भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमदेवार कपिल पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्याचे खापर पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यावर फोडले. एकीकडे मुरबाड विधानसभेतून पाटील यांना आघाडी मिळाली असली तरी ती गेल्या वेळच्या तुलनेत असल्याने त्याला कथोरे जबाबदार असल्याचे बोलले जात होते. मात्र पराभवानंतरही कपिल पाटील यांनी मुरबाड मतदारसंघात बैठकांचा धडाका सुरूच ठेवल्याने कथोरे समर्थकांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा धक्कादायक निकाल लागला. यात केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यासाठी त्यांनी जनसंवाद यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी विधानसभानिहाय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा जोमाने काम करून विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला. मात्र यावेळी सर्वाधिक आघाडी मिळालेल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील संवाद भेटी चर्चेच्या विषय ठरल्या.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Naveen Patnaik begins a new innings as Opposition leader BJD Odisha
तब्बल २४ वर्षं मुख्यमंत्रिपद भूषवलेले नवीन पटनाईक कशी बजावणार विरोधी पक्षनेत्याची भूमिका?
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
After defeat of Ajit Pawars NCP in Pimpri-Chinchwad former corporators office bearers are uneasy
अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला बालेकिल्ल्यात खिंडार?
kiran choudhry joins bjp
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणीत वाढ; माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेचाच भाजपात प्रवेश
BJP, defeat, nanded lok sabha, observer, radhakrishna vikhe patil, ashok chavhan
अशोक चव्हाणांच्या समावेशानंतरही नांदेडमध्ये पराभव, भाजप विश्लेषण करणार, विखे-पाटील नांदेडमध्ये
Who spent money on Sunetra Pawars campaign
सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा खर्च कोणी केला?

हेही वाचा… तब्बल २४ वर्षं मुख्यमंत्रिपद भूषवलेले नवीन पटनाईक कशी बजावणार विरोधी पक्षनेत्याची भूमिका?

कथोरेंच्या मतदारसंघात पाटलांची झाडाझडती

आपल्या जनसंवाद यात्रेनिमित्त कपिल पाटील यांनी बदलापूर, मुरबाड शहरात बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये पाटील समर्थक भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि समर्थकांचा समावेश होता. या दोनही ठिकाणच्या बैठकांमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे कथोरे आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या जातीच्या राजकाणावरही बोट ठेवले. भिवंडी मतदारसंघात जातीचा फॅक्टर सुरू होता. त्याचबरोबर भाजपाच्या जवळच्या लोकांनी विरोधी कार्य केले. मुरबाड विधानसभा क्षेत्रात महायुतीला कमी मतांसाठी कार्यरत असलेल्या नेत्यांना पाणी पाजून मुरबाड विधानसभा मतदारसंघात ३२ हजारांची आघाडी मिळविण्याचे कार्य महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले, असे सांगत पाटील यांनी थेट कथोरे यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्या बैठकांना भाजप समर्थकांच्या उपस्थितीमुळे कथोरे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे.

हेही वाचा… “मतं दिली नाहीत म्हणून मुस्लिमांची कामं करणार नाही”; हे वादग्रस्त वक्तव्य करणारे खासदार कोण आहेत?

भेटीगाठींमुळे कथोरे समर्थकांत अस्वस्थता ?

कपिल पाटील यांनी बदलापूर आणि विशेषतः मुरबाड विधासनभा मतदारसंघात घेतलेल्या बैठकांमुळे कथोरे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ पाटील यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामुळे मुरबाड मतदारसंघाच्या ग्रामीण भागात पाटील यांची बांधणी सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पराभरावानंतर पाटलांकडून ही झाडाझडती घेतल्याचे बोलले जाते. कथोरेंपासून नाराज असलेले आणि भाजपात असलेल्यांची मोट बांधण्याचा हा प्रयत्न असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आपल्या पराभवासाठी मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे आणि त्यांचे समर्थक कारणीभूत असल्याचा दावा पाटील यांच्या बोलण्यातून अनेकदा करण्यात आला आहे. त्यामुळे कथोरे यांच्या मतदारसंघात येत्या विधानसभा निवडणुकीत पाटील समर्थक वचपा काढण्यासाठी तयारी करतील अशी शक्यता व्यक्त होते आहे. मात्र किसन कथोरे यांच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघात आणि आसपासच्या कल्याण, कल्याण ग्रामीण, शहापूर या मतदारसंघात स्वतःची यंत्रणा आहे. त्यांचे समर्थकही पक्ष कोणताही असला तरी कथोरे यांच्या पाठिशी उभे राहतात. अशावेळी पाटील यांच्या खेळीमुळे कथोरेंच्या विधानसभेच्या निकालावर खूप परिणाम होईल, याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते.