Premium

‘हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात,’ कॅनडाचा भारतावर गंभीर आरोप, पंजाबमधील पक्षांची भूमिका काय?

शिरोमणी अकाली दल (एसएडी) पक्षाने जस्टिन यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. भारताने हे आरोप गांभीर्याने घेतले पाहजेत, असे म्हटले आहे.

Amrinder Singh Raja AND captain amarinder singh
अमरिंदरसिंग राजा, कॅप्टन अमरिंदर सिंग (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला आहे. जस्टिन यांच्या या आरोपाला भारतानेही जशास तसे उत्तर दिले आहे. भारताने त्यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. जस्टिन यांच्या आरोपानंतर भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांत तणाव निर्माण झाला आहे. कॅनडाने भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला त्यांचा देश सोडण्यास सांगितले. तर भारतानेदेखील कॅनडाच्या भारतातील सहायक उच्चायुक्तांना भारत देश सोडण्यास सांगितले. दरम्यान, जस्टिन यांच्या या आरोपांनंतर पंजाबमधील राजकारण तापले आहे. पंजाबमधील प्रदेश भाजपा आणि काँग्रेसे जस्टिन यांच्या विधानाचा निषेध केला आहे. तर अकली दलाने मोदी यांनी या प्रकरणाशी संबंधित तथ्य देशासमोर ठेवावेत, अशी मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदींच्या भूमिकेनंतरच आम्ही भूमिका स्पष्ट करणार- आप

काँग्रेस आणि भाजपाने कॅनडाच्या पंतप्रधानांचा निषेध केला आहे. तर शिरोमणी अकाली दल (एसएडी) पक्षाने जस्टिन यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. भारताने हे आरोप गांभीर्याने घेतले पाहजेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती देशासमोर ठेवली पाहिजे, अशी भूमिका घेतली. तर पंजाबमध्ये सत्तेत असल्या आम आदमी पार्टीने या प्रकरणावर मोदींनी स्पष्टीकरण दिल्यावर आम्ही याबाबत आमची भूमिका स्पष्ट करू अशी भूमिका घेतली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Canada pm justin trudeau allegations india over pro khalistan leader hardeep singh nijjar what is punjab political parties stand prd

First published on: 20-09-2023 at 19:43 IST
Next Story
“डॉ. मनमोहन सिंग यांना असहाय्यपणे बसलेले पाहून दुःख वाटले होते”, शिवानंद तिवारींनी सांगितली जुन्या संसदेची आठवण