नागपूर : दहशतवादी कृत्याच्या विरोधात भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानच्या विरोधात सीमेवर लडलेली लढाई राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर आणली की काय असे वाटावे असे चित्र नागपूर जिल्ह्यात दिसून येत आहे. तीन दिवसात तीन तिरंगा यात्रा निघाल्या असून त्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री व भाजपचे पदाधिकरी यांचा सक्रिय सहभाग या मिरवणुकांमागचा राजकीय उद्देश स्पष्ट करतो. चार महिन्यांनी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा हा प्रचारी भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ या मिरवणुका असल्याचे सांगितले जाते. पण याच सैनिकांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध यात केला जात नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शुक्रवारी कामठीमध्ये नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेत मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. पालकमंत्रीच सहभागी होणार म्हंटल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे रविवारी (१८ जून) नागपूर आणि खापरखेडा या दोन ठिकाणी तिरंगा यात्रा निघाल्या. या दोन्ही यात्रांमध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. नागपूरची यात्रा माजी सैनिकांच्यावतीने आयोजित करण्यात आल्याचा दावा भाजपने केला आहे. मात्र त्याचा प्रचार व प्रसार भाजपच्याचवतीने केला जात आहे. खापरखेड्यात यात्रा आयोजित करण्यासाठी सावनेरचे भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. या दोन्ही यात्रांमध्ये भाजपचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी ,आमदार यांचा सक्रिय सहभागामुळे या यात्रेला राजकीय यात्रेचे स्वरुप आलेले दिसून आले.
चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले. नागपूर जिल्हाही त्याला अपवाद नाही. नागपूर महापालिका आणि नागपूर जिल्हा परिषद पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर तीन दिवसात निघालेल्या तीन तिरंगा यात्रांकडे बघितले जात आहे.
भारतीय सैन्य दल हा नेहमीत प्रत्येक भारतीयांसाठी आदरास्थानी राहिले आहे. वेळोवेळी त्यांचा सरकार आणि नागरिकांतर्फे सन्मानही केला जातो. पहलगामच्या घटनेनंतर संपूर्ण देशवासीयांच्या मनात दहशतवाद्यांच्या विरोधात संतापाची भावना निर्माण झाली होती. त्यामुळेच भारताने केलेल्या सैनिकी कारवाईच्या मागे संपूर्ण देश एकत्रितपणे उभा राहिल्याचे चित्र होते. मात्र अचानक युद्धविराम झाल्याने लोकांच्या मनात शंका निर्माण झाली, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. आता सत्ताधारी पक्षाकडून काढल्या जात असलेल्या तिरंगा यात्रा हा प्रचाराचाच भाग असल्याची टीका होऊ