Congress Meeting Over Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. हरियाणा आणि महाराष्ट्रातील निकालांमुळे कधीकाळी सर्वाधिक मोठा पक्ष असलेला काँग्रेस आता अगदी रसातळाला गेल्याचं चित्र आहे. काँग्रेसची पीछेहाट होण्याची कारणं काय? आगामी काळात काय करणं गरजेचं आहे? आदी मुद्द्यांवर आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यातील नेत्यांची कानउघाडणी केली. किती दिवस राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांवर अवंलबून राहणार असा सवाल खरगेंनी विचारला.

कितीवेळ राष्ट्रीय नेत्यांवर अवलंबून राहणार?

“आपण निवडणूक हरलो असू, पण बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक विषमता हे ज्वलंत प्रश्न आहेत यात शंका नाही. जातीय जनगणना हा देखील आज महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यघटना, सामाजिक न्याय, समरसता हे प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आपण निवडणूक असलेल्या राज्यांमधील महत्त्वाचे स्थानिक मुद्दे विसरतो. राज्यांच्या विविध समस्या वेळीच तपशीलवार समजून घेणे आणि त्यांच्याभोवती ठोस मोहिमेची रणनीती बनवणे देखील महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय प्रश्न आणि राष्ट्रीय नेत्यांच्या मदतीने राज्याच्या निवडणुका कधीपर्यंत लढणार आहात?” असा सवाल खरगे यांनी केला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

जनतेचा मूड निकालात कधी उमटणार?

विधानसभेच्या निवडणुकीत मूड काँग्रेसच्या बाजूने असल्याचा दावा खरगे यांनी केला. पण “मूड अनुकूल असल्याने विजयाची हमी मिळत नाही. आपल्याला मूडचे परिणामांमध्ये (निकालांमध्ये) रूपांतर करायला शिकावे लागेल. आपण मूडचा फायदा घेऊ शकत नाही याचे कारण काय आहे?” असाही प्रश्न त्यांनी या बैठकीत उपस्थित केला.

हेही वाचा >> Uday Samant : दिल्लीतून थेट सातारा, मुंबईतील महायुतीची बैठक रद्द; नाराजी नाट्याच्या चर्चेवर शिंदेंचे नेते म्हणाले, “आज सकाळपर्यंत…”

एकमेकांविरोधातील टीका बंद करा

“निवडणुकीच्या निकालातून आपण धडा घेतला पाहिजे आणि संघटनात्मक पातळीवर आपल्या सर्व कमकुवतपणा आणि उणिवा सुधारल्या पाहिजेत. हे निकाल आपल्यासाठी संदेश आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी सांगत राहतो ती म्हणजे ऐक्याचा अभाव आणि एकमेकांविरोधातील टीका. यामुळे आपलं खूप नुकसान होतंय. जोपर्यंत आपण एकदिलाने निवडणुका लढवणार नाही आणि एकमेकांविरुद्ध वक्तव्ये करणे बंद करणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या विरोधकांचा राजकीय पराभव कसा करू शकणार आहोत? त्यामुळे आपण शिस्तीचं काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे. आपण सर्व परिस्थितीत एकजूट ठेवली पाहिजे”, असं खरगे म्हणाले.

संघटना मजबूत केली पाहिजे

“पक्षाने वेळीच रणनीती आखली पाहिजे, बूथ स्तरापर्यंत संघटन मजबूत केले पाहिजे आणि मतदार यादी तयार करण्यापासून मतमोजणीपर्यंत रात्रंदिवस दक्ष, सावध राहिलं पाहिजे. अनेक राज्यांमध्ये आपली संघटना अपेक्षेप्रमाणे नाही. आपली संघटना मजबूत करणं ही आपली सर्वांत मोठी गरज आहे”, यावरही खरगेंनी लक्ष वेधलं.

रणनीती चांगली बनवावी लागेल

“आपल्याला प्रत्येक परिस्थितीत निवडणूक लढवण्याची पद्धत सुधारावी लागेल. कारण काळ बदलला आहे. निवडणूक लढवण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. आम्हाला आमची सूक्ष्म संवादाची रणनीती विरोधकांपेक्षा चांगली बनवावी लागेल. अपप्रचार आणि चुकीच्या माहितीचा सामना करण्यासाठी आपल्याला मार्ग शोधावे लागतील. मागील निकालातून धडा घेत पुढे जावे लागेल. दोष दूर करावे लागतील. आत्मविश्वासाने कठोर निर्णय घ्यावे लागतील”, असंही खरगे म्हणाले.

Story img Loader