आगामी लोकसभा तसेच दिल्ली विधानसभा निवडणूक लक्षात घेता काँग्रेसने दिल्लीमध्ये मोठा संघटनात्मक बदल केला आहे. काँग्रेसच्या हायकमांडने दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अरविंदरसिंग लव्हली यांच्यावर सोपली आहे. शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना लव्हली हे त्यांच्या सरकारमध्ये शिक्षण, वाहतूक, शहर विकास तसेच महसूलमंत्री होते.

वाटाघाटी सोपी व्हावी म्हणून लव्हली यांची नियुक्ती?

२०२४ साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी यांच्या पराभवासाठी विरोधकांनी ‘इंडिया’ नावाने आघाडी केली आहे. या आघाडीत आम आदमी पार्टी (आप) पक्षासह काँग्रेसचाही समावेश आहे. सध्या दिल्लीमध्ये आपची सत्ता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वाटाघाटी सोपी व्हावी, यासाठी लव्हली यांच्याकडे दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे म्हटले जात आहे.

BJP workers waited four hours for Priyanka Gandhis road show
नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Former Shiv Sena MLA Mahadev Babar announced support for independent candidate Gangadhar Badhe
हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांचा मोठा निर्णय ! महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांंच्या अडचणी वाढल्या
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?

अजय माकन, संदीप दीक्षित यांच्यापेक्षा लव्हली बरे?

लव्हली यांच्यावर दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे भविष्यात आप पक्षाशी वाटाघाटी करणे सोपे होईल, असे येथील काही नेत्यांचे मत आहे. कारण लव्हली यांचे आप पक्षातील काही नेत्यांशी चांगले संबंध आहेत. दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत तेथील अजय माकन आणि संदीप दीक्षित हे दोन नेते होते. मात्र हे दोन्ही नेते आप पक्षाशी आघाडी किंवा जागांची वाटाघाटी करण्यास अनुकूल नव्हते. तर दुसरीकडे लव्हली हे या दोन नेत्यांच्या तुलनेत प्रभावीपणे आप पक्षाशी चांगले संबंध ठेवू शकतात, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.

लव्हली यांच्या नियुक्तीमुळे काय फायदा होणार?

दिल्ली काँग्रेसमधील काही नेत्यांना लव्हली यांच्या नेमणुकीमुळे आप आणि काँग्रेस यांच्यातील संबंध सुधारतील असे वाटते. तर काही नेत्यांना या मताच्या विपरित म्हणजेच लव्हली यांच्या येण्याने आप पक्षाशी असलेले संबंध आणखी बिघडतील असे वाटते. असे असले तरी लव्हली यांच्याकडे नेतृत्व सोपवल्यामुळे काय फायदा झाला, हे येणारा काळच सांगू शकेल. लव्हली हे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पूर्वी दिल्ली मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार आहेत.

“२०२५ साली आम्ही आप पक्षाविरोधात लढणार”

२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर पुढच्याच वर्षी म्हणजेच २०२५ साली दिल्लीमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस आप पक्षाविरोधात लढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीतपर्यंत काँग्रेस पक्षाला दिल्लीमध्ये बळकटी मिळावी, यासाठीदेखील त्यांच्याकडे दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याचे म्हटले जात आहे. याबाबबत बोलताना “शील दीक्षित यांचा वारसा म्हणून लव्हली यांच्या नियुक्तीकडे पाहिले पाहिजे. भाजपाला थांबवण्यासाठी सध्या राज्य पातळीवर असलेल्या मतभेदांना विसरणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही सध्या एकत्र आलेलो आहोत. मात्र २०२५ साली आम्ही आम आदमी पार्टीच्या विरोधात नक्की निवडणूक लढू. आप पक्षाने दिल्लीमध्ये काय केले आहे ते एकदा पाहा. काँग्रेसने येथे जे काही उभे केले होते, ते सर्व नष्ट करण्याचे काम आपने केले आहे,” असे मत काँग्रेसच्या नेत्याने व्यक्त केले.

पराभवाची जबाबदारी स्वीकारून दिला होता राजीनामा

दरम्यान, लव्हली हे दिल्लीच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. विद्यार्थीदशेत असताना एनएसयूआयच्या माध्यमातून त्यांनी काम केले. पुढे वयाच्या ३० व्या वर्षी ते गांधीनगर येथून पहिल्यांदा आमदार झाले. ते आतापर्यंत चार वेळा आमदार राहिलेले आहेत. २०१३ साली त्यांची दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. मात्र २०१५ सालच्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. या निवडणुकीत आप पक्षाने ७० पैकी तब्बल ६७ जागांवर विजय मिळवला होता. आप पक्षाने काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आणले होते. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून लव्हली यांनी दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

९ महिन्यानंतर भाजपात परतले

त्यानंतर ते दिल्लीच्या राजकारणात दिसेनासे झाले होते. मात्र २०१७ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे भाजपाचे नेते अमित शाह यांनी स्वागत केले होते. भाजपात मोठी जबाबदारी मिळेल अशी लव्हली यांना अपेक्षा होती. मात्र भाजपामध्ये त्यांना कोणतीही महत्त्वाची आणि मनासारखी जबाबदारी मिळाली नाही. त्यानंतर साधारण ९ महिन्यानंतर ते काँग्रेसमध्ये परतले.

दरम्यान, लव्हली यांच्याकडे दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद आल्यामुळे भविष्यात येथे काँग्रेसचा किती विस्तार होणार. लोकसभा आणि २०२५ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लव्हली कोणती भूमिका बजावणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.