जयेश सामंत

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजप नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून लक्ष केंद्रीत करताच नवी मुंबईतील प्रभावी नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि या मतदारसंघाचे माजी खासदार संजीव नाईक हे पुन्हा एकदा या संपूर्ण मतदारसंघात सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. भाजपच्या संघटनात्मक बैठका तसेच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठींच्या निमीत्ताने नाईक यांनी गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात संपर्क मोहीमेला जोमाने सुरुवात केल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नाईक यांच्या शनिवारी झालेल्या वाढदिवसानिमीत्त त्यांच्या समर्थकांनी शहरभर उभारलेले फलक, विवीध कार्यक्रम तसेच शुभेच्छा स्विकारण्यासाठी घोडबंदर मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमांमुळे नाईक यांनी पुन्हा एकदा ठाणे लोकसभेसाठी तयारी सुरु केल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात आहे.

Controversial statements of Deputy Chief Minister Ajit Pawar again
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा वादग्रस्त वक्तव्ये; तीव्र प्रतिक्रिया उमटताच सारवासारव
Ramtek Lok Sabha seat, rasmi barve Caste Certificate, Caste Certificate Controversy, raju parve Nomination Displeasure, favours congress, Challenges Shiv Sena, eknath shinde shivsena, lok sabha 2024, politics news, election news, marathi news
रश्मी बर्वे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे शिवसेनेपुढे आव्हान; रामटेक लोकसभा मतदारसंघाचे चित्र
Devendra Fadnavis said We have to work with those who have struggled so far
“आतापर्यंत संघर्ष केलेल्यांसोबत काम करावे लागेल”, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; इंदापूरचे पालकत्व स्वीकारले
devendra fadnavis
इंदापूरमधील नाराजीवर मनोमीलन सभेचा उतारा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मेळावा

प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा संजीव नाईक रिंगणात उतरले होते. त्यावेळी शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात असलेले आनंद परांजपे यांनी त्यांचा ९० हजारांच्या फरकाने पराभव केला होता. यानंतर झालेल्या मतदारसंघाच्या पुर्नरचनेमुळे मात्र या लोकसभा मतदारसंघाचे गणित बदलले. ठाण्यातील तीन, नवी मुंबईतील दोन आणि मीरा-भाईदरचा एक अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून ठाणे लोकसभेची रचना करण्यात आली. पोटनिवडणुकीतील पराभवानंतरही संजीव नाईक यांनी या नव्या मतदारसंघाची ठरवून बांधणी केली. वडील गणेश नाईक पालकमंत्री असल्याने आणि राज्यातही काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याचा पुरेपूर फायदा उचलत नव्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेला टक्कर द्यायची रणनिती नाईक कुटुंबियांनी आखली. शिवसेनेने २००९ मध्ये येथून विजय चौगुले या वादग्रस्त प्रतिमेच्य उमेदवारास उमेदवारी देत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे, विद्यमान मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे तत्कालिन जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे चौगुले यांना उमेदवारी देण्यात आली होती. ठाणे आणि मीरा-भाईदर शहरात कोणताही संपर्क नसलेल्या चौगुले यांचा संजीव नाईक यांनी ४० हजारांपेक्षा अधिक मतांच्या फरकाने पराभव केला. नव्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून पाच वर्षात संपूर्ण मतदारसंघात त्यांनी उत्तम संपर्क ठेवला होता. काँग्रेस, राष्ट्रवादीच नव्हे तर शिवसेना, भाजपचे पदाधिकारी आणि विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी निर्माण केलेला सुसंवाद त्यावेळी चर्चेत राहीला होता. मतदारसंघात उत्तम बांधणी आणि विकासकामांसाठी सदैव सकारात्मक दृष्टीकोन ठेवूनही २०१४ मध्ये नरेंद्र मोदी लाटेत मात्र त्यांचा टिकाव लागू शकला नाही. शिवसेनेचे राजन विचारे यांनी त्यांचा दोन लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव केला. हा पराभव अर्थातच नाईक समर्थकांच्या जिव्हारी लागला होता.

आणखी वाचा- Karnataka : भाजपाच्या मंत्र्यांच्या मालमत्तेमध्ये अनेक पटींनी झाली वाढ; काँग्रेसशी बंडखोरी करून केला होता भाजपात प्रवेश

ठाण्यावर पुन्हा लक्ष

पुढे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट कायम असल्याचे लक्षात येताच नाईक कुटुंबियांनी उमेदवारी घ्यायचे टाळले. त्यामुळे राष्ट्रवादी काॅग्रेसला ऐनवेळेस आनंद परांजपे यांना द्यावी लागली. या निवडणुकीत परांजपे यांना मोठा पराभव स्विकारावा लागल्याने नवी मुंबईतील नाईक कुटुंबियांना भाजप प्रवेशाचे वेध लागले. नाईक यांच्या समर्थकांकडून त्यासाठी त्यांच्यावर दबाव असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे शरद पवार यांच्या कुटुंबियांशी अत्यंत सलोख्याचे संबंध असूनही गणेश नाईक यांना भाजप प्रवेश घ्यावा लागला.

मागील वर्षभरात राज्यातील राजकारणात घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर ठाणे आणि कल्याण हे दोन लोकसभा मतदारसंघ नेमके कोणाच्या वाट्याला जाणार याविषयी राजकीय वर्तुळात अजूनही स्पष्टता नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. ठाण्यातही भाजपकडून बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांकडे सोपविण्यात आली असून स्वत: संजीव यांच्याकडे ओवळा-माजीवडा या मतदारसंघाचे प्रभारी पद सोपविण्यात आले आहे. या मतदारसंघावर मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा प्रबळ असला तरी आगामी राजकारणाचे वारे कसे वाहतात याकडे भाजपचे स्थानिक नेतेही लक्ष ठेवून आहेत. शिवाय संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची बांधणी करणारा असा कोणताही ठोस चेहरा शिंदे यांच्या शिवसेनेकडे सध्या तरी नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नावावर एखादा उमेदवार रिंगणात आणायचा आणि ठाण्याची सुत्र आपल्याकडेच ठेवायची असा मुख्यमंत्र्यांची रणनिती असू शकते. दरम्यान, आगामी राजकारणातील ही संभ्रमावस्था लक्षात घेता भाजपमधूनही ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी चाचपणी सुरु झाली आहे. पक्षाचे नेते डाॅ.विनय सहस्त्रबुद्धे तसेच संजीव नाईक ही दोन नावे ठाण्यासाठी चर्चेत आहेत. ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर यांचे नावही पक्षातील एका गोटातून पुढे आणले जात असले तरी स्वत: केळकर दिल्लीस जाण्यास फारसे इच्छुक नसल्याचे कळते. या पार्श्वभूमीवर संजीव नाईक यांनी गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातून जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे पहायला मिळत आहे. वाढदिवसानिमीत्त नाईक समर्थकांनी शहरातील कानाकोपऱ्यात उभारलेले शुभेच्छा फलक यंदा चर्चेत आले. शनिवारीच भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांचाही वाढदिवस होता. त्यामुळे नाईक यांच्या फलकांवर निरंजन यांनाही शुभेच्छा देण्याची समन्वयी खेळी नाईक समर्थकांनी खेळल्याचे बोलले जाते.

आणखी वाचा- “आरएसएसच्या राम माधव यांनी सत्यपाल मलिक यांना ३०० कोटींच्या लाचेची ऑफर दिल्याच्या आरोपावर भाजपा गप्प का?”, नाना पटोलेंचा सवाल; म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी..”

शिंदे यांची भूमिका महत्त्वाची

ठाणे मतदारसंघ युतीत कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत अद्याप काहीच स्पष्टता नाही. संजीव नाईक हे तयारी करीत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणे‌श नाईक यांचे संबंध पूर्वी फार काही सलोख्याचे नव्हते. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून नाईक त्यांच्या कार्यक्रमांमध्ये दिसू लागले आहेत. यामुळे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला तरीही शिंदे नाईक यांना स्वीकारतील का, असे अनेक मुद्दे आहेत.