चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजपने घवघवीत यश संपादन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील पाच आमदार विधानसभेत प्रतिनिधित्व करतील. मात्र, या यशानंतरही जिल्हा भाजपमध्ये सत्तासंघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. मंत्रिपदी वर्णी आणि संघटनेवर वर्चस्व मिळवण्यासाठी जिल्हा भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा विजयी झाले. त्यांच्या पाठोपाठ चिमूरमधून कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार सलग दुसऱ्यांदा व भाजपच्या उमेदवारीवर पहिल्यांदा विजयी झाले. वरोरा व राजुरामधून अनुक्रमे करण देवतळे व देवराव भोंगळे हे दोन आमदार पाहिल्यांदाच विधानसभेत पोहचले.

BJP workers waited four hours for Priyanka Gandhis road show
नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण

हेही वाचा – अमरावती जिल्‍ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार, नेत्‍यांमधील संघर्ष वाढणार

पहिला संघर्ष हा मंत्रिपदासाठीच होईल, असे बोलले जाते. मुनगंटीवार, भांगडिया आणि जोरगेवार यांच्यात चढाओढ आहे. मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी तिघेही आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री कोण होणार, यावरच या तिघांचे मंत्रिपद अवलंबून आहे. भाजपमध्ये सध्या ‘गुजरात पॅटर्न’ची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र, जिल्ह्याच्या विकासाचा विषय तसेच आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणूक लक्षात घेता तीनपैकी कोणताही आमदार नाराज होणार नाही, याची काळजी भाजपश्रेष्ठींना घ्यावी लागणार आहे. त्यात मंत्रिपदी कोण बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, पक्ष संघटनेवरदेखील वर्चस्व मिळण्यासाठी संघर्ष होण्याची शक्यता आहे. सध्या भाजप शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुनगंटीवार यांच्या गटाचे आहेत. चंद्रपूर मतदारसंघातून जोरगेवार निवडून आल्याने ते स्वतःच्या समर्थकांची या पदावर नियुक्ती व्हावी, यासाठी नक्कीच आग्रही राहतील. भाजप शहराध्यक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील कामावर जोरगेवार नाराज आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ गठीत झाल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

हेही वाचा – BJP Crisis : निवडणुकीतील पराभवानंतर भाजपामध्ये अंतर्गत कलह, थेट प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी; पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय?

मुनगंटीवार व जोरगेवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेड ही संघटना भाजपत विलीन केलेली नाही. त्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची भाजपमधील संघटनात्मक पदावर वर्णी लागावी म्हणून ते प्रयत्न करतीलच. दुसरीकडे, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना देखील संघटना स्वतःकडे हवी आहे. त्यामुळे अहीर व जोरगेवार एकत्र येऊन या दृष्टीने प्रयत्न करू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्यातरी सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ स्थापनेकडे आहे. या सर्व घडामोडींवर भाजप नेते लक्ष ठेवून आहेत.