scorecardresearch

Premium

चंद्रशेखर राव सरकारच्या विरोधातील नाराजीचा काँग्रेसला फायदा, पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांचे निरीक्षण

तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारचा भ्रष्टाचार, घराणेशाही, खोटी आश्वासने याबद्दल सामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. या नाराजीतूनच काँग्रेसला फायदा झाल्याचे निरीक्षण तेलंगणातील काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी नोंदविले.

Chandrashekhar Rao
चंद्रशेखर राव सरकारच्या विरोधातील नाराजीचा काँग्रेसला फायदा, पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांचे निरीक्षण (संग्रहित छायाचित्र)

तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारचा भ्रष्टाचार, घराणेशाही, खोटी आश्वासने याबद्दल सामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. या नाराजीतूनच काँग्रेसला फायदा झाल्याचे निरीक्षण तेलंगणातील काँग्रेसचे प्रभारी आणि राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नोंदविले. स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती काँग्रेस पक्षामुळे झाली होती. त्याचे श्रेय अखेर काँग्रेसला मिळाले, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

चंद्रशेखर राव यांच्या सरकारमध्ये सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होता. याचा सामान्य नागरिकांना प्रंचड त्रास होत असे. घराणेशाहीशिवाय कोणाला महत्त्वच मिळत नव्हते. स्वत: चंद्रशेखर राव मुख्यमंत्री, मुलगा मंत्री, भाचा मंत्री, मुलगी आमदार व अन्य नातेवाईकही महत्त्वाच्या पदांवर असे चित्र होते. पक्षाच्या मंत्र्यांनाही काहीही अधिकार नव्हते वा त्यांना स्वातंत्र नव्हते. चंद्रशेखर राव यांच्या सरकारच्या विविध योजनांची प्रसिद्धीच अधिक झाली. या योजनेचा सामान्य नागरिकांना लाभ मिळाला नव्हता. नुसती जाहीरातबाजी करून चालत नाही हा तेलंगणाचा संदेश असल्याचे मतही ठाकरे यांनी व्यक्त केले.

Jharkhand Chief Minister Champai Soren claim on the displeasure of Congress mla
सरकारला धोका नाही! काँग्रेस आमदारांच्या नाराजीच्या चर्चेवर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा दावा
Madhya Pradesh Congress
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनंतर आता मध्यप्रदेशचे माजी सीएम कमलनाथही भाजपाच्या वाटेवर? राजकीय चर्चांना उधाण!
narendra modi loksabha
काँग्रेसवर सडकून टीका, घराणेशाहीचे आरोप, विजयाचा विश्वास; १७ व्या लोकसभेतील पंतप्रधानांच्या शेवटच्या भाषणातील पाच मुख्य मुद्दे
Finance Minister Nirmala Sitharaman reply to opponents that there is no bias in fund distribution
निधीवाटपात पक्षपात नाही! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

हेही वाचा – राजस्थानमध्ये मोदी, ध्रुवीकरण, जातींच्या आधारावर भाजपची सत्तेवर पकड

सामान्य नागरिकांना खोटी आश्वासने दाखवून स्वत:चे महत्त्व वाढविणाऱ्या चंद्रशेखर राव यांचा फुगा फुटल्याचे मतही ठाकरे यांनी व्यक्त केले. सामान्य नागरिकांमध्ये चंद्रशेखर राव सरकारबद्दल नाराजी होती. ही नाराजी राज्यात फिरताना स्पष्टपणे दिसत होती. या नाराजीचाच काँग्रेसला फायदा झाला.
काँग्रेसने प्रचारात तेलंगणातील सरकारच्या गैरकारभारावर नेमके बोट ठेवले. सरकार सर्व आघाड्यांवर कसे अपयशी ठरले आहे हे जनतेला दाखवून दिले. काँग्रेसने दिलेली पाच आश्वासने लोकांच्या पसंतीस उतरली. त्यातूनच जनतेने काँग्रेसला कौल दिला आहे.

हेही वाचा – Assembly Election Result : मिझोराममध्ये अद्याप मतमोजणी नाही; ‘हे’ आहे कारण!

स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी काँग्रेसचे योगदान मोठे होते. तत्कालीन यूपीए सरकारने स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीला हिरवा कंदिल दाखविला होता. स्वतंत्र तेलंगणा राच्याच्या निर्मितीचे अखेर काँग्रेस पक्षाला श्रेय मिळाले आहे, असे मतही ठाकरे यांनी व्यक्त केले. काँग्रेसला मिळालेल्या बहुमताबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करतानाच पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांच्या बैठकीत नेत्याची निवड केली जाईल. याबाबत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे पुढील निर्णय घेतील, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress benefited from the displeasure of the opposition to the chandrashekhar rao government observation of party incharge manikrao thackeray print politics news ssb

First published on: 03-12-2023 at 16:12 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×