महाराष्ट्रात ‘शतप्रतिशत’चा भाजपाचा प्रयत्न, शिंदे गटाशी युती करून डोळे २०२४च्या निवडणुकीवर!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपाने शिंदे गटासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे.

महाराष्ट्रात ‘शतप्रतिशत’चा भाजपाचा प्रयत्न, शिंदे गटाशी युती करून डोळे २०२४च्या निवडणुकीवर!
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपाने शिंदे गटासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. या सरकारचा ९ ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. दरम्यान, या सरकार स्थापनेनंतर आता भाजपाने आगमी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४५ जागा तसेच विधानभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाची महत्त्वाकांक्षी योजना भाजपाने आखली आहे. त्यासाठीची तयारीदेखील भाजपाने सुरू केली आहे.

हेही वाचा >> “ज्यांचे नेते जेलमध्ये…” मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादीने केलेल्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

भाजपाने २०२४ सार्वत्रिक निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत एकूण ५४५ जागांपैकी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे भाजपाने लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये अटीतटीची लढत होणाऱ्या १२३ जागा भाजपाने वेगळ्या काढल्या आहेत. या १२३ जागांमध्ये महाराष्ट्रातील १६ जागा आहेत.

हेही वाचा >> “ते त्यांचं वैयक्तिक मत,” संजय राठोडांच्या मंत्रिपदाला चित्रा वाघ यांच्या विरोधानंतर भाजपाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया

बारामती (सुप्रिया सुळे), शिरूर (अमोल कोल्हे), रायगड (सुनील तटकरे) आणि सातारा (श्रीनिवास पाटील); काँग्रेस एक जागा- चंद्रपूर (धानोरकर); उद्धव ठाकरे गटाच्या सहा जागा- परभणी (संजय जाधव), मुंबई उत्तर पश्चिम (गजानन कीर्तिकर), मुंबई दक्षिण (अरविंद सावंत), ठाणे (राजन विचारे), उस्मानाबाद (ओमराजे निंबसळकर) आणि विनायक राऊत (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) आणि AIMIM पक्षाची एक जागा- औरंगाबाद (इम्तियाज जलील), अशी विभागणी भाजपाने केली आहे.

हेही वाचा >> “बदनामी करणाऱ्यांना समोर…” मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सत्तारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

निवडणुकीच्या दृष्टीने कमकुवत असलेल्या या १६ जागा जिंकण्यासाठी भाजपाने शिंदे गट-भाजपा युती होण्यापूर्वीच योजना आखली होती असे भाजपातील सूत्रांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे भाजपा फक्त आपल्याच उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करणार नसून शिंदे गटाचे प्रतिनिधीत्व करणारा प्रत्येक उमेदवार जिंकावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >> पुणेकरांसाठी चंद्रकांत पाटील ‘बाहेर’चेच

आगामी निवडणुकांची तयारी म्हणून भाजपाने केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्र दौऱ्यावर पाठवण्याची तयारी केली आहे. या महिन्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर कल्याण या लोकसभा मतदारसंघाला भेट देणार आहेत. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामतीचा दौरा करणार आहेत. बारामती हा भाग राष्ट्रवादीचा अर्थात पवार घराण्याचा बालेकिल्ला माणला जातो. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे करतात. या मतदारसंघातही भाजपाने केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याची योजना आखली आहे.

हेही वाचा >> वादाच्या रिंगणातील मंत्रीपद

कल्याण लोकसभा मंतदारसंघाचे प्रतिनिधित्व मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे करतात. असे असूनदेखील अनुराग ठाकूर कल्याणचा दौरा करणार आहेत. ठाकूर यांच्या या दौऱ्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र आगामी निवडणुकीसाठी श्रीकांत शिंदे यांच्या विजयाची शक्यता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा हा दौरा असल्याचे, भाजपाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत भाजपाच्या एका रणनीतिकाराने सविस्तर सांगितले आहे. “एकनाथ शिंदे यांना विरोध करणे या घडीला भाजपाला परवडणारे नाही. शिंदे यांच्या माध्यमातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळवता येऊ शकेल,” असे रणनीतिकाराने सांगितले आहे.

हेही वाचा >> भाजप नेत्यांच्या विरोधावर मात करत राधाकृष्ण विखे मंत्रीपदी!

मात्र केंद्रीय मंत्र्यांचे हे दौरे म्हणजे भाजपा आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे संकेत आहेत, असे म्हटले जात आहे. तसेच विरोधकांचे बालेकिल्ले जिंकण्यासाठीही यावेळी भाजपा प्रयत्न करणार, असे दिसत आहे.

हेही वाचा >> संजय राठोड : मतदारांसाठी धडपडणारा पण वादग्रस्त चेहरा

दरम्यान, उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक ४८ जागा आहेत. उत्तर प्रदेशमध्ये या जागा ८० आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य नेहमीच महत्त्वाचे ठरलेले आहे. २०१४ च्या मोदी लाटेमध्ये महाराष्ट्रात भाजपाला २३ जागा मिळाल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाने ही संख्या कायम टेवली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १३३ उमेदवार निवडून आले होते. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या १०५ पर्यंत खाली आली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
केरळ: सिपीएम नेत्या बीना फिलिप यांची आरएसएसच्या कार्यक्रमाला उपास्थिती; सिपीएमने झटकले हात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी