धुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी अद्याप सुरूच असून जवळपास रोजच एका समस्येची जाणीव करून देत ठाकरे गटाने सत्ताधारी भाजपला खिंडीत गाठण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दुसरीकडे कुठलेही प्रत्युत्तर न देता ठाकरे गटाला खिजगणतीतही धरायचे नाही, अशा मानसिकतेत भाजपा दिसत आहे. त्यामुळे सर्वजण मौन बाळगून आहे.

हेही वाचा- “मी टीपू सुलतानचं नाव घेणार, काय करता ते बघतोच”; भाजपा नेत्याच्या ‘त्या’ विधानानंतर असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

mla babula chowdhary
New challenge for BJP: भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आमदाराने मुलाला उतरवले निवडणूक रिंगणात
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
Sureshdada Patil
शिवसेनेच्या उमेदवारीसाठी सुरेशदादा पाटील यांचे मातोश्रीवर प्रयत्न; भाजपचा घटक पक्ष दुरावणार?
Sanjay Nirupam
ठाकरे गटाच्या उमेदवार यादीमुळे संजय निरुपम बंडखोरीच्या पवित्र्यात? काँग्रेसला इशारा देत म्हणाले…

महानगरपालिकेची निवडणूक जशी जवळ येत आहे, तसा ठाकरे गट विरुध्द भाजप सामना अधिकच टोकदार होऊ लागला आहे. देवपुरातील रस्त्यांच्या निकृष्ठ कामांवर प्रकाश, असंख्य आश्वासने आणि तारखा देऊनही रखडलेले बहुचर्चित अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचे काम, प्रलंबित उद्यान निर्मिती, पाणी पुरवठ्याअभावी कोरडे असलेले जलकुंभ, स्वच्छतेचा बोजवारा अशा एक ना अनेक विषयांवर दररोज नवनवीन लक्षवेधी आंदोलने करीत ठाकरे गटाने भाजपला कैचीत पकडण्याचा पुरेपुर प्रयत्न चालविला आहे. माजी आमदार अनिल गोटे यांच्या कार्यकाळात पांझरा नदीकाठी दुतर्फा झालेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी ठाकरे गटाने केल्यामुळे पुढील निवडणुकीत या सर्व मुद्यांवर भाजपला वेसण घालण्याचे नियोजन केल्याचे दिसून येते. ठाकरे गटाने आंदोलन सत्रातून रणशिंग फुंकले असताना भाजप नेत्यांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे.

हेही वाचा- काँग्रेसमधील एकी किती काळ टिकणार?

मोदी लाटेचा करिष्मा होऊन शहरात भाजपला अच्छे दिन आले. मागील महापालिका निवडणुकीत धुळे शहराच्या मूलभूत विकासावर काम करण्याचे आश्वासन देत भाजप नेते तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे, माजीमंत्री आ. जयकुमार रावल यांनी भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले होते.

धुळे महापालिकेत प्रथमच ५० नगरसेवक निवडून देत धुळेकरांनी भाजपच्या हाती सत्तेच्या चाव्या बहाल केल्या. महापालिका स्थापनेनंतर प्रथम महापौरपद प्राप्त करीत सत्ता स्थापन करणारी शिवसेना आणि त्यानंतर सलग १० वर्ष सत्ता सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेमतेम नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेची एकमेव नगरसेविका निवडून आली. स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेचा असा दारुण पराभव कधीही झाला नव्हता. भाजपच्या लाटेत झालेला हा पराभव शिवसैनिकांच्या चांगलाच जिव्हारी लागला. राज्यातील सत्तांतरानंतर स्थानिक पातळीवर ठाकरे गट भाजपविरोधात अधिक आक्रमक झाला आहे.

हेही वाचा- शिरोमणी अकाली दलने कर्नेलसिंग पंजोलींना दाखवला बाहेरचा रस्ता; पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोपाखाली सहा वर्षांसाठी निलंबित

धुळे शहरातील जनतेला दररोज पाणी पुरवठा, दैनंदिन स्वच्छता, रस्त्यांची नवनिर्मिती, नागरीकांसाठी चांगली उद्याने, विरंगुळा केंद्र, भूमिगत गटार योजना अशी अनेक आश्वासने भाजप नेत्यांनी निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये दिली होती. यासाठी सुमारे ५०० कोटींचा निधी देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिळवून आणल्याचे दावे भाजप नेत्यांनी वेळोवेळी केले. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यानंतर महापालिकेच्या कारभारात कुठलाही बदल घडवून आणण्यात भाजपची सत्ताधारी मंडळी अपयशी ठरल्याचे अधोरेखीत झाले. रस्ते कामाच्या निविदा काढणे आणि विकास कामांची जाहिरातबाजी करण्यापलिकडे विकासाची गाडी धावत नसल्याची टीका होऊ लागल्यानंतर भाजपने प्रस्तावित विकास कामांबाबत ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष कृती करण्याचे प्रयत्न केले.धुळे शहराचा अर्धा भाग असलेल्या देवपूर परिसरात भूमिगत गटार योजना कार्यान्वित करतांना महानगरपालिकेचा गलथान कारभार उघड झाला. गटार योजनेचे पाईप टाकण्यासाठी अवघ्या देवपूर भागातील रस्ते खोदण्यात आले. त्यात दोन वर्षाहून अधिक काळ गेला. या काळात स्थानिकांनी प्रचंड हाल सोसले. हाच मुद्दा घेऊन ठाकरे गटाने भाजप विरोधात सातत्याने आंदोलनांची मालिका लावली. महापालिकेत आणि महापालिकेबाहेर भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण निर्मितीचा प्रयत्न करीत आहे. या आंदोलनांना आता अधिकच धार देण्यात आली आहे. महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुका डिसेंबर २०२३ मध्ये होऊ शकतील. हे डोळ्यासमोर ठेवूनच शिवसेना आक्रमक झाली आहे.

हेही वाचा- Tripura Election 2023: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; TIPRA Motha पक्षामुळे भाजपासमोर कडवे आव्हान

राज्यात सत्तातर होऊन पुन्हा भाजपकडे सत्ता आल्याने माजीमंत्री खासदार डॉ.सुभाष भामरे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी धुळे शहरातील प्रामुख्याने देवपुरातील रस्त्यांसाठी ६० कोटींचा निधी मंजूर करुन आणला आहे. त्यातून दुरावस्था झालेल्या रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरु झाली आहेत. शिवसेनेच्या ऐतिहासिक फुटीनंतरही धुळ्यात शिवसेनेचा कडवट शिवसैनिक आजही उध्दव ठाकरे गटाशी एकनिष्ठ असल्याने शिवसेनेच्या आंदोलनांचा आक्रमक बाज कायम आहे. नव्या वर्षात शिवसेना पदाधिकार्यांनी देवपूरातील रस्ते कामात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप केले. विविध कॉलनी भागातील डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे असल्याचे जागेवर जाऊन रस्ते हाताने उखडवित समाजमाध्यमांतून चित्रफिती प्रसारीत केल्या. चक्करबर्डी पाण्याच्या टाकीच्या संरक्षण भिंतीचे काम झाल्यावर ते अवघ्या २० दिवसात कोसळल्याने विकास कामांचा तकलादूपणा प्रकर्षाने समोर आला. त्यावरही शिवसेनेने आंदोलन करीत हा कळीचा मुद्दा केला. अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने होत असल्याने शहरातील विविध भागात उभारलेले जलकुंभ गेली चार वर्ष कोरडेच राहिले आहेत. शिवसैनिकांनी जलकुंभांवर चढून आंदोलन करीत धुळेकरांचा लक्ष वेधले. माजी आमदार अनिल गोटे यांनी तयार केलेली पांझरा नदी काठावरील चौपाटी हटवून उभारले जाणारे उद्यानही रखडलेले असल्याने तेथील विदारक स्थिती ठाकरे गट मांडत आहे. प्रारंभी दररोज एक असे सलग १० दिवस आंदोलन करीत शिवसेनेने भाजपच्या कार्यपध्दतीवर हल्ला चढविला होता.

हेही वाचा- आरोग्यमंत्र्यांच्या मनमानीच्या विरोधात भाजप आमदाराचीच तक्रार

शिवसेनेच्या आंदोलनामुळे भाजपची धुळे शहरात चांगलीच कोंडी झाली आहे. खुद्द भाजपचे नगरसेवक आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाकडून होणारे असहकार्य आणि टक्केवारीच्या नावाने भरसभांमध्ये आवाज उठवत बोटे मोडली. महापालिकेतील सत्तेला चार वर्ष पूर्ण होत असली तरी अद्यापही जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. त्यात विरोधकांनी आता जाहीर प्रश्न विचारत आगपाखड सुरू केली आहे. परंतु, या प्रश्नांना काय उत्तर द्यावे, असा प्रश्न बहुदा भाजपच्या नेत्यांना पडला असल्याने सर्वच जण मूग गिळून मौन धारण करून आहेत. शिवसेनेच्या आंदोलनांना फारसे महत्व द्यायचे नाही. त्यांना खिजगणतीत न धरता भाजपने शांतपणे आपला कारभार सुरू ठेवण्यात धन्यता मानली आहे.