scorecardresearch

कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती ठरली, विजयासाठी राबवणार गुजरात, उत्तर प्रदेशचे खास मॉडेल!

निवडणूक जिंकण्यासाठी येथे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपानेही या निवडणुकीसाठी आपली रणनीती आखली आहे.

basavaraj bommai and karnataka assembly election
बसवराज बोम्मई, अमित शाह, नरेंद्र मोदी, (फोटो- लोकसत्ताग ग्राफिक्स टीम)

या वर्षी कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याच कारणामुळे निवडणूक जिंकण्यासाठी येथे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपानेही या निवडणुकीसाठी आपली रणनीती आखली आहे. भाजपातर्फे गुजरात, उत्तर प्रदेशमधील विकासकामांचा तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा आधार घेत घरोघरी जाऊन प्रचार करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.

हेही वाचा >>> राजस्थानमधील मंत्र्याविरोधात अपहरणाचा गुन्हा, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर मंत्र्याचे गंभीर आरोप

स्थानिक कार्यकर्त्यांना दिले जात आहे प्रशिक्षण

कर्नाटकमधील भाजपाच्या प्रमुख नेत्यांची शुक्रवारी बंगळुरु येथे बैठक झाली. या बैठखीनंतर भाजपाच्या रणनीतीबद्दल पक्षाचे सरचिटणीस सी टी रवी यांनी सविस्तर सांगितले आहे. “आम्ही गोंधळ करणारे लोक नाहीत. निवडणूक तोंडावर आल्यावर गोंधळ करण्याचे काम आम्ही काँग्रेसला दिलेले आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही बूथ लेव्हलवर काम करत आहोत. स्थानिक कार्यकर्त्यांना त्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. ही निवडणूक बूथ लेव्हलवर जिंकण्याची आमची रणनीती आहे,” असे सी टी रवी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> ‘…म्हणून शिवाजी महाराज आहेत,’ विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांचे नवे ट्वीट, प्रभु रामांचा उल्लेख करत म्हणाले, “रावण काढून…”

गुजरात, उत्तर प्रदेश मॉडेल राबवणार

“विधानसभेच्या प्रत्येक जागेवर जवळपास ७० ते ८० टक्के लोकांना केंद्र तसेच राज्य सरकारच्या वेगवेगवळ्या योजनांचा फायदा झालेला आहे. जनतेला झालेल्या याच फायदाच्याचे रुपांतर आम्हाला मतदानात करायचे आहे. त्यासाठी आम्ही मोठी रणनीती आखली आहे. हीच रणनीती उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये यशस्वी ठरलेली आहे,” असे रवी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? अजित पवारांनी थेट उत्तर देत विषय संपवला; म्हणाले “त्यांनी डोक्यातून…”

अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांची शक्यता

दरम्यान, येत्या १० फेब्रुवारी रोजी येथील बसवराज बोम्मई सरकार आपल्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यामुळे यावेळी बोम्मई काही लोकप्रिय घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून कर्नाटक सरकार सीमाभागाच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. तशी तरतूद येत्या अर्थसंकल्पात केली जाणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 18:41 IST