हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश कार्याध्यक्ष हर्ष महाजन यांनी काँग्रेस पक्षाचा राजानामा देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – फडणवीसांचे दुसरे सरकार अयशस्वी करण्यातही एकनाथ शिंदे यांचा सहभाग पुन्हा चर्चेत 

भाजपात प्रवेश केल्यानंतर हर्ष महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ”गेली ४५ वर्ष मी काँग्रेसमध्ये होतो. मी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहे. मात्र, आता काँग्रेस दिशाहीन होत असल्याने मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. येत्या निवडणुकीत भाजपा मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहे. कारण भाजपाकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रसिद्ध चेहरा आहे.”

हर्ष महाजन यांच्या भाजपात जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गेल्याकाही काही दिवसांत खिमी राम, आमदार लखविंदर राणा आणि पवन काजल, यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान, महाजन यांच्या भाजपा प्रवेशाबाबत बोलताना हिमाचल प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नरेश चौहान म्हणाले, “महाजन यांनी काँग्रेससाठी इतके वर्ष काम केले. त्यामुळे त्याचं पक्ष सोडून जाणं अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला, याबाबत आम्हाला कल्पना नाही.”

हेही वाचा – राजस्थानच्या तीन नेत्यांना बजावली नोटीस, काँग्रेस नेतृत्व द्विपक्षीय रणनीतीवर काम करण्याच्या तयारीत

चार दशकाहून अधिक काळ काँग्रेसमध्ये राहिलेले हर्ष महाजन यांनी काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाची पदं भूषवली. त्यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासून सुरुवात केली होती. जवळपास १० वर्षे ते एनएनयुआयचे अध्यक्ष होते. महाजन हे १९९८ ते २००३ दरम्यान चंबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची याच वर्षी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader harsh mahajan join bjp before assembly poll spb
First published on: 29-09-2022 at 18:17 IST