रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

चंद्रपूर : गेल्या वेळी राज्यात काँग्रेसने एकमेव जिंकलेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे. यासाठीच भाजपने वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरविले आहे. काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोकर यांच्या पत्नी व आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देऊन सहानुभूती तसेच कुणबी समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करण्यावर भर दिला आहे.

rahul gandhi
“पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशमधील सरकार पाडण्याचं खुलं आव्हान दिलं”, राहुल गांधींचा दावा
Konkan Graduate Constituency, congress, uddhav Thackeray shivsena, congress demand Konkan Graduate Constituency , maha vikas aghadi, sattakaran article,
लोकसभेला मदत केली, पदवीधरची जागा आम्हाला द्या; काँग्रेसचा ठाकरे गटाला सल्ला..
Dhule lok sabha, BJP,
मतदारसंघाचा आढावा : धुळे; विरोधी मतांचे विभाजन टळल्याने भाजपपुढे आव्हान
Pune Lok Sabha, Pune ,
मतदारसंघाचा आढावा : पुणे; पुणे भाजप की काँग्रेसचे ?
Pune Lok Sabha, Pune ,
मतदारसंघाचा आढावा : पुणे; पुणे भाजप की काँग्रेसचे ?
Ajit Pawar, mother, Ajit Pawar latest news,
माझी आई माझ्यासमवेत, अजित पवार असे का म्हणाले?
Sharad Pawar, vote, Malegaon,
शरद पवार यांचे मुंबईऐवजी माळेगाव येथे मतदान
Supriya Sule, polling,
मतदानाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंची मोठी मागणी

तिसरा प्रभावी उमेदवार रिंगणात नसल्याने प्रथमच काँग्रेसचा बालेकिल्ला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व महाविकास आघाडीच्या उमेदवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील लढत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या ताब्यातील हा मतदारसंघ स्वत:कडे खेचून आणण्यासाठी भाजपने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपात तगडा उमेदवार दिला आहे. काँग्रेसने दिवंगत धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना रिंगणात उतरवले. या दोन प्रमुख उमेदवारांसह वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले व बसपचे राजेंद्र रामटेके यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत ही महायुतीचे मुनगंटीवार व महाआघाडीच्या धानोरकर यांच्यात आहे.

आणखी वाचा-Loksabha Election 2024: महाराष्ट्र-तेलंगणा: ‘या’ १४ गावांतील लोक दोन राज्यात बजावतील मतदानाचा हक्क, नेमके प्रकरण काय?

लोकसभा क्षेत्रात चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, वणी व आर्णी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये बल्लारपूर, वणी व आर्णी या तीन मतदारसंघात भाजपचे तर राजुरा व वरोरा या दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. चंद्रपुरात अपक्ष आमदार असून त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. भाजपसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा आहे. यासाठीच मुनगंटीवार यांची इच्छा नसतानाही त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. लोकसभेची उमेदवारी मिळू नये अशीच अपेक्षा मुनगंटीवार यांनी उमेदवारी जाहीर होण्याच्या आधल्या दिवसापर्यंत व्यक्त करीत होते.

काँग्रेसमध्ये प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी यांच्यात उमेदवारीवरून बराच संघर्ष झाला. शेवटी पक्षाने धानोरकर यांना संधी दिली. गेल्या वेळी वातावरण प्रतिकूल असतानाही बाळू धानोरकर हे विजयी झाले होते. प्रतिभा धानोरकर यांची मदार बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाच्या मतांवर आहे.. उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केले असले तरी पक्षांतर्गत धुसफूस शमली नाही. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक, निष्ठावंत कार्यकर्ते अजूनही प्रचारापासून दूर आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष नाराज असल्याची चर्चा आघाडीच्या वर्तुळात आहे.

आणखी वाचा-उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज

भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी जातीपातीच्या राजकारणापेक्षा त्यांनी केलेल्या विकास कामांच्या आधारावर मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मंत्री म्हणून त्त्यांनी केलेली कामगिरीही उजवी आहे. याचा फायदा त्यांना होऊ शकतो. मतदारसंघात कुणबी समाजापाठोपाठ आदिवासी, तेली, माळी, मुस्लीम व दलित मतदारांची संख्या मोठी आहे. या शिवाय शिंपी, न्हावी, धोबी, भोई, वाणी, सुतार, सोनार तथा अन्य छोट्या समाज घटकांची मोट बांधण्याचेही प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. गुजराती, माहेश्वरी, जैन, सिंधी, मारवाडी, राजस्थानी तथा छत्तीसगडी हिंदी भाषिक समाज हा कायम भाजपच्या पाठीशी राहणारा आहे.

पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेनंतर भाजप नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री, मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर, महायुतीला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे दोघेही मुनगंटीवारांच्या प्रचाराला लागले आहेत. मात्र जाहीर सभांमध्ये अहीर-जोरगेवार यांचा सहभाग वाढवावा लागणार आहे.

एकूणच चंद्रपूरची लढत आता चुरशीच्या वळणावर गेली आहे. भाजपचे संघटनात्मक कौशल्य कशा पद्धतीने काम करते तसेच काँग्रेसचे निवडणूक व्यवस्थापन किती प्रभावी ठरते यावरच मुनगंटीवार व धानोरकर लढतीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच मोरवा येथे जाहीर सभा झाली. सभेनंतरच भाजपच्या बाजूने तयार झालेले वातावरण मतदानाच्या दिवसापर्यंत टिकवून त्याचे मतांमध्ये रूपांतर करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत.

आणखी वाचा-Lok Sabha Elections 2024: मोदी सरकारसाठी राम मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा किती परिणामकारक ठरेल? मतदारांच्या मनात काय?

मतदारसंघाचा राजकीय इतिहास

१९५१ पासून काँग्रेसचा गड असलेला हा मतदारसंघ १९९६ मध्ये पक्षातील अंतर्गत बंडाळीने ढासळला व भाजपचे हंसराज अहीर निवडून आले. मात्र १९९८ व १९९९ मध्ये पुन्हा काँग्रेसचे नरेश पुगलिया यांनी विजय मिळवला. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र वैद्य यांनी बंडखोरी करीत बसपाकडून निवडणूक लढवली. त्याचा परिणाम काँग्रेसच्या मतविभाजनात होऊन भाजपचे अहीर विजयी झाले. अहीर यांनी २००९, २०१४ अशा सलग तीन निवडणुका जिंकल्या. २०१९ मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसवासी झालेले बाळू धानोरकर यांनी अहीर यांचा ४४ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. राज्यात काँग्रेसने जिंकलेली ही एकमेव जागा होती. वर्षभरापूर्वी खासदार धानोरकर यांचे अकाली निधन झाल्याने ही जागा रिक्त होती.