संतोष प्रधान

राज्यातील साखर उद्योगावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढून भाजपने स्वत:ची ताकद या क्षेत्रात उभी करण्यावर भर दिला आहे. साखर उद्योगांच्या प्रश्नांवर केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे मंगळवारी झालेली बैठक हा या योजनेचाच भाग मानला जातो. साखर उद्योगाला मदत करून त्याद्वारे साखर कारखानदार भाजपकडे वळविण्याची रणनीती आहे.

Prime Minister Modi criticism in Kanhan meeting that India is anti development
‘इंडिया’ विकासविरोधी! कन्हानच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

करोना आणि दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना अर्थसहाय्य, निर्यातीच्या कोट्यात वाढ, थकित कर्जाची फेररचना, इथेनाॅल प्रकल्प उभारण्याकरिता मदत अशा विविध मागण्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. साखर उद्योगाला भविष्यात भाजपकडूनच मदत होईल, असा सूचक संदेश देण्यात आला आहे.

हेही वाचा… वंचित व शिवसेना युतीमुळे पश्चिम वऱ्हाडात राजकीय समीकरणे बदलणार

सहकारी साखर कारखानदारी किंवा सहकार चळवळीत राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व आहे. राज्यातील सत्ता आणि केंद्रीत अमित शहा यांच्याकडे असलेले सहकार खाते या माध्यमातून सहकारावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची भाजपची योजना आहे. या दृष्टीने भाजपची पावले पडत आहेत. साखर कारखान्यांचे प्रश्न हाती घेत शिंदे-फडणवीस यांनी नवी दिल्लीत शहा यांची भेट धेतली. तेव्हा राधाकृष्ण विखे-पाटील, रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, खासदार धनंजय महाडिक आदी सारी सहकार व साखर कारखानदारीतील मंडळी उपस्थित होती.

हेही वाचा… पक्ष वाढीची चंद्रशेखर राव यांची सुरुवात महाराष्ट्रातून

राज्यात भाजपने पश्चिम महाराष्ट्र वगळता सर्वत्र पकड निर्माण केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित पकड अद्यापही बसविता आलेली नाही. विखे-पाटील, मोहिते-पाटील यांच्यासह राष्ट्रवादी वा काँग्रेसमधील बडी मंडळी बरोबर घेतली तरी सामान्य मतदार अजूनही भाजपबरोबर जोडला गेलेला नाही. पश्चिम महाराष्ट्र या साखर पट्ट्यात विधानसभेच्या ६२ जागा आहेत. गेल्या वेळी या पट्ट्यातील ३५ जागा राष्ट्रवादी व काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्यातूनच भाजपचे गणित बिघडले होते.

हेही वाचा… Maharashtra News Live: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर

पश्चिम महाराष्ट्रात घट्ट पकड रोवल्यास राज्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का देता येईल, असे भाजपचे गणित आहे. काँग्रेसची ताकद ही विदर्भात तर राष्ट्रवादीची पाळेमुळे पश्चिम महाराष्ट्रात आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीला रोखायचे असल्यास विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अधिक जोमाने भाजपला प्रयत्न करावे लागतील. पश्चिम महाराष्ट्रात हातपाय रोवायचे असल्यास साखर उद्योगाला मदत करून सामान्य शेतकऱ्याला जोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात सखर पट्ट्यात या उद्योगाला मदत करूनच भाजपने या भागातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. वास्तविक शेतकरी कायद्यामुळे पश्चिम उत्तर प्रदेश या साखर पट्ट्यात भाजपच्या विरोधात वातावरण होते. पण गेल्या वर्षी झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत साखरपट्ट्यात भाजपला चांगले यश मिळाले होते. पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योगाला भरीव मदत करून या भागात आपली ताकद वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.