scorecardresearch

Premium

BSP Chief Mayawati : आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका ‘बसपा’ स्वबळावर लढणार – मायावतींची घोषणा!

बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याची केली मागणी; आरक्षणाच्या मुद्य्यावरूनही राजकीय पक्षांच्या भूमिकेवर केली टीका

BSP Mayawati
लखनऊ येथे आयोजित पत्रकापरिषदेत बोलताना बसपा प्रमुख मायावती.

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी आज(रविवार) त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक मोठी घोषणा केली. आगामी विधानसभा आणि २०२४ ची लोकसभा निवडणुकीसाठी बसपा कोणत्याही राजकीय पक्षासोबत हातमिळवणी करणार नसून, स्वबळावरच या निवडणुका लढवणार असल्याचे मायवतींनी जाहीर केले आहे.

याशिवाय लखनऊ येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना मायावतींनी काँग्रेसवर संभ्रम निर्माण करत असल्याचाही आरोप केला. आणि म्हटले की, त्यांच्या पक्षाने उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आघाडीकरून निवडणूक लढवली मात्र परिणाम आणि अनुभव योग्य राहिला नाही. म्हणून आता बसपा स्वबळावरच निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस आणि काही अन्य पक्ष आमच्यासोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र आमची विचारधारा ही अन्य पक्षांपेक्षा वेगळी आहे.

AAP-Haryana-vice-president-Anurag-Dhanda
हरियाणामध्ये ‘आप’चा स्वबळाचा नारा; पंजाबमधील मंत्रिमंडळावर लोकसभेची जबाबदारी
sudhir Mungantiwar Lok Sabha
“पक्ष नेतृत्वाचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा,” चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत मुनगंटीवार काय म्हणाले? वाचा…
Samajwadi-Party-in-Chhattisgarh-Assembly-Election
समाजवादी पक्षाचा ‘इंडिया’ आघाडीत खोडा? छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारच्या विरोधात ४० जागा लढविणार
INDIA alliance meeting2
शरद पवारांच्या घरी ‘इंडिया’ आघाडीच्या जागावाटपाबाबत काय निर्णय झाला? काँग्रेस नेते म्हणाले…

बॅलेट पेपरद्वारे निवडणूक व्हावी –

यावेळी मायावतींनी मागणी केली की, आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत, त्या बॅलेट पेपरद्वारे व्हाव्यात. मागील काही वर्षांमध्ये ईव्हीएमद्वारे मतदान होत असल्याने लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे बसपाची निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडे ही मागणी आहे की, आगामी काळातील निवडणुका या बॅलेट पेपरद्वारे घेतल्या जाव्यात.

ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड आहे, काहीजण त्यात खटपट करत आहेत. बॅलेट पेपरच्यावेळी आमच्या जागांची संख्या आणि सर्व मतांची टक्केवारी ही वाढलेली असायची. पुन्हा बॅलेट पेपरद्वारे मतदान घेणे आवश्यक आहे.

आरक्षणाबाबत सर्व पक्षांचा क्रूर दृष्टिकोन –

मायावती म्हणाल्या की, बसपाला पुढे जाण्यापासून रोखलं जात आहे. आरक्षणाबाबत सर्व सरकारांचा दृष्टिकोन क्रूर राहिला आहे. आरक्षणाबाबत भाजपाही काँग्रेसच्याच पावलावर पाऊल टाकत आहे. याचा उत्तर प्रदेशमधील स्थानिक निवडणुकांवर परिणाम पाहायला मिळाला आहे. समाजवादी पार्टी सरकारमध्येही पदोन्नती आरक्षण रद्द करण्यात आलं. एवढच नाही तर १७ ओबीस जातींबाबतही सपा सरकारमध्ये असंवैधानिक काम केलं गेलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bsp will not align with any parties in the upcoming elections mayawati msr

First published on: 15-01-2023 at 13:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×