सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे यांनी विचार करुन बोलले पाहिजे, त्यांनी अमित शहावर बोलणेच चूक. त्यांचे बोलणे म्हणजे खरे तर सूर्यासमोर दिवाच. अमित शहा त्यांच्या विषयी काही बोलत नाहीत. साधा नामोउल्लेखही करत नाहीत. असे असताना त्यांच्यावर टीका करणे चूकच अशी टप्पणी करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांची राजकीय अवस्था या पुढे केवळ ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ एवढीच राहील, अशी टीका केली.

हेही वाचा >>> भाजपचे मिशन मराठवाडा – रखडलेल्या प्रकल्पांना वेग देण्याची भाजपची योजना

मुंबईतील फलकांवर आता उद्धव ठाकरे यांच्यासमवेत केवळ चार जणांचे छायाचित्र लागतात. त्यांच्याबरोबर असणारे बाकी जणही शिंदे कधी घेऊन जातील त्यांना कळणार नाही. ‘ आमच्यावर काही परिणाम होणार नाही असे ते म्हणतात, या पेक्षा अधिक परिणाम काय पाहिजे त्यांना. सगळे तर त्यांच्याकडून निघून गेले. नैराश्यातून ते अमित शहांवर टीका करतात. पण त्यांची ही टीका म्हणजे सूर्यासमोर दिवा अशा स्वरुपाचे असेल’, अशी टीका बानवकुळे यांनी केली.

हेही वाचा >>> सचिन पायलट यांची इच्छा पूर्ण होणार का ?

लोकभेच्या १६ मतदारसंघात ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आणि मुक्काम असा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे तसाच कार्यक्रम राज्यातील ९८ विधानसभा मतदारसंघासाठी सुरू केला जाणार असल्याची माहिती त्यांनी औरंगबाद येथे पत्रकार बैठकीत दिली. मराठवाडा वैधानिक विकास मंडळे पुन्हा सुरू करण्यााठी निश्चितपणाने प्रयत्न केले जातील. त्यासाठी शिंदे आणि फडणवीस सरकार कट्टीबद्ध असल्याचा दावा त्यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrasekhar bawankule criticized uddhav thackeray position as my family my responsebility print politics news amy
First published on: 23-09-2022 at 15:15 IST