आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होत असतानाच राज्यसभेचे सहा तर विधान परिषदेचे तब्बल २१ आमदार निवृत्त होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक होणार असल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने उमेदवार निवडून आणण्याकरिता कसरत करावी लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या सहा तर विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होईल. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ लक्षात घेता भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्राबल्य असल्याने शरद पवार आणि ठाकरे गटाला राज्यसभा तसेच विधान परिषदेत उमेदवार निवडून आणण्याकरिता मतांची जुळवाजुळव करावी लागेल.

Ajit pawar Mahayuti
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेआधी महायुती-मविआची परिक्षा; अजित पवारांच्या अडचणीत मात्र वाढ
Maharashtra Vidhan Parishad Elections 2024, Challenge for all Political Parties of cross voting, cross voting, mahayuti, maha vikas aghadi, cross voting in vidhan parishad, mla movements,
सर्वच पक्षांना मतांच्या फाटाफुटीचा धोका, विधान परिषदेच्या ११ जागांसाठी चुरस
rajyasabha election hariyana maharashtra
राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी; महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये एनडीएसमोर ‘ही’ आव्हाने
Vishal Patil Wins Sangli Lok Sabha Seat, Trouble for BJP assembly election in sangli and miraj, sangli assembly constituency, miraj assembly constituency, jat assembly constituency,
सांगलीत पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजप पिछाडीवर
Kolhapur ncp sharad pawar marathi news
कोल्हापुरातील इंडिया आघाडीत जागा वाटपाच्या चर्चेला तोंड फुटले; शरद पवार राष्ट्रवादीचा चार जागांवर दावा
New faces from Sharad Pawar group in assembly elections
विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधि
Ajit Pawar Chhagan Bhujbal
“महायुतीत राष्ट्रवादीला विधानसभेच्या ९० जागा मिळणार?” भुजबळांच्या मागणीवर अजित पवार, प्रफुल्ल पटेल म्हणाले…
Preparations of the political parties for the assembly elections have started
विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू

हेही वाचा – परभणीकरांना पालकमंत्र्यांची प्रतिक्षा, संजय बनसोडे जिल्ह्यात फिरकलेच नाहीत

राज्यसभेच्या सहा जागंसाठी फेब्रुवारी वा मार्चमध्ये निवडणूक होईल. सहा जागांसाठी निवडणूक असल्याने प्रत्येक उमेदवाला पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता असेल. १०४ आमदार असलेल्या भाजपला अपक्ष व छोट्या पक्षांचा पाठिंबा असल्याने तीन उमेदवार सहज निवडून येतील. शिवसेनेच्या शिंदे गटाला अपक्षांसह ५० आमदारांचे पाठबळ असल्याने या पक्षाचा एक उमेदवार निवडून येईल. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला ४०च्या आसपास आमदारांचा पाठिंबा असल्याने या पक्षाचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. ४५ आमदार असलेल्या काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाकडे प्रत्येकी १५च्या आसपास आमदार आहेत. दोन्ही गटाने संयुक्त उमेदवार उभा केला तरीही राज्यसभेत उमेदवार निवडून येऊ शकत नाही. यामुळे निवृत्त होणाऱ्या अनिल देसाई व वंदना चव्हाण यांच्यापुढे पुन्हा निवडून येण्याचे आव्हान असेल.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या २५ मतांची आवश्यकता असेल. भाजपचे चार उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून येऊ शकतात. शिंदे गट दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नात असेल. अजित पवार गटाकडे १५ अतिरिक्त मते असल्याने दुसऱ्या उमेदवारासाठी प्रयत्नशील असेल. काँग्रेसचा एक उमेदवार सहजच निवडून येऊ शकतो. काँग्रेसकडील अतिरिक्त मते, पवार आणि ठाकरे गटाच्या मतांच्या आधारे दोन उमेदवारांसाठी प्रयत्न केले जातील. काँग्रेसच्या अतिरिक्त मतांवरच पवार आणि ठाकरे गटाचे भवितव्य अवलंबून असेल. त्यातच विधान परिषदेसाठी गुप्त मतदान पद्दत असल्याने मतांची फोडाफोड होऊ शकते. गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट झाली होती. या निवडणुकीनंतरच एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले होते.

हेही वाचा – आसाम सरकारने मदरशांची नावे बदलण्याचा निर्णय का घेतला? विरोधकांकडून टीका का केली जातेय?

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांसाठी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्याशिवाय निवडणूक होणार नाही. कारण या निवडणुकीत पालिकांमधील नगरसेवक हे मतदार असतात. सध्या राज्यातील बहुतेक पालिकांमध्ये प्रशासकीय राजवट लागू आहे. नगरसेवकच नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सध्या नऊ जागा रिक्त आहेत. त्यात आणखी सहा जागांची भर पडणार आहे.

राज्यसभेचे निवृत्त होणारे सहा सदस्य : (२ एप्रिलला मुदत संपणार)

केंद्रीय मंत्री नारायण राणे, व्ही. मुरलीधरन व प्रकाश जावडेकर (भाजप), कुमार केतकर (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार गट)

विधान परिषदेचे निवृत्त होणारे २१ सदस्य : (सर्व आमदार जून-जुलैमध्ये निवृत्त होणार आहेत.)

विधानसभेतून निवडून आलेले ११ आमदार – भाई गिरकर, रमेश पाटील, रामराव पाटील, निलय नाईक (भाजप), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), वजाहत मिर्झा व प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुर्राणी (राष्ट्रवादी अजित पवार गट), जयंत पाटील (शेकाप), महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष) .

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा सदस्य : अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) – राष्ट्रवादी अजित पवार गट, नरेंद्र दराडे (नाशिक) – शिवसेना ठाकरे गट, रामदास आंबटकर (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली) – भाजप, विप्लप बजोरिया (परभणी-हिंगोली) शिवसेना शिंदे गट, प्रवीण पोटे (अमरावती) – भाजप, सुरेश धस (लातूर-बीड) – भाजप

पदवीधर दोन सदस्य : विलास पोतनीस (मुंबई) शिवसेना ठाकरे गट, निरंजन डावखरे (कोकण) – भाजप

शिक्षक दोन सदस्य : कपिल पाटील (मुंबई) – जनता दल (यू), किशोर दराडे (नाशिक) – अपक्ष