नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधी काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांची मुदत येत्या तीन महिन्यांत, फेब्रुवारी २०२३ मध्ये संपत आहे. त्यापूर्वी ही निवडणूक जाहीर होईल. या मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मात्र यंदा मतदार नोंदणीस कमी प्रतिसाद मिळालेला आहे. काँग्रेसने पुन्हा डॉ. तांबे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीनेही त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण हे भाजपने अद्याप जाहीर केलेले नाही. भाजपमधील उमेदवारीचा घोळ अद्याप सुरूच आहे. 

हेही वाचा- उदयनराजेंच्या भूमिकेने सर्वपक्षीय बुचकळ्यात !

ajit pawar alternative candidate in baramati
बारामतीत अजित पवार पर्यायी उमेदवार?
Lok Sabha election 2024 Heavy marching in North Nagpur Predominance of Congress and BJP is also ready
रणसंग्राम लोकसभेचा : उत्तर नागपुरात जोरदार मोर्चेबांधणी; काँग्रेसचे प्राबल्य, भाजपही सज्ज!
Nagpur Lok Sabha Constituency decision to reject nomination of Adv Pankaj Shambharkar is upheld by High court
नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘या’ उमेदवाराला झटका; उच्च न्यायालय म्हणाले, ‘निवडणुकीत हस्तक्षेप…’
akola lok sabha 2024 marathi news, akola congress lok sabha candidate marathi news,
अकोल्यात काँग्रेसचे ठरेना; उमेदवाराची प्रतीक्षा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. तांबे यांनी सन २०१० मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीसह गेल्या तीन निवडणुकांतून या मतदारसंघात विजय मिळवला आहे. यंदा भाजपकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू राजेंद्र विखे व धुळ्यातील शिक्षण संस्थाचालक धनराज विसपुते यांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र भाजपाने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. 

भाजप परिवारातीलच संघटना असलेली शिक्षक परिषद यंदा काहीशी बंडाच्या पवित्र्यात आहे. शिक्षक मतदारसंघात भाजपने परिषदेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आणि पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला परिषदेने सहकार्य करायचे असा सामंजस्याचा करार पूर्वीपासून चालू होता. मात्र गेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात याला भाजपकडून तडा दिला गेल्याचा आरोप होत आहे. त्यातूनच नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी शिक्षक परिषदेने दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनही उमेदवारी जाहीर होणे लांबल्याची चर्चा होत आहे. 

हेही वाचा- वादग्रस्त ‘उद्योगी’ सुरेश धस !

नगर, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात समावेश होतो. सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी एकूण २ लाख ५६ हजार २९५ मतदारांची नोंदणी झाली होती. यंदा निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत १ लाख ५५ हजार ३२० मतदारांची नोंदणी झाली आहे. येत्या ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. आयोगाने यंदापासून ऑनलाइन मतदान नोंदणी परवानगी दिली. मात्र त्यामध्ये नोंदणी अपात्र ठरण्याचे प्रमाण मोठे आहे. नगर जिल्ह्यातून १९ हजार ३३९ ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. मात्र ६३९१ नोंदणी अपात्र ठरली आहे. हेच प्रमाण ऑफलाइन नोंदणीमध्ये २१२५ आहे. दि. ३१ ऑक्टोबर २०१९ नंतरची पदवी, अस्पष्ट कॉपी, पत्ता अपूर्ण अशी ऑनलाइन मतदार नोदणीतील अपात्रेतीची प्रमुख कारणे आहेत. आयोगाने प्रथमच अपात्र ठरण्याची कारणेही जाहीर केली आहेत. मतदार नोंदणीचे दावे, हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ९ डिसेंबरपर्यंत नोंदणीचा दुसरा टप्पा असेल त्यामध्ये राजकीय पक्षांना नोंदणी वाढवण्यासाठी पराकाष्टा करावी लागणार आहे. 

यंदा नाशिक जिल्ह्यातून मतदार नोंदणीला खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. गेल्यावेळी ९६ हजार १३६ झाली होती. ती यंदा केवळ ३० हजार ६६ झाली आहे तर नगरमधून गेल्यावेळी ८५ हजार ५६५ झाली होती. ती यंदा केवळ ६९ हजार ८३४ झाली आहे. जळगाव, धुळे जिल्ह्यातून हीच परिस्थिती आहे. केवळ नंदुरबारमधून दोन हजारावर नोंदणी वाढली आहे. 

हेही वाचा- स्वत: भाजपाच्या उमेदवार पण सासरेबुवांकडून काँग्रेसचा प्रचार! रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा म्हणाल्या “माझे सासरे…”

प्रारूप यादीतील मतदार संख्या (कंसात सन २०१७ मधील नोंदणी) 

नगर-६९८३४ (८५५६५) 

नाशिक-३००६६ (९६१३६) 

जळगाव-२४२११ (३४४४२) 

धुळे-१४६३२ (२५४२२) 

नंदुरबार-१६५७७ (१४९६०) 

एकूण-१५५३२० (२५६२५५) 

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकवेळी निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी मोठा कालावधी दिला होता. यंदा कालावधी कमी झाला. उशिराने नोंदणीस सुरुवात झाली. त्यामध्ये पुन्हा दसरा, दिवाळी सुट्टीचा कालावधी आला होता. मतदारनोंदणीची प्रक्रिया काहीशी क्लिष्ट झाली आहे. प्रमाणपत्राचा पार्श्वभूमी पांढराशुभ्र हवा अशा अटी लागू करण्यात आल्या. त्यात पुन्हा तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांकडून अडचणी निर्माण केल्या गेल्या. परंतु आता दुसऱ्या टप्प्यात नोंदणी वाढेल अशी अपेक्षा आहे, असे मत आमदार डॉ. सुधीर तांबे