मुंबई : परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर महायुती सरकारचा भर आहे. मुंबई झोपडीमुक्त करण्याचे आमचे उद्दिष्ट असून आम्ही गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देऊ. या सरकारने अडीच वर्षांत इतकी विकासकामे केली आहेत, तर पाच वर्षे मिळाली तर किती करू याची मतदारांनी कल्पना करावी. आधीचे सरकार हे हप्तावसुली सरकार होते हे सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे, असे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

कुर्ला मतदारसंघाचे उमेदवार मंगेश कुडाळकर आणि अंधेरी पूर्व मतदारसंघातील उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचाराची सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, या सरकारने कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्पांमध्ये समतोल साधला आहे. आम्ही गरिबांना परवडणारी घरे देऊ, मुंबईत गरिबांना घराचा अधिकार नाही का, गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का, चांदीचा चमचा घेऊन जन्मलेलेच मुख्यमंत्री होऊ शकतात का, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

BJP state president Bawankule warning about withdrawing BJP's rebel candidate application
अर्ज मागे घेतले नाही तर पक्षाचे दरवाजे बंद; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा बंडखोरांना इशारा
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Anis Ahmed Bhai Rebellion Candidacy Congress print politics news
आपटीबार: ‘लाठी भी मेरी और भैस भी मेरी’
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
assembly elections 2024 Sc reservation Subclassification Grand Alliance Mahavikas Aghadi voting  print politics news
अनुसूचित जातीच्या मतांचे ध्रुवीकरण? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्याचा फटका
Economic decline state government Sharad Pawar Vijay Wadettiwar criticize the government
आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का

हेही वाचा >>>Rebellion In Amravati District :अमरावती जिल्‍ह्यात पाच ठिकाणी बंडखोरी अटळ

आम्ही झोपडपट्टीधारकांना मालकीची घरे देऊन मुंबई झोपडपट्टीमुक्त करू. हे गरीब समर्थक सरकार आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी एक पेन ठेवला नाही, तर मी दोन ठेवतो. आम्ही विद्यार्थी, तरुण, शेतकरी, महिला शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांसाठी निधी दिला आहे. सरकारी पैसा हा जनतेचा आहे आणि त्यावर पहिला अधिकार त्यांचा आहे, असे ते पुढे म्हणाले.

विरोधक मते मागायला येतील तेव्हा जाब विचारा!’

लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबरचा हप्ता आम्ही यापूर्वीच बहिणींच्या खात्यात जमा केला. या योजनेत आपल्या सरकारने पाच हप्ते बहिणींना दिले. आम्ही हप्ते भरणारे आहोत तर आधीचे सरकार हप्ता वसुली करणारे होते, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक या राज्यामध्ये निवडणुकीत खोटी आश्वासने दिली आणि मते मिळवली. सत्ता आल्यावर काँग्रेसने लोकांची फसवणूक केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पैसे नाहीत सांगून हात वर केले, असे सांगताना लाडकी बहिण योजना सुरू करणे हा जर गुन्हा ठरणार असेल तर असे हजार गुन्हे करायला आपण तयार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधक जेव्हा मत मागायला येतील तेव्हा बहिणींनी त्यांना कोर्टात विरोध कोणी केला असा जाब विचारायला हवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दोन दिवसांत महायुतीचा जाहीरनामा

महायुती दोन-तीन दिवसांत आपला जाहीरनामा जाहीर करेल आणि प्रत्येक आश्वासनाची अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले.

Story img Loader