महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करून हा दौरा तुर्तास स्थगित करत असल्याची माहिती दिली. राज ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी मुंबईतील उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी उत्तर भारतीयांना त्यांना खूप त्रास दिला होता, त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय लोकांची माफी मागावी अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही खासदार बृजभूषण सिंह हे आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्यावर बृजभूषण यांची प्रतिक्रिया

राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला असला तरी राज यांच्या भूमिकेला आमचा विरोध अजूनही ठाम आहे. राज यांनी दौरा रद्द केला असला तरी राज यांनी उत्तर भारतीय लोकांना त्रास दिला हे सत्य कायम आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी माफी मागावी याभूमिकेवर आम्ही ठाम आहोत. “माझ्याकडून आजाणतेपणी जे घडलं त्याबदद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो”  या शब्दांत राज यांनी नरेंद्र मोदी , योगी आदित्यनाथ किंवा उतरप्रदेशची जनता यांच्यापैकी कोणाचीही  माफी मागावी. 

कोण आहेत बृजभूषण सिंह

बृजभूषण सिंह हे मूळ उत्तर प्रदेशातील गोंड येथील रहिवासी आहेत. तसंच कैसरगंज येथील भाजपाचे खासदार आहेत. ते एक उत्तम कुस्तीपटू आहेत. त्यांनी आपला बराचसा काळ हा अयोध्येतील कुस्तीच्या आखाड्यात घालवले आहेत. सिंह जवळपास १० वर्षे रेसीलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि युनायटेड वर्ल्ड रेसीलिंगचे आशिया खंडाचे उपाध्यक्ष आहेत. सहा वेळा खासदर असणाऱ्या सिंह यांनी यापूर्वी गोंडा आणि बारामपूर मतांदर संघाचे नेतृत्व केले आहे. २००९ मध्ये काही काळ ते समाजवादी पक्षाच्या संपर्कात होते. बाबरी मशीद पाडण्याचा प्रकरणात त्यांचे नाव होते. 

भाजपाची प्रतिक्रिया

राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करण्याची सिंह यांची ही भूमिका वैयक्तिक असुन भाजपाची भूमिका नाही. पक्षाने सांगितल्यास आम्ही त्यांच्या भूमिकेला विरोधसुद्धा करू.असं एका भाजपाच्या नेत्याने सांगितले. तर एका भाजपा नेत्याने सिंह यांच्या वक्तव्याला ” पब्लिसिटी स्टंट” म्हटले आहे. 

कुस्तीपटू बुजभूषण सिंह

कुस्तीच्या प्रगतीत आणि वाढीत ब्रजभूषण सिंह यांचा वाट मोठा आहे. कुस्तीमध्ये सिंह यांचा शब्द अनेवेळा अंतिम मानला जातो. ते कुस्ती आणि त्याच्या स्पर्धा यावर वैयक्तिक लक्ष ठेवून असतात. अनेकवेळा मैदानावर चुकीचा निर्णय दिल्यामुळे पंचांच्या अंगावर नियमांची पुस्तिका त्यांनी फेकली आहे. मार्च २०२० मध्ये हिमाचलमध्ये राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा होती. या स्पर्धेला ये जाऊ शकते नाहीत मात्र त्यांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी मैदानात सीसीटीव्ही लावले आणि घरी बसून सामने पाहिले. 

कुस्ती खेळाडूंना सिंह यांचा मैदानावरील दरारा माहीत आहे. त्यामुळे एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावल्यास न्याय मागण्यासाठी खेळाडू संघटनेकडे दाद नं मागता थेट सिंह यांच्याकडे येतात. कुस्तीपटू नरसिंग यादव यानेसुद्धा गेल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या सिंह यांचा दरवाजा ठोठावला होता. सिंह हे खेळाडू तयार करण्यावर भर देत असून उत्तर प्रदेशातील बहराइच, गोंडा, बलरामपूर, अयोध्या आणि श्रावस्ती या जिल्ह्यांमध्ये स्थापन केलेल्या ५० शैक्षणिक संस्थांशी जोडलेले आहेत.  

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brijbhushan sing bjps strong mp and wrestler who wants to keep raj thackeray out of ayodhya
First published on: 20-05-2022 at 15:20 IST