शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यातील कलुगीतुरा सुरू असतानाच भाजपने शिरूर लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार करून मोर्चे बांधणीला आतापासूनच प्रारंभ केला आहे. त्याअनुषंगाने होत असलेल्या घडामोडींमुळे प्रत्यक्ष निवडणुकांपूर्वीच शिरूरचे राजकारण भलतेच तापले आहे.

हेही वाचा- राजकीय आणि प्रशासकीयदृष्ट्या पालकमंत्रीपद महत्त्वाचे

BJP observer MP in gadchiroli
लोकसभेसाठी भाजपचे निरीक्षक गडचिरोलीत, पण चर्चा उमेदवार बदलाची
Himachal Pradesh Speaker disqualifies 6 Congress MLAs
हिमाचलमध्ये राजकीय उलथापालथ चालूच! काँग्रेसचे ‘ते’ सहा आमदार अपात्र, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; कारण काय?
Basavaraj Patil
बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला फटका किती ?
Bhavana Gawali on yavatmal loksabha constituency
“मैं मेरी झांसी नहीं दूंगी”, भावना गवळी लोकसभा उमेदवारीसाठी ठाम; म्हणाल्या, “१३ खासदार शिंदेंबरोबर गेलो तेव्हा…”

डॉ. कोल्हे व आढळराव यांच्यात सत्तासंघर्ष

शिरूर लोकसभा मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. डॉ. कोल्हे खासदार असून सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. फक्त भोसरी मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. शिरूर लोकसभेचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले व मतदारसंघात स्वत:ची स्वतंत्र ताकद असलेल्या आढळरावांची शिरूरमधून पुन्हा खासदार होण्यासाठी खूप आधीपासूनच बांधणी सुरू आहे. डॉ. कोल्हे व आढळराव यांच्यातील सत्तासंघर्ष, आरोप-प्रत्यारोप, शह-काटशह अडीच वर्षांपासून सतत सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या खासदारांना बैठकीपासून दूर ठेवले

अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना, खासदार कोल्हे यांनी त्यांच्या माध्यमातून मतदार संघातील बरीच कामे करून घेतली. त्याच पध्दतीने किंबहुना त्याही पुढे जाऊन आढळरावांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कामांचा सपाटा लावला आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी शिरूर मतदारसंघातील प्रश्नांसाठी मंत्रालयात विशेष बैठक घेतली. त्या बैठकीला आढळराव व शरद सोनवणे यांनाच निमंत्रण होते. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार व खासदारांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. या कृतीचा निषेध म्हणून मुख्यमंत्री चुकीचा पायंडा पाडत असल्याची टीका खासदार कोल्हे यांनी केली.

हेही वाचा- त्रिपुरात भाजपामध्ये गळती सुरूच; आणखी एका आमदाराचा राजीनामा

भाजपाचे मिशन शिरुर

अशाप्रकारे आधीपासून तापलेल्या वातावरणात भाजपने शिरूरच्या राजकारणात उडी घेतली आहे.त्यादृष्टीनेच भाजपच्या ‘मिशन शिरूर’कडे पाहिले जाते. महेश लांडगे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून शिरूरमध्ये भाजपची ताकद वाढवण्याचे काम सुरू केले आहे. आता भाजपच्या लोकसभा प्रवास अभियानाअंतर्गत केंद्रीय आदिवासी विकासमंत्री रेणुका सिंग भाजप नेत्यांच्या फौजफाट्यासह नुकत्याच तीन दिवसांच्या शिरूर दौऱ्यावर येऊन गेल्या. या माध्यमातून भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.भाजपपरिवारातील संस्था तसेचपदाधिकाऱ्यांशी संवाद, विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा, हुतात्मे महात्मे यांच्या स्मारकांना भेटी, वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी भेटीगाठी, तीर्थक्षेत्र भीमाशंकर भेट, स्थानिक नागरिकांशी संवाद, आदिवासी बांधवांशी चर्चा, शासकीय अधिकाऱ्यांसमवेतआढावा बैठक, परिसरातील महामार्ग समस्या पाहणीआदींचा या तीन दिवसीय दौऱ्यात समावेश होता. शिरूर लोकसभेच्या निवडणूक प्रभारी व आमदार माधुरी मिसाळ, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या सह भाजप नेत्यांचा व पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा सहभागी झाला होता. २०२४ मध्ये शिरुर मधून भाजपाचा खासदार निवडून येणार, असा दावा करत भाजपा नेत्यांनी वातावरण निर्मितीही केली.

हेही वाचा- बारामतीत जोर लावणाऱ्या भाजपकडे उमेदवाराची वानवा

शिरूर मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, यावर बोट ठेवतानाच भाजपने ते प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवून मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असा युक्तीवाद या अभियानाच्या माध्यमातून केला आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच शिरूरचे वातावरण तापले आहे. या मतदारसंघावरील वर्चस्व राष्ट्रवादी काँग्रेस कायम ठेवू शकणार का, आढळराव त्यांच्या पराभवाची परत फेड करणार का, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रभाव क्षेत्रात भाजपचा निभाव लागणार का, असे अनेक प्रश्न तूर्त अनुत्तरित आहेत. आगामी काळात याबाबतची स्पष्टता होईलच.