बहुजन समाज पार्टीच्या(बसपा) अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी शनिवारी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(आरएसएस)वर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, भाजपा सरकारच्या अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मांतरण आणि लोकसंख्या धोरणाचे मुद्दे काढत आहे.

लखनऊ स्थित बसपाच्या प्रदेश मुख्यालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्यस्तरीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या एक दिवसीय संमेलनास संबोधित करताना मायावतींनी म्हटले की, भाजपाला सत्ता सोपवूनही अच्छे दिन मिळण्याचा अनुभव अद्यापही न मिळाल्या जनता प्रचंड नाराज आहे.

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
mayawati bsp in up loksabha
बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?

हेही वाचा – Happy Diwali : “आम्ही आहोत, नि:शंकपणे दिवाळी साजरी करा”; जवानाचा अभिमानास्पद संदेश

“देशातील प्रचंड महागाई, गरिबी, बेरोजगारी, हिंसाचार, तणाव आणि अव्यवस्थेने त्रस्त झालेल्या जनतेचे यावरून लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आता लोकसंख्या धोरण आणि धर्मांतरण इत्यादी मुद्दे काढले जात आहेत, जे अतिशय चुकीचे आहे.” असं मायावतींनी म्हटलं.

हेही वाचा – “आज केवळ घोषणांची अतिवृष्टी, अन् या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ”; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल!

याशिवाय “भाजपा सरकारच्या अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी ही एक विचारपूर्वक केलेली रणनीती आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आरएसएस प्रत्येक निवडणुकीत भाजपाला आंधळेपणाने मदत करते, परंतु भाजपा सरकारच्या चुकीच्या आणि लोकविरोधी धोरणांना कधीही उघडपणे विरोध करत नाही, हे दुर्दैव आहे.” असाही मायावतींनी आरोप केला आहे.