मोहन अटाळकर

अमरावती : गेले काही दिवस पश्चिम विदर्भातून मार्गक्रमण करणा-या राहुल गांधी यांच्‍या ‘भारत जोडो’ यात्रेने काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण निर्माण केलेले असताना गेल्‍या काही दशकांमध्‍ये मागे पडलेल्या या काँग्रेसला पुनरूज्‍जीवनाचे वेध लागले आहेत.
पश्चिम विदर्भातून गेल्‍या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ पाच आमदार निवडून येऊ शकले. काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले हे विदर्भाचे. त्‍यामुळे विदर्भातून जाणारी ही पदयात्रा यशस्‍वी करण्‍याचे आव्‍हान त्‍यांच्‍यासमोर होते. त्‍यांच्‍यासह माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी हे आव्‍हान स्‍वीकारले आणि शेगावच्‍या जाहीर सभेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाल्‍याने त्‍यांचे प्रयत्‍न यशस्‍वी ठरले. या यात्रेच्‍या निमित्‍ताने काँग्रेसचे सर्व जुने-नवीन नेते एकत्र आल्‍याचे चित्र दिसून आले खरे, पण गटा-गटांमध्‍ये विखुरलेल्‍या या नेत्‍यांना आता पक्षसंघटना बांधणीसाठी सामूहिक प्रयत्‍न करावे लागतील, ही काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांची प्रतिक्रिया बोलकी ठरली आहे.

bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
uddhav thackeray chandrahar patil
सांगली लोकसभेवरून मविआत तिढा? ठाकरे गट चंद्रहार पाटलांची उमेदवारी मागे घेणार? संजय राऊत म्हणाले…

विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्‍ला. १९९० पर्यंत या प्रदेशावर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्‍व होते. पण, नंतर काँग्रेसचा जनाधार कमी होत गेला. काही नेते एका जिल्‍ह्यापुरते राहिले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट झाली, त्‍याचवेळी भाजपने शिवसेनेच्‍या मदतीने मुसंडी मारली. मधील अंतर्गत दुफळीचा फायदा भाजपला मिळत गेला. सध्‍या भाजप हा विदर्भात क्रमांक एकचा पक्ष आहे. काँग्रेसचे विदर्भातून १५ आमदार निवडून आले आहेत आणि भाजप हाच काँग्रेसचा क्रमांक एकचा प्रतिस्‍पर्धी आहे.पश्चिम विदर्भातील ज्‍या भागातून ‘भारत जोडो’ यात्रा गेली, त्‍या भागावरही भाजपचेच वर्चस्‍व असताना यात्रेला मिळालेला प्रतिसाद हा काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांना सुखावणारा असला, तरी पक्षापासून दूर गेलेले मतदार पुन्‍हा जोडण्‍याचे आव्‍हान आता पक्षसंघटनेसमोर असणार आहे.

हेही वाचा: सावरकरांबद्दलच्या वक्तव्यानंतरही नांदेडमधील सत्ताधारी खासदार आमदारांमध्ये शुकशुकाट

पश्चिम विदर्भात काँग्रेसच्‍या आमदारांची संख्‍या कमी होत असताना स्थानिक राजकारणात काँग्रेसने आपले स्थान अबाधित राखले असले, तरी मध्‍यंतरीच्‍या काळात राजकीय सत्तास्पर्धा गुंतागुंतीची बनत गेली. काँग्रेसला आव्हान देणाऱ्या अनेक नव्या राजकीय गटांचा उदय या काळात झाला. नव्वदीतील राजकारणाची नांदी ही विधानसभेच्या निवडणुकीने घडवली. ३३ पैकी भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी ७ अशा १४ जागा जिंकून काँग्रेसला मागे सारले. प्रामुख्याने शहरी भागात काँग्रेसची मते घटल्याचे चित्र या निवडणुकीत आढळले. २६ वरून काँग्रेसच्या आमदारांची संख्या दहापर्यंत खाली आली. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने काँग्रेससमोर उभे केलेले आव्हान खऱ्या अर्थाने साकारले. या निवडणुकीत बिगर काँग्रेस सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले आणि त्याचे परिणाम स्थानिक पातळीवरही दिसून आले होते.

हेही वाचा: पुण्यात रिपब्लिकन गटात अस्वस्थता?

आता काँग्रेसला गतवैभव प्राप्‍त करून घेण्‍यासाठी बरीच मेहनत घ्‍यावी लागणार आहे. मध्यंतरीच्या काळात काँग्रेस अंतर्गत दुफळीचे दुष्परिणामही काँग्रेस पक्षाला भोगावे लागले. गटबाजीतून १९९५ च्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आणि अमरावती विभागात काँग्रेसच्या पिछेहाटीचे कारण बनली. काँग्रेस संघटना खिळखिळी झाल्याचे चित्र निर्माण झाले, पण काही टापूंमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी आपला प्रभाव टिकवून ठेवला होता. ‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण असले, तरी या संधीचा उपयोग पक्षाला गतवैभव मिळवून देण्‍यासाठी पक्षाचे नेते कशा पद्धतीने करतात, याचे औत्‍सुक्‍य आहे.