विमानसेवा आणि श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याच्या चिमणी बचावासाठी सोलापुरात गेल्या दिन महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन आणि प्रतिआंदोलन, त्यातूनच सिध्देश्वर कारखान्याचे अध्वर्यू धर्मराज काडादी आणि भाजापचे आमदार विजय देशमुख यांच्यात उफाळलेला संघर्ष यामुळे विशेषतः स्थानिक वीरशैव लिंगायत समाजात अजूनही अस्वस्थता दिसून येते.

हेही वाचा- अजितदादांच्या सांगली दौऱ्यात जयंतरावांची अनुपस्थिती खटकणारी

Daighar Garbage, Daighar, Thane,
ठाणे : डायघर कचरा प्रश्न पेटणार, मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

विमानसेवा आणि सिध्देश्वर कारखान्याची चिमणी वाचविण्याचा मुद्दा बाजूला पडून आता काडादी आणि आमदार देशमुख यांनी एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिल्यामुळे या प्रश्नाला वेगळे वळण लागले असताना लिंगायत समाजातही कोणाच्या बाजूने कौल द्यायचा, यावरून चलबिचलता दिसून येते. काडादी- देशमुख संघर्ष परवडणारा नाही. यात समाजाचेच नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून समाजाच्या हितासाठी दोघांचेही नेतृत्व गरजेचे आहे, असा मतप्रवाह समोर येत आहे.

सोलापुरात यापूर्वी राजकीय, सामाजिक, उद्योग, व्यापार, शेती, सहकार अशा अनेक आघाड्यांवर वीरशैव लिंगायत समाजाचे एकहाती वर्चस्व होते. अप्पासाहेब काडादी, वि. गु. शिवदारे, बाबुराव चाकोते या दिग्गज नेत्यांच्या पश्चात नवे भक्कम आणि सर्वसमावेशक नेतृत्व तयार होऊ शकले नाही. लिंगायत समाजाची अवस्था निर्नायकी असतानाच अप्पासाहेब काडादी यांचे नातू धर्मराज काडादी आणि भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्यात सुप्त संघर्ष गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. होटगी रस्त्यावरील जुन्या विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी लगतच्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या उंच चिमणीचा अडथळा ठरतो म्हणून ही चिमणी पाडून टाकावी आणि विमानसेवा सुरू करावी, या मागणीसाठी सोलापूर विकास मंचच्या नावाखाली आंदोलन सुरू झाले असतानाच या आंदोलनाचा बोलावता धनी कोण आहे, ही बाब लपून राहिली नाही. यात आमदार देशमुख यांची फूस असल्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्पष्ट झाले असता काडादी व देशमुख यांच्यातील संघर्ष सुप्त न राहता चांगलेच उफाळून आले.

हेही वाचा- महिलांना प्रतिमहिना २००० रुपये देऊ, कर्नाटकात काँग्रेसचे आश्वासन; पंजाब, हिमाचलमधील आश्वासनांची काय स्थिती?

दुसरीकडे जुन्या विमानतळाला भक्कम पर्याय असलेल्या बोरामणी आंतरराष्ट्रीय काॕर्गो विमानतळाची रखडलेली उभारणी लवकर व्हावी आणि सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी वाचवावी, ही मागणी पुढे रेटत सिध्देश्वर कारखान्याच्या हजारो सभासद शेतकरी व कामगारांसह काडादी समर्थकांनी सर्वपक्षीय विराट मोर्चा काढला होता. भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी व भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी काडादी यांनाच साथ दिली असून सिद्रामप्पा पाटील व शिवशरण पाटील हे भाजपचेच माजी आमदारही काडादी यांच्या पाठीशी उभे असताना आमदार विजय देशमुख एकटेच पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. यातच काडादी यांनी विराट मोर्च्यात बोलताना आमदार देशमुख यांचा थेट नामोल्लेख टाळून त्यांच्यावर कडवट टीका केली होती. या टीकेला नंतर आमदार देशमुख यांनीही तोडीस तोड उत्तर देताना काडादी यांना संघर्षासाठी थेट मैदानात उतरून विश्वासार्हता सिध्द करण्याचे आव्हान दिले होते. काडादी यांच्यावर बरसताना आमदार देशमुख यांनी भाजपच्या आमदार-खासदारांवर आरोप सहन करणार नाही, असे सांगत काडादींविरोधातील वादात भाजपलाही आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. परंतु या वादात भाजपला घेण्याचा प्रश्नच नव्हता. काडादी यांनी वैयक्तिक आमदार विजय देशमुख यांच्यावरच आसूड ओढले होते. यात भाजपची इतर जवळपास सर्व नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी काडादी यांनाच साथ दिल्याचे उघड होते.

हेही वाचा- गुजरातमध्ये काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या ३८ नेत्यांची हकालपट्टी!

या पार्श्वभूमीवर काडादी यांनी आमदार विजय देशमुख यांचे आव्हान स्वीकारत, आपण मैदानातच आहोत, तुम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळवूनच दाखवा, असे थेट प्रतिआव्हान दिले आहे. कर्नाटकचे गृहनिर्माण, पायाभूत सुविधा विभागाचे मंत्री व्ही. सोमण्णा हे काडादी यांचे व्याही आहेत. सोमण्णा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळातील मानले जातात. भाजपमध्ये त्यांच्या शब्दाला वजन असल्याचे म्हटले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही महिन्यांपूर्वी सोमण्णा यांच्या निवासस्थानी भेट दिली होती, हे येथे उल्लेखनीय. काडादी हे तसे शांत व संयमी असले तरी स्वतःची ताकद दाखवून सलग चारवेळा आमदार राहिलेल्या देशमुख यांना धक्का देऊ शकतात.

हेही वाचा- उस्मानाबादेत पीकविम्यावरून शिवसेना – भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण

ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेच्या तोंडावरच काडादी व देशमुख संघर्ष वाढल्यामुळे वीरशैव लिंगायत समाजात वातावरण तापले होते. आता दोन्ही बाजूंनी युद्धपूर्व शांतता आहे. परंतु या वादात काडादी आणि देशमुख यांच्यापैकी नेमक्या कोणाच्या बाजूने कौल द्यायचा, या प्रश्नाने लिंगायत समाजात अस्वस्थता दिसून येते. कारण हे दोघेही नेते समाजाच्या हिताच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे मानले जातात. सिध्देश्वर साखर कारखाना, सिध्देश्वर देवस्थान, सिध्देश्वर शिक्षण संस्था, संगमेश्वर महाविद्यालय, दै. संचार व इतर अनेक संस्थांशी निगडीत कामांसाठी काडादी यांची मदत घ्यावी लागते. तर शासन व प्रशासकीय स्तरावरील अडीअडचणींच्या कामांसाठी आमदार विजय देशमुख यांच्याकडेच जावे लागते. काडादी व देशमुख संघर्ष आणखी ताणला न जाता आपसात मिटवावा. त्यासाठी या दोघांना तेवढ्याच हक्क आणि अधिकाराने एकत्र आणण्यासाठी बार्शीच्या बुजूर्ग नेत्या, माजी आमदार प्रा. प्रभाताई झाडबुके, माजी मंत्री दिलीप सोपल, सांगोल्याचे प्रा. प्रबुध्दचंद्र झपके यांनी पुढाकार घ्यावा, अशी महत्त्वाची सूचनाही काही मंडळींनी केली आहे.