

हेही वाचा – कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी, महायुतीत जागावाटपाचा पेच कायम

सांगलीमध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचा केवळ साडेसहा हजार मतांनी झालेला पराभव, महाविकास आघाडीचे आव्हान हे धोके तर आहेतच, पण यावेळी काँग्रेसमधील गटबाजी, महाविकास आघाडीतील अविश्‍वासाचे वातावरण याचा फायदा उठविण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. काँग्रेसमध्ये पृथ्वीराज पाटील व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्यात उमेदवारीचा संघर्ष सुरू असून आज उद्या यावर योग्य तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले तरी बंडखोरीचा धोका टळलेला नाही. हे गाडगीळ यांच्या पथ्यावर पडणारे असले तरी आघाडीअंतर्गत एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे डावपेच जिल्हा नेतृत्वाच्या स्पर्धेतून झालेच तर तेही लाभदायी ठरू शकते. आता पुढच्या आठवड्यापर्यंत हे सारे पत्ते उघड होतील, यानंतरच निवडणुकीला खर्‍या अर्थाने रंगतदार वळण लाभेल.

हेही वाचा – बाहेरच्या मतदारांना ‘बांग’र

मिरज या राखीव मतदारसंघातून पालकमंत्री खाडे यांना भाजपने चौथ्यांदा संधी दिली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ फुलविण्याचे काम त्यांनी केले असल्याने पक्षात त्यांना ज्येष्ठत्वाचा मान तर आहेच, पण मतदारसंघात निधी खेचून आणण्याचे काम ते सातत्याने करत आले आहेत. मतदारसंघात त्यांना पक्षांतर्गत आव्हान त्यांचेच एकेकाळचे सहकारी प्रा. मोहन वनखंडे यांचेच वाटत होते. मात्र, त्यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांचेही पक्षातील उमेदवारीसाठीचे आव्हान संपले. आता विरोधकांचे आव्हान म्हणावे तर तेही चारशे खिडक्या आठशे दारे अशा पद्धतीने विरोधकांची अवस्था, महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर सर्वच घटक पक्षांचा दावा आहे. काँग्रेसमध्ये येऊन वनखंडे यांची उमेदवारी मान्य केली तर पक्षातील अन्य कार्यकर्ते हे मान्य करायला तयार नाहीत. वनखंडे यांना अन्य आठ जणांनी उमेदवारीला विरोध केला आहे, तर सी. आर. सांगलीकरांनी वनखंडे यांना उमेदवारी दिली तर बंडखोरीचा इशारा दिला आहे. वीस वर्षांपूर्वीचा दाखला देत शिवसेना ठाकरे पक्षाकडूनही उमेदवारीचा आग्रह आहे. यात पुन्हा तानाजी सातपुते की सिद्धार्थ जाधव हाही प्रश्‍नच आहे. जाधव तर एकेकाळचे काँग्रेसच्या वळचणीला होते. गेल्या निवडणुकीत स्वाभिमानीकडून लढविणारे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत आणि त्यांचा तसा अधिकारही वाटतो. अशा विखुरलेल्या विरोधकांना एकत्रित करून एकास एक लढत होणे अशक्यच नव्हे तर असंभवनीय म्हणावे लागेल. खाडे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने विज्ञान माने या तरुणाला उमेदवारी जाहीर केली आहे. पहिल्यांदा राष्ट्रवादी, लोकसभेवेळी अपक्ष आणि आता वंचित बहुजन आघाडी असा त्यांचा प्रवास मतदार मान्य करतील का हाही प्रश्‍न आहे. या सर्वावर मात करत विजयाप्रत जाण्याचे आव्हान मंत्री खाडे यांच्या पुढे असेल.

Story img Loader