हर्षद कशाळकर

अलिबाग : मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून केंद्र आणि राज्यसरकार टिकेचे धनी ठरले आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपुर्वी या महामार्गाचे काम पुर्ण करण्याचे नियोजन भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने सुरु केले आहे. नितिन गडकरी यांच्या पहाणी दौऱ्यादरम्यान याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

telugu desam party
“सत्तेत आल्यास उत्तम दर्जाचं मद्य, कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ”, निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडूंचं मतदारांना आश्वासन
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ
BJPs charsau paar slogan is a conspiracy to change the constitution MLA Praniti Shinde alleges
भाजपचा ‘चारसौ पार’चा नारा म्हणजे संविधान बदलण्याचे कारस्थान, आमदार प्रणिती शिंदे यांचा आरोप
issue of property tax of Panvel is in discussion in the Lok Sabha elections
लोकसभेच्या निवडणुकीत पनवेलच्या मालमत्ता कराचा मुद्दा चर्चेत 

मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर कामाला २०११ ला सुरवात झाली होती. तर इंदापूर ते झाराप या टप्प्यातील काम २०१४ साली सुरु झाले. पळस्पे ते इंदापूर टप्प्यात रस्त्याच्या कामात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन भुसंपादन पुर्ण झाल्या शिवाय काम सुरु न करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसेच या कामाचे दहा छोटे टप्पे करून ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली. जेणेकरून हे काम लवकर मार्गी लागू शकेल. मात्र सिंधुदूर्ग जिल्ह्याचा अपवाद सोडला तर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील रस्त्याचे काम रखडले. रस्त्याची मोठी दुरावस्था झाली. त्यामुळे कोकणातील प्रवाश्यांच्या हाल सुरु झाले. २०२३ साल उजाडले तरी रस्त्याचे काम मार्गी लागू शकलेले नाही. यामुळे केंद्र आणि राज्यसरकार टिकेचे धनी ठरले. केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री या टीकेच्या केंद्रस्थानी राहीले. उच्च न्यायालयानेही रस्त्याच्या कामावरून सरकारला फटकारले.

हेही वाचा… Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसने बळकावला भ्रष्टाचारमुक्तीचा मोदींचा नारा

या परिस्थितीचा आगामी लोकसभा निवडणूकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो अशी चिन्ह दिसू लागली. आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपला रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जागा लढवायच्या आहेत. रायगड मधून धैर्यशील पाटील हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असणार आहे. तर रत्नागिरीतून नारायण राणे लोकसभेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या दोन्ही जागा निवडून याव्यात यासाठी आता पासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. त्यामुळेच कुठल्याही परस्थितीत रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे नियोजन भाजपचा प्रयत्न असणार आहे.

हेही वाचा… प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैशांचा व्यवहार काँग्रेसच्या आमदारावर शेकणार ?

पावसाळ्यापुर्वी एका बाजूचा रस्ता तर पावसाळ्यानंतर दुसऱ्या बाजूचा रस्ता पुर्ण केला जाणार आहे. रस्त्याच्या कामावर दररोज ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवली जाणार आहे. तर कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रय़त्न केला तर त्यांच्या विऱोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे रस्त्याच्या कामावर दैनंदीन देखरेख ठेवणार आहेत. त्यामुळे येत्या महिन्याभरात या रस्त्याच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… राजू शेट्टी, संभाजीराजे यांची लोकसभेची तयारी सुरु

यापुर्वी या महामार्गाच्या कामावरून अनेकदा कालमर्यादा आखण्यात आल्या होत्या. मात्र त्या कधीच पाळल्या गेल्या नाहीत. रस्त्याचे कामही मार्गी लागले नाही. त्यामुळे यावेळी तरी डिसेंबर अखेर पर्यंतची कालमर्यादा पाळली जाणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. भाजपच्या मिशन कोकणच्या दृष्टीने ते महत्वाचे असणार आहे.