scorecardresearch

काँग्रेस कार्यकारणी निवडणूक आठवड्यावर आली असताना नेत्यांमध्ये संभ्रम

रायपूरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणी (CWC) सदस्यांचं अधिवेशन होत आहे. याच ठिकाणी काँग्रेस कार्यकारणी (CWC) सदस्यांची निवडणूक होणार आहे.

Sonia-Kharge
सोनिया गांधी व मल्लिकार्जून खरगे (संग्रहित छायाचित्र)

रायपूरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणी (CWC) सदस्यांचं अधिवेशन होत आहे. याच ठिकाणी काँग्रेस कार्यकारणी (CWC) सदस्यांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला आठवडा उरला असतानाही निवडणूक होणार की नाही याबाबत काँग्रेसच्या नेत्यांमध्येच संभ्रम असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे अद्याप काँग्रेस कार्यकारणीच्या सदस्यांची यादीही तयार झालेली नाही.

पक्षातील बहुतांश नेते आत्ता ही निवडणूक घेण्यासाठी अनुकूल नाहीत. अनेक नेत्यांना या निवडणुकीतून कडवट स्पर्धा आणि चुरस निर्माण झाल्यास पक्षात फूट पडेल असं वाटतं. तसेच यामुळे भारत जोडो यात्रेच्या यशावर आणि पक्ष ज्या मुद्द्यांना अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतोय त्यापासून लक्ष विचलित होईल, असं वाटतं. त्याचमुळे हे नेते आधी सरकारला कोंडीत पकडावे, या मताचे असल्याचं दिसत आहे.

देशाच्या लोकसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी आहे. शिवाय या वर्षी देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. अशातच पक्षातील काही नेते नवे काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नवी कार्यकारणी स्थापन करावी या मताचे आहेत. काही नेते खासगीत आरोप करतात की, काही विशिष्ट नेतेच काँग्रेस कार्यकारणीवर नियंत्रण ठेऊन आहेत. मात्र, ते समोर येऊन याविषयी बोलण्यास तयार नाहीत.

पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने मी कार्यकारणी सदस्य आहे की नाही हेही मला माहीत नाही, असं सांगितलं. काँग्रेसने देशातील सर्व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधींना बोलावले आहे. त्यापैकी काही एआयसीसी सदस्य बनतात. ही निवडणूक लढायची असेल तर उमेदवार एआयसीसी सदस्य असणं आवश्यक आहे. मात्र, यादीच तयार नसल्याने काही नेत्यांना ते या कमिटीचे सदस्य आहेत की नाही याचीही माहिती नाही.

हेही वाचा : “सत्तासंघर्षाच्या सुनावणीत ‘इंटरेस्टिंग’ गोष्टी घडत आहेत, आत्ता…”, शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे शशी थरूर यांना सीडब्ल्यूसीसाठी निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-02-2023 at 20:59 IST

संबंधित बातम्या