scorecardresearch

दाक्षिणात्य अभिनेता के चिरंजीवी राजकारणात पुन्हा सक्रिय होणार?

राजकारण माझ्यापासून दूर जात नाहीये, असे विधान करत चिरंजीवी यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

दाक्षिणात्य अभिनेता के चिरंजीवी राजकारणात पुन्हा सक्रिय होणार?
के चिरंजीवी (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

दाक्षिणात्य अभिनेता मेगास्टार चिरंजीवी यांनी मला राजकारणापासून दूर राहायचे आहे. पण राजकारण माझ्यापासून दूर जात नाहीये, असे विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जिरंजीवी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार का? असे विचारले जात आहे.

हेही वाचा >>> “राहुल गांधी राजकारणासाठी अयोग्य व्यक्ती,” आसामच्या मुख्यमंत्र्यांची टीका

तेलुगू चित्रपट मेगास्टार के चिरंजीवी यांच्या गॉडफादर या आगामी चित्रपटाचा प्रदर्शनपूर्व कार्यक्रम रायलसीमा प्रदेशातील अनंतपूर येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यानंतरच राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सर्व कार्यक्रम तेलंगाणामधील हैदराबाद किंवा आंध्र प्रदेशमधील विजयवाडा, विशाखापट्टनम येथे आयोजित केले जातात. मात्र जिरिंजीवी यांनी त्यांच्या गॉडफादर या चित्रपट प्रदर्शनापूर्वीचा कार्यक्रम अनंतपूर येथे आयोजित केला होता. चिरंजीवी यांच्या या निर्णयाचेही अनेकांना आश्चर्य वाटले असून, यामागे त्यांचा काही राजकीय हेतू होता का? असा प्रश्न विचारला जातोय.

हेही वाचा >>> ‘पीएफआय’ वरील बंदीचा ‘एसडीपीआय’ सारख्या समविचारी संस्थांवर परिणाम नाही

केंद्रीय मंत्री राहिलेले के चिरंजीवी अजूनही काँग्रेसचे सदस्य आहेत. काँग्रेसचे सदस्य असले तरी त्यांनी आतापर्यंत स्वत:ला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवलेले आहे. त्यांचे धाकटे बंधू के पवन कल्याण हेदेखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये ‘पॉवरस्टार’ म्हणून ओळखले जातात. ते जनसेना पार्टी (जेएसपी) या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. पवन कल्याण मागील काही महिन्यांपासून आंध्र प्रदेशमधील रायलसीमा या भागाचा दौरा करत आहेत. त्यांनी याआधी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अनंतपूरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे सांगितलेले आहे. असे असताना के चिरंजीवी यांनीदेखील आपल्या चित्रपटाचा पूर्वप्रदर्शनाचा कार्यक्रम अनंतपूर येथेच घेतला आहे. याच कारणामुळे दोघे बंधू युती करून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांना मदत करणार का? असे विचारले जात आहे.

हेही वाचा >>> नितीशकुमार यांनी केला तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, विरोधकांना मिळाली टीका करण्याची आयती संधी

दरम्यान, चिरंजीवी यांनी मला राजकारणापासून दूर जायचे आहे, असे म्हणताच काँग्रेसने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ते २०२७ पर्यंत आंध्रप्रदेश काँग्रेसचे सदस्य/प्रतिनिधी असतील असे काँग्रसने जाहीर केलेले आहे. याअगोदर चिरंजीवी यांनी प्रजा राज्यम पार्टी या पक्षाची स्थापना केली होती. पुढे हा पक्ष त्यांनी बरखास्त केला. आंध्रप्रदेशचे विभाजन झालेले नसताना २००८ साली त्यांच्या पक्षाने १८ जागांवर विजय मिळवला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या