जयेश सामंत

ठाणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील परंपरागत बालेकिल्ल्यात विरोधकांच्या कडव्या आव्हानामुळे खडबडून जागे झालेल्या भाजपाने येथील मतदारांपर्यत पोहचण्यासाठी संपूर्ण राज्यातील यंत्रणा कामाला लावली आहे.

The forts in the state are in the grip of private encroachments Pune
राज्यातील किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात… आता होणार काय?
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…
uture of 574 candidates in Talathi recruitment is uncertain
तलाठी भरतीतील ५७४ उमेदवारांचे भविष्य टांगणीलाच, जाणून घ्या कारण

कसब्यातील या संपर्कमोहीमेसाठी प्रदेशातील नेत्यांनी राज्यभरातील जिल्हा आणि मंडळ कार्यकारणीच्या नावाने एक नवा फतवा काढला असून आपआपल्या संपर्कातील, नात्यातील तसेच ओळखीचे मतदार शोधून त्यांच्यापर्यत पोहचण्याची एक नवी यंत्रणा उभी केली जात आहे. मतदाराचे नाव, त्याचा मोबाईल क्रमांक, पत्ता आणि कुटुंबातील मतदार संख्येची इत्थंभूत माहिती एका अर्जाद्वारे गोळा करण्याची प्रक्रिया या माध्यमातून केली जात असून प्रत्येक जिल्ह्यातून अते किमान १०० अर्ज भरुन देण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.

हेही वाचा… सोलापुरमध्ये भाजपकडून पर्यायी नेतृत्वाची चाचपणी ?

पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघात येत्या २६ तारखेला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघात भाजपपुढे महाविकास आघाडीने आव्हान उभे केले आहे. राज्यातील सत्ता बदलानंतर झालेल्या अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारास नाट्यमयरित्या माघार घ्यावी लागली होती. तसेच नुकत्याच झालेल्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीचे आव्हान अधिक मजबूत होत असल्याचे वातावरण निर्माण होत आहे. निवडणुक आयोगाच्या नव्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे समर्थकही गेल्या काही दिवसांपासून आक्रमक होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुका भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी कमालिच्या प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. कसब्यात भाजपने ब्राह्मण समाजातील उमेदवार न दिल्याचे पडसाद या मतदारसंघातून उमटले आहेत. उमेदवारीच्या निर्णयावरुन ब्राह्मण समाजात काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा असताना गेल्या काही दिवसांपासून भाजपने याठिकाणी नेत्यांची फौजच उतरवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यातील त्यांच्या पक्षातील संपूर्ण यंत्रणा कसब्यात कामाला लावली असून ते स्वत:ही येथील प्रचारात उतरल्याचे पहायला मिळाले. चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने याठिकाणी भाजपला दिलासा मिळाला असला तरी कसब्यात मात्र विरोधकांचे मोठे आव्हान समोर असल्याची जाणीव पक्षाला झालेली दिसते. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्यभरातील यंत्रणा या मतदारसंघासाठी कामाला लावण्याची रणनिती पक्षाने आखली आहे.

हेही वाचा… मतदारांचा पाठिंबा कायम राखण्याचे ठाकरे यांच्यापुढे मोठे आव्हान

कसब्यातील मतदार शोधमोहीम

भाजपने प्रदेश पातळीवरुन संपूर्ण राज्यभरातील जिल्हा आणि मंडळ कार्यकारणीला कसबा तसेच चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदार शोध मोहीमेसाठी कामाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. वरवर पहाता दोन्ही पोटनिवडणुकांसाठी ही रचना उभी केली जात असली तरी संघ, ब्राम्हण समाजातील मतदार तसेच विशीष्ठ संस्था, ठराविक मंडळांचे प्रभावक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमधून विशेषत: कसब्यासाठी रसद उभी रहावी अशापद्धतीने ही व्युहरचना आखली जात आहे. कसबा पेठ मतदारसंघातील दत्तवाडी, राजेंद्र नगर, नवी पेठ, टिळक रोड, अलका टाॅकीज, दांडेकर फुल परिसर, पोलीस लाईन, खडकमाळ आळी, घोरपडी पेठ, गुरुवार पेठ, गंज पेठ, मोहसीन पुरा, कागदी पुरा, कस्तूरी चौक परिसर, रविवार पेठ, लक्ष्मी रोड, भवानी पेठ, नाना पेठ, दारुवाला पुल, कसबा पेठ, जुना बाजार, मंगळवार पेठ, सोनार गल्ली, लोहीया नगर परिसर, बाजीराव पेठ, शनिवार वाडा परिसर, ओकांरेश्वर मंदिर परिसरातील परिचयाचे मतदारांचा शोध घेण्याच्या सुचना राज्यभरातील जिल्हा तसेच मंडळ कार्यकारणीला देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून किमान १०० अर्ज भरुन दिले जावेत असा फतवा काढण्यात आला असून परिचयाच्या मतदारांशी स्वत: संपर्क करावा असे आवाहनही करण्यात आले आहे. कसब्याचा गड राखण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी चांदयापासून बांद्यापर्यत सुरु केलेला हा मतदारांचा धुंडाळा पाहून जिल्हा पातळीवरील नेते, पदाधिकाऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे.