राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रेय होसबळे यांनी देशभक्तीबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. “फक्त भारत माता की जय बोलल्याने देशभक्ती सिद्ध होत नाही, त्यासाठी निस्वार्थी स्वरुपाची सेवा जरुरी असते.”, असे सांगत असताना त्यांनी एक उदाहरण दिले. “प्रभू श्रीराम यांच्या नावाने नाही तर त्यांच्या कामाने लोकांचा उत्कर्ष झाला आहे. जर आपण भगवान श्रीकृष्णाची महानता, श्रीरामाची श्रेष्ठता आपल्या जीवनातील प्रत्येक व्यवहारात, निर्णयात आणि कुटुंबात आचरणात आणत नसू तर आपण फक्त प्रभू श्रीरामाची श्रेष्ठता सांगून काहीही उपयोग होणार नाही.” उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे मकर संक्रांतीच्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रेय होसबळे बोलत होते.

हे वाचा >> ‘भारतातील मुस्लिमांना धोका नाही’, डॉ. भागवत यांच्या विधानावर ओवैसींचा पलटवार; म्हणाले “अल्लाहची मर्जी म्हणून…”

Difference Between Congress And BJP Manifestos Sankalp patra Nyay Patra
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’ला भाजपाकडून ‘लखपती दीदी’चं प्रत्युत्तर; काय आहेत जाहीरनाम्यात महिलांसाठीच्या योजना
lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
Sanjay Raut, Raju Shetty
…तर संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आले असते का ?राजू शेट्टी यांचा प्रतिप्रश्न
Chandrasekhar Bawankule reaction
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”

होसबळे पुढे म्हणाले की, श्रीराम यांचे नाव घेण्याने नाही तर प्रभू श्रीराम यांच्या कामाने माणूस आयुष्यात प्रगती करु शकतो. हो पण हे काम करत असताना श्रीराम यांचे नाव मात्र घ्यायला हवे. जसे फक्त भारत माता की जय बोलणे म्हणजे देशभक्ती होत नाही. तसे प्रभू श्रीरामाचे नाव घेण्यासाठी आपल्याला कष्ट आणि प्रयत्न करावे लागणार आहेत. यावेळी त्यांनी भारतातील महापुरुषांचे विचार आणि स्वप्न अमलात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. आपल्या देशात इतके महापुरुष आहेत की त्यांच्या विचारांनी आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळते. जगातील इतर देशांतील सभ्यतांपेक्षा आपली सभ्यता आणि संस्कृती देखील काही कमी नाही. या देशावर गतकाळात जेव्हा जेव्हा काही संकटे आली, तेव्हा तेव्हा आरएसएसच्या स्वयंसेवकांनी पुढे येऊन देशाची सेवा केली आहे, अशीही आठवण त्यांनी करुन दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देखील अशीच भावना काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. ७ जानेवारी रोजी गोव्याची राजधानी पणजी येथे अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीला संबोधित करत असताना डॉ. भागवत म्हणाले की, आरएसएस असे स्वयंसेवक तयार करतो जो देशातील कोणत्याही क्षेत्रात जाऊन काम करु शकतो, योगदान देऊ शकतो. मात्र हे करत असताना संघटनेचा वापर ‘प्रेशर ग्रुप’ व्हावा, असा कोणताही प्रयत्न संघाकडून केला जात नाही.

संघाचे स्वयंसेवक हे नेहमीच आल्या वैयक्तिक पातळीवर विविध सामाजिक कार्यात सहभागी असतात. मात्र याचा अर्थ संघ हा सेवा संघटन आहे, असा होत नाही. संघाच्या विचारांमुळेच अनेक स्वयंसेवक वैयक्तिक पातळीवर समाजासाठी योगदान देतात. स्वयंसेवकांना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य चांगलेच अवगत झाल्यामुळे आमचे स्वयंसेवक समाजाचे नेतृत्व करण्यामध्ये सर्वात पुढे आहेत, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले होते.